रानफुलांची भरली शाळा ....

Submitted by रोहित ..एक मावळा on 2 September, 2012 - 02:43

रानफुलांची भरली शाळा...
चला चला बघायला चला...

किती रंग,किती जाती...
हि तर समदी निसर्गाची उत्पती...

रानावनात...
तर कधी दरीखोर्‍यात...
माळरानावर..
तर कधी शेताच्या बांध्यावर
असते यांची वस्ती....

ऊन खात,वारा पिऊन...
पावश्यासंगे चाले यांची मस्ती ...

सह्याद्रीच्या कुशीत..
हसत,खिदळत ..
फुलतो आनंदाचा मळा....
चला चला बघायला चला... रानफुलांची भरली शाळा..

सह्याद्रीच्या कुशीत वावरताना... दर्‍या-खोरे पालथे घालताना ..ही रानफुले नेहमी भेटतात.ही हसरी फुले नेहमी आनंदी असतात अन आपल्या मनाला तजेला देतात.प्रवासातला थकवा यांना पाहुन कुठल्याकुठे पळुन जातो.रानफुलांच्या नुसत्या दर्शनाने मन प्रसन्न होते.सह्याद्रीत भटकंतीला जेव्हापासुन सुरुवात झाली तेव्हापासुन तर आतापर्यंत वेगवेगळ्या रुपात,रंगात ,वेगवेगळ्या मोसमात ही भेटत गेली अन त्यांना टिपत गेलो.खर म्हणजे पावसाळा सरता सरता लोकांना कासची आस लागलेली असते.पण मला प्रत्येक सह्यभेटीत यांचे दर्शन घडते.असा हा माझ्या पोतडीतला निसर्गाचा अनमोल खजिना तुमच्यासमोर मांडण्याचा छोटासा प्रयत्न...

प्रकाशचित्र १ . कवळा (Smithia hirsuta)

प्रकाशचित्र २.

प्रकाशचित्र ३. ऑर्किड

प्रकाशचित्र ४. दहाण (Tricholepis amplexicaulis)

प्रकाशचित्र ५.

प्रकाशचित्र ६. घाणेरी - तणतणी

प्रकाशचित्र ७.

प्रकाशचित्र ८.

प्रकाशचित्र ९. बाभळीची फुलं

प्रकाशचित्र १०. रानहळद

प्रकाशचित्र ११.

प्रकाशचित्र १२. गोकर्ण

प्रकाशचित्र १३. काटेसावर

प्रकाशचित्र १४. पिवळा धोतरा

प्रकाशचित्र १५.

प्रकाशचित्र १६. गोविंदी(Ceylon caper)

प्रकाशचित्र १७. भंडीरा

प्रकाशचित्र १८. जास्वंदी

प्रकाशचित्र १९. बिट्टी

प्रकाशचित्र २०.

प्रकाशचित्र २१. तेरडा

प्रकाशचित्र २२. जांभळी मंजिरी

प्रकाशचित्र २३.

प्रकाशचित्र २४.

प्रकाशचित्र २५.

प्रकाशचित्र २६.

प्रकाशचित्र २७.

प्रकाशचित्र २८. सोनतारा (Hypoxis aurea)

प्रकाशचित्र २९. घाणेरीची फुले

प्रकाशचित्र ३०. अभेळी(Cyanotis Tuberosa)

प्रकाशचित्र ३१. सडा प्राजक्तांचा...

मन भरल का ?
नाही ना...
मग जाऊ नका कुठे ...
आत्ताशी झालीय मधली सुट्टी...

रानफुलांच्या शाळेत ... मधल्या सुट्टीनंतर.........

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा रोहित - बरेच दिवसांनी फोटो टाकतो आहेस.....
सर्वच प्र चि अप्रतिम.......
१] स्मिथिया म्हणजेच कवळा
१७] भंडीरा Clerodendrum inforunatum
२२] Pogostemon deccanensis ??

धन्यवाद लोक्स Happy
बर्‍याच फुलांची नावे मला पण माहित नाहीत... रानफुल ती रानफुलच..
पण मायबोलीवर बरेच तज्ञ मंडळी आहेत त्यांच्याकडुन कळेलच... तसे मग नोंदवेन..
सगळ्या फुलांची नावे ओळखली तरच पुढचा भाग टाकेन ... गृहपाठ समजा हवा तर ...:P

सुंदर फोटो!
हा माझा उरलेल्यातली काही फुलं ओळखण्याचा प्रयत्न.
३ - ऑर्किड
७ - बोगनवेल?
१२ - गोकर्ण
१३ - शेवरी / काटेसावर
१४ - मेक्सिकन पॉपी (Argemone mexicana)
२३ - बाल्सम / इंपेशन्स
२६ - भेंडी गुलाब
२९ - टणटणी / घाणेरी

OMG!!!!!!!!!
अक्षरशः वेड लावणारी फुलं...
ते १५ नंबरचं फूल कसलं आहे???
तुझ्या कोलाज चं पिक्चर सेव करावंस वाटतंय ,चलेगा क्या???

ते १५ नंबरचं फूल कसलं आहे??? >>> ही एक सक्युलंट प्रकारची वनस्पती आहे.
Mexican Snowball, Mexican Gem, Hen and Chicks, White Mexican Rose
Botanical name: Echeveria elegans Family: Crassulaceae (Sedum family) बहुधा हे असावं ते.....

Pages