निसर्गाच्या गप्पा (भाग १०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 July, 2012 - 14:54

निसर्गाच्या गप्पांचा १० वा भाग सुरु होत आहे हो$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$

(मधला हार गुंफलेला फोटो शोभा कडून साभार)

मूलं भुजङ्गै:, शिखरं प्लवङ्गै:
शाखा विहंगै:, कुसुमानि भृङ्गै: |
नास्त्येव तच्चन्दनपादपस्य
यन्नाश्रितं सत्वभरै: समन्तात ||

हे आहे सुगंधी चंदनवृक्षाचं लेकुरवाळं चित्र; त्याच्या मुळांना सर्पाचं वेटोळं आढळतं. खोडाच्या टोकाकडे मर्कटवर्गीयांच्या लीला, पानापानात दडलेले पक्षीगण आणि फुलांवर रुंजी घालणारे भुंगे.

- डॉ. हेमा साने (वृक्ष - एक आधारवड, निसर्गायन, ऑक्टो. २०११)
(शशांक पुरंदरे यांच्याकडून)

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग ९) http://www.maayboli.com/node/35557?page=35

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधना Lol मी हे ऐकले होते. माझी आई सांगायची की उवा डोक्यात खड्डे करतात. आणि खरच माझ्य मावशीच्या मुलीचे डोके उवांनी पोखरले होते. तिचे टक्कलही केलेले मला आठवते.

काल सकाळी फिरायला गेले तेव्हा अचानक मेंदीचे झुडुप दिसले. पान खुडून घेतले आणि खुप वेळ चुरगाळून त्याचा वास घेत होते. ओली पाने वाटुन लावलेल्या मेंदीच्चा वास खुप वेगळा यायचा, तो गंध काल परत भेटला. मेंदीपावडरीचा वास वेगळा येतो.

आज बीच्या सल्ल्याप्रमाणे (म्हणजे माझी लहर जशी लागेल त्याप्रमाणे) आवळ्याची पुड आणि मुलतानी माती एकत्र मिसळुन त्याचा पातळ लेप केसांना लावला. केस मस्त सुळसुळीत झाले Happy

हो ग.

तू अंबोलीला गेली होतीस का पावसात ? आता खुप छान वाटत असेल ना तिथे. आमच्याइथे पण खुप सगळ हिरव झाल आहे आणि रानफुलेही डोकाऊ लागली आहेत. पण पाऊस हवा तसा नाही पडत अजुन.

नाही गं.. जायचेय पण ऑफिसातुन रजा मिळत नाहीय. आंबोलीला खुप जोरात पाऊस आहे. पुरेशी काळजी घेतल्याने यंदा घाट कोसळण्याचा समारंभ झाला नाही पण जागोजागी धबधब्यांचे संमेलन मात्र भरलेय....

आम्ही मात्र इथेच्झ..

झोपते मी आता..

परागवहनात कापूस, खजूर अशी काही मोजकी पिके सोडली तर मानवाचा सहभाग नगण्य आहे,
पण बीजप्रसारात मात्र वारा, पाणी आणि इतर प्राणी यांच्याबरोबरीने, मानव हा एक स्वतंत्र घटक
मानावा लागेल, इतका महत्वाचा आहे.
किंवा असे म्हणावे लागेल कि काही वनस्पतींच्या बाबतीत मानवाच्या हस्तक्षेपाशिवाय पुनरुत्पादन
अशक्य आहे. आपल्या परिचयाच्या अनेक पिकांचे दाखले देता येतील.

बटाटा घ्या. मूळात हा विषारी कंद होता, पण मानवाने त्यातले विष नगण्य करुन टाकले आहे.
बटाट्याच्या लागवडीसाठी बटाट्याचे तूकडे करुन (त्या तूकड्यावर डोळा असेल अशा बेताने) ते
लावावे लागतात. निसर्गात ते अशक्य आहे. आज समुद्रसपाटीपासून उंचावर असणाऱ्या काही
ठिकाणी, बटाट्याशिवाय कोबी आणि मका एवढीच पिके घेता येतात.

गव्हाच्या बाबतीत अशी परिस्थिती आहे कि, आज आपण या पिकाचे गुलाम आहोत. मला
नेमके सांगता येणार नाही, पण एकंदर गव्हाचे जे दाणे निर्माण होतात त्यापैकी जवळ जवळ
९८ टक्के आपण फ़स्त करतो, तरीही उरलेल्या दोन टक्क्यांची जी लागवड होते, त्याखाली आज
फ़ार मोठे क्षेत्र आहे. पुर्वीच्या काळी जिथे गवताळ प्रदेश होते तिथे आज गव्हाचे पिक आहे. सौदी
मधे जिथे मर्यादीत प्रमाणात फ़ॉसिल वॉटर ( जमिनीखाली प्राचीन काळी अडकलेले पाणी ) सापडले
तिथेही, गव्हाचे पिक, जोपर्यंत पाणी होते तोपर्यंत, घेतले गेले. पण आजचा गहू, इतका स्थूल आहे,
कि नैसर्गिकरित्या, त्याचा प्रसार अशक्य आहे. गव्हाच्या मूळ जातीतले दाणे, वजनाने हलके होते,
आणि वाऱ्याने सहज दूरवर जात असत. आजचा गहू असा जाणे, शक्य नाही. तो पाण्यात राहिला
तर कुजेल आणि प्राण्यांच्या पचनसंस्थेतही तग धरु शकणार नाही.

ऊस घ्या. फ़ड संभाळ तुऱ्याला गं आला, असे म्हणत असलो तरी ते तुरे निव्वळ शोभेचे उरले
आहेत. त्यात बिया निर्माण होत नाहीत. मूळचे हे एक प्रकारचे गवतच आहे, पण आपण त्याच्या
देठात एवढी साखर ठासून भरली, कि त्याला आता बाकि काही करणे अशक्य झालेय. त्याची
लागवड करताना, त्याचे तुकडे करुन जमिनीत ते आडवे लावतात. मानवाशिवाय इतर प्राण्याला
ते शक्य नाही. मानवाशिवाय इतर प्राण्याला. इतके गोड खायची आवडही नाही. ऊसाला लागंल कोल्हा
म्हणत असलो, तरी कोल्हा ऊस नुसता चावून टाकतो आणि हत्ती म्हणाल तर तो पाल्यासकट
सगळाच ऊस, गट्ट्म करतो.

सिताफळाच्या झाडाचा, जरा गोंधळ झालाय. प्राचीन काळी माकडे आणि बकऱ्या (हरणे) यांनी त्याच्या
पानांचा आहार करुन, झाडावर एकही पान ठेवले नसेल. त्यावर उपाय म्हणून, झाडाने आपल्या पानात
एबढा विखार भरुन ठेवला, कि आज माकडांनी आणि बकऱ्यांनी या झाडाचा धसकाच घेतलाय.
आणि त्यांचा हा बहिष्कार पानांबरोबर फ़ळांवरही आहे. माकडे सिताफ़ळे खात नाहीत.
हे फ़ळ पिकल्यावर तडकते, पण त्याने बिया केवळ झाडाखालीच पडतात, दूर जात नाहीत.
कढीलिंबासारखा एखादाच अपवाद असा आहे कि जिथे मूळ झाडाखाली, रोपे सुखाने वाढतात, इतर
झाडांच्या बाबतीत हे घडत नाही. सिताफळाच्या बियाभोवतीचा गोड चिकट गर बघता, तो पक्ष्यांनी
वाहून न्यावा, (पेरुप्रमाणे) अशी योजना दिसतेय. पण बिया मोठ्या असल्याने त्या पक्ष्यांच्या चोचीला
चिकटू शकत नाहीत कि त्यांना त्या गिळता येत नाहीत. म्हणजे परत मानव हवाच.

केळ्यातल्या बिया आपण गायब करुन टाकल्यात (रानटी केळ्यात त्या असतात आणि त्यांचा प्रसार
प्राण्यांमार्फ़तच होतो. डोंगरात ठिकठिकाणी चवईची झाडे दिसतात, ती यामूळेच). आपल्या केळीची
लागवड बुंधे लावून होते. हे बुंधे मूळ खोडाच्या आजूबाजूला नैसर्गिकरित्याच तयार होत असले
तरी, मूळ ठिकाणाहून दूर नेणे, हे काम मानवच करतो. कोस्टा रिका सारख्या ठिकाणी, खास
अमेरिकेला पुरवठा करण्यासाठी, केळ्याची लागवड पूर्णपणे यांत्रिकरित्या होते.

फ़ळांच्या बाबतीतच नाही तर कडधान्याच्या बाबतीत पण हाच प्रकार आहे. साधे मूग घ्या. याचा जो
मूळ वाण होता, त्याच्या शेंगा, बिया तयार झाल्यावर आपोआप तडकत असत आणि बिया दूरवर
फ़ेकल्या जात असत. अर्थातच या बिया वजनाने हलक्या होत्या. पण अशा पडलेल्या बिया गोळा
करणे, मानवाला त्रासदायक होते. म्हणून असे वाण विकसित झाले कि यातल्या बिया आकाराने
मोठ्या तर होत्याच पण शेंगाही तडकत नसत. आज आपण जे मूग खातो, त्याच्या शेंगा तडकत
नाहीत. खास प्रक्रियेने त्या वेगळ्या कराव्या लागतात आणि अर्थातच निसर्गात ते होत नाही.

सध्या आपण वापरत असलेल्या अनेक उत्पादनाबाबत असेच झालेय.

दिनेशदा तुमचे निरिक्षण व माहिती सांगण्याची हातोटी हे खुपच अप्रतिम आहे Happy
वरिल डिटेल्स असेच नुसते विचार करुन कधीच कळाले नसते. धन्स.

Nyctanthes arbora mhatresis यांचे दहाव्या भागाबद्दल अभिनंदन. आज बरेच दिवसांनी येतोय, बरेच वाचायचे आहे.

Nyctanthes arbora mhatresis Proud
दोनदा वाचले व लक्षात आले काय म्हणायचेय ते Happy

दिनेशदा, नेहमीप्रमाणेच रंजक माहिती.

खरंतर एखादी वस्तु हिरवी (वा लाल, वा पिवळी, वा कोणत्याही रंगाची) आहे असं आपण म्हणतो म्हणजे काय? तर त्यावर पडलेला प्रकाश तो रंग आपल्याकडे परावृत्त करते (आणि इतर सगळे रंग स्वतःकडे ठेवते).

सफरचंद लाल दिसतं म्हणजे खरं तर लाल रंग स्वतःकडे न ठेवता ते आपल्याकडे पाठवतं. म्हणजे खरंतर सफरचंदाला एक प्रकारे लाल रंगाची अ‍ॅलर्जीच असते की. तरीही आपण मात्र सफरचंद कित्ती लाल आहे नाही? असंच कौतुकानं म्हणतो. Proud

वाहवा..दिनेश दा ने बीजप्रसारात मानवाचा सहभाग नीट समजावून दिल्यामुळेच लक्षात आलंय,यापूर्वी या दृष्टीने विचारच नव्हता केला कधी!!!
मामे Proud

Hello Friends,
Mi maayboli warti navinach member zali aahe.
Gelya chaar divasanpasun Nisargachya gappa (Bhaag 1 te aataparyant) vachat aahe.
Khar saangu tar mala zade lawnyas khup aawadtat pan aai nehmi saangate nusti zade lawun
chalat naahi tar tyanchi yogya ti mashagat pan karawi laagte mhanun thodi mothi ho mag laaw.
pan aata mi tar mothi zaali shaala sutali, collegela jayla lagli aahe. Mi tar agodarch decide kele aahe 12th nantar chemistry, zoology,botany subjects ghyache aani B.Sc botany madhunach karayche.
Aata aai jawal khup khup hutt karun aai zade aanayala tayaar zali aahe. "aante bai ekdachi tula hawi ti zade" ashi aai mhanali.
tar mag mazya mitrano mala please koni tari saangel ka, mala uttam darjachi zaade kothe miltil?
Mi mumbai madhe mulund yethe rahate. Aamhi gelya varshi amachya jawalchya nursery madhun aanaleli sadafuli aani gulab naahi jagle ,tyapaiki tulas aani aleo vera aahet ajun.

Kaal mi mahim nature park madhe call karun vicharale tar tyanchya kade aahe nursery, net warun go green mall je ki vikhroli la aahe tyachi pan mahiti ghetali, nisargachya gappanmadhe raanichya baagecha pan ullekha zala aahe.
Tashi mi zade kashi laawaychi yachi mahiti netwarun ghetali aahe mhanje Dr. Madhav Nagare yaanchya 'Adarsha Gharbag' ya bookmadhun.

Mag aata mi khup confuse aahe mi kuthun zadanchi rope aanu?
Amchya ghrachya windows khup mothya asun khup khup jaaga aahe mhanun mi sadafuli, hibiscus, gulab, mogra, aboli, shevanti (aaichi choice) aani jaaichi vel he sagale laawnar aahe aani ho mazi friend mala brahma kamal chi paat pan denar aahe.

Please, please mala saanga na mi kothun rope aanu? agodarchya gappa vachun mala evdha tar mahit zaale aahe ki tumhi lok kup jaankar aani anubhavi aahat.

mala pan mazya zadanche, tyawar aalelya fulanche photo kadun thevayche aahet.
mumbai madhe kothe, kuthalya nursery madhe changali rope miltil,
plz mala konitari saanga ha!!!!

Thank You.

दिनेशदा, एकदम अभ्यासपूर्ण आणि वाचनीय लेख.
खरोखरच बीज प्रसाराची अशी माहीती नवीनच.

गुलमोहराचे झाड : हे मूळ भारतीय नाही. त्यामुळे त्याचे असे फार फायदे नाहीत. कडक उन्हाळ्यात पाने गळून पडतात आणि झाडाची सावली मिळत नाही. पावसाळ्याच्या सुरवातीलाच फुलांचा बहर गळून पडतो आणि सगळीकडे चिखल होतो. पक्षीसुद्धा झाडावर सहसा घरटे करीत नाहीत. पण खारूताई मात्र शेंगा खाताना दिसतात. काय असेल त्यांच्यात, नुसते खाऊ खाणे कि बीज प्रसार सुद्धा.

सहजच.

वा दिनेशदा मजा आली, खुपच माहिती मिळाली.
मला कधी कधी अशी शंका येते की ज्या झाडांना फुलं येतात पण फळं येत नाहित (उदा. तगर, जास्वंद, मोगरा इ.) त्यांना फुलं का येत असावी, आणि मोगरा तर सुगंधी असतो त्याचे काय प्रयोजन असावे?

Nyctanthes arbora mhatresis
मला नाही कळले बुवा. स्पष्टीकरण द्याल का ?

श्वेता १२३ तुमचे स्वागत आहे.

दिनेशदा नेहमीप्रमाणेच सुंदर माहीती.

प्राजक्ता बाळा (तुला बाळा म्हणतेय :फिदी:) हे तुझ्याच नावाचे बोटॅनीक नाव आहे ग. गुगलून बघ इमेज सेक्शन मधे.

Nyctanthes arbora mhatresis

अगं प्राजक्ताचे बोटॅनिकल नाव.. Happy

श्वेता, मराठीत लिहा, सोप्पे आहे, देवनागरी रोमन लिपित वाचायचे जीवावर येते Happy तुमचे स्वागत. रोज येत जा इथे.

श्वेता, तु मुलुंडला राहतेस तिथे आजुबाजुला असतील ना नर्सरीज. हायपर मध्ये गो ग्रीन नर्सरीतर्फे रोपे ठेवलेली आहेत (अर्थात ती महाग आहेत) ठाण्याला एका मेन सर्कलपाशीच मोठ्ठी नर्सरी आहे.

ठाण्याला एका मेन सर्कलपाशीच मोठ्ठी नर्सरी आहे.>>> माजीवडा म्हणायचे आहे का तुला साधना?
हल्लीच खारघरला त्या उत्सव चौकाजवळ पण एक मस्त नर्सरी सापडली (स्टेशनहुन गेल्यास चौकाच्या डावीकडे). चांगली आहे ती नर्सरी.

Nyctanthes arbor = प्राजक्त. (याच भागाच्या पहिल्या पानावर शांकलीने दिलय.)

त्याला स्त्रीलिंगी बनवून तुसे आडनाव जोडून तुझे बोटॅनिकल नाव बनवले.

श्या, सगळा विचका केला माझ्या मेहनतीचा Angry आता एक प्राजक्ताच्या फुलांचा नविन फोटो टाक उद्याच्या सुप्रभातला. जिप्सीला सांगू नको नाहीतर तो तुझ्या लेकीचा फोटो टाकेल - प्राजक्ताचे फूल म्हणून Happy

माजीवडा म्हणायचे आहे का तुला साधना

एरिया माहित नाही गं. पण बोरीवलीहुन नव्या मुंबईत येताना सर्कलच्या डाव्या बाजुला आहे.

Nyctanthes arbor = प्राजक्त. (याच भागाच्या पहिल्या पानावर शांकलीने दिलय.)

त्याला स्त्रीलिंगी बनवून तुसे आडनाव जोडून तुझे बोटॅनिकल नाव बनवले.

mhatresis पाहिलेच नव्हते आधी Happy

जिप्सीला सांगू नको नाहीतर तो तुझ्या लेकीचा फोटो टाकेल - प्राजक्ताचे फूल म्हणून
Lol

बोटॅनिकल नाव आवडल.

साधना, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
मामी, मोराचे पंख आणि हमिंग बर्डचे झळाळते रंग, पण असेच तयार झालेले असतात.
तिथे रंगद्रव्य नसते तर सगळा प्रकाश आणि लोलकाचा खेळ असतो. अर्थात म्हणून ते
कमी सुंदर ठरतात, असे अजिबात नाही.

चांगल्या नर्सरीज सोडल्या तर मुंबईत रस्त्यावर जी झाडे विकायला असतात, ती कृत्रिम
रितीने म्हणजे, संप्रेरके वगैरे फ़वारून फ़ुलवलेली असतात. त्यामूळे घरी आणल्यावर ती तग
धरत नाहीत.
त्यापेक्षा बिजा रुजवल्या तर चांगली रोपे तयार होतात. आपल्या घरातच रुजण्याजोग्या अनेक
बिया असतात. दर्जेदार बियाणे, भायखळा स्टेशनसमोर (पुर्वेला) मिळू शकेल.

साधना, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!! Happy
पण बोरीवलीहुन नव्या मुंबईत येताना सर्कलच्या डाव्या बाजुला आहे.<<<<<<< माजिवडा ब्रिजच्या अलीकडे आहे नर्सरी.

Pages