येत जा देऊन थोडी कल्पना (तरही गझल)

Submitted by आनंदयात्री on 15 June, 2012 - 07:07

येत जा देऊन थोडी कल्पना
सावरावे लागते हल्ली मना!

एकटा सोडून नाही जात मी
एकटी झुरते बिचारी वेदना

मी खुशीने भीकही घेईन पण -
दार थोडेसे तरी तू उघड ना!

ती म्हणे मी आजही आहे तुझी
(मी मुक्याने सोसतो ही वंचना!)

फक्त दु:खांचा जसा मी लाडका
ती सुखावर भाळलेली याचना!

मीच आडोसे तरी कितिदा करू?
बरसणे तूही तुझे सांभाळ ना!

- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2012/06/blog-post_15.html)

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

ती म्हणे मी आजही आहे तुझी
(मी मुक्याने सोसतो ही वंचना!) >> व्वा!

मीच आडोसे असे बांधू किती?
बरसणे तूही तुझे सांभाळ ना! >>> क्या बात!

आवडली Happy

मी खुशीने भीकही घेईन पण -
दार थोडेसे तरी तू उघड ना!>> वा वा

ती सुखावर भाळलेली याचना!>> अत्यंत सुंदर ओळ

मीच आडोसे असे बांधू किती?
बरसणे तूही तुझे सांभाळ ना!>> व्वा व्वा

आडोसे हा शेर फारच सुंदर आहे

एकटा सोडून नाही जात मी
एकटी झुरते बिचारी वेदना...व्व्व्व्वा!!!

मी खुशीने भीकही घेईन पण -
दार थोडेसे तरी तू उघड ना!......खल्ल्लास!!!!

ती म्हणे मी आजही आहे तुझी
(मी मुक्याने सोसतो ही वंचना!).....आह्ह्ह्ह्ह!

मीच आडोसे असे बांधू किती?
बरसणे तूही तुझे सांभाळ ना!.....आय हाय! क्या अदा है!

फिदा या शेरांवर...

स-ला-म!

मीच आडोसे असे बांधू किती?
बरसणे तूही तुझे सांभाळ ना!>> नचिकेत, कमाssssल झालाय हा... कितींदा तरी वाचला, आणि घोळतोय मनात.. फारच भावला!

मला मतलाही फार आवडला, सोपा आनि सहज!

भीकेचा तर रुतला..
दु:खाचा लळा.. अह्हा! मस्तच!

आवडलीच! Happy

मी आडोसे असे बांधू किती?
बरसणे तूही तुझे सांभाळ ना!
भन्नाट!
जयन्ता५२

शामराव, आडोसा असला की बरसण्यापासून बचाव होतो ना? पावसापासून Happy

(अवांतर - आज काय घेतलेत) Light 1

जो बांधला जातो त्याला अडोसा म्हणत नसावेत .. बांधला जातो तो निवारा....अडोसा रेडीमेड असावा... आपण शोधतो इतकेच.

माझं अज्ञानही असू शकतं.

हसू नका बेफि. हे पहा जरा


मराठी शाब्दबंध Marathi Wordnet

मराठीतील शब्दगत संकल्पनांचा कोश A Lexical Database for Marathi
आडोसा...
Noun(2)
(R)(H)(E) आडोसा - पलिकडले दिसणार नाही असा अडथळा "रामूने पुस्तकाचा आडोसा करून विड्या लपवल्या."
(R)(H)(E) आश्रय, आसरा, आश्रयस्थान, थारा, आधार, आडोसा - संरक्षण होईल असे ठिकाण "अतिरेकी आश्रय शोधत गावात आले/ अचानक पाऊस आल्याने आम्ही आडोसा शोधू लागलो."

नचिकेतजी! आपली तरही गझल वाचली. आवडली. पण काही शेरांत कुठे कुठे खटकले ते नमूद करतो, व तिथे तिथे आम्ही ते शेर कसे वाचले ते सांगतो.....

“एकटा सोडून नाही जात मी
एकटी झुरते बिचारी वेदना!”

इथे मी कुणाला एकटे सोडून जात नाही, हे स्पष्ट होत नाही. बिचारी वेदना एकटी झुरते....कुणासाठी? का झुरते? अस्पष्ट राहते.
हा शेर मी असा वाचला..........

“पाहुनी सोशीकता माझ्यातली;
एकटी झुरते बिचारी वेदना!”
..................................................................................

“दु:ख लावी नेहमी मजला लळा;
ती सुखावर भाळलेली याचना!”

दु:खाने मला नेहमी लळा लावणे व सुखावर भाळलेली याचना यांच्यातील नाते स्पष्ट
होत नाही. कृपया गद्यात आपल्या मनातला अर्थ सांगाल का?
असे केलेतर कसे वाटेल?..............

“दु:ख लावी नेहमी मजला लळा;
का करावी मी सुखाची याचना?”
................................................................................

“मीच आडोसे असे बांधू किती?
बरसणे तूही तुझे सांभाळ ना!”

आडोसे बांधणे....जरा खटकले.
असे केले तर......

“सांग आडोसे तरी शोधू किती?
बरसणे तूही तुझे सांभाळ ना!”

............प्रा.सतीश देवपूरकर
...............................................................................................

सर्वांचे आभार!
Happy

आडोसेबद्दलच्या सकारात्मक चर्चेसाठी सर्वांचे आभार! बदल केला आहे.

अफाट गझल...
फक्त
'मीच आडोसे तरी कितीदा करू?
बरसणे तूही तुझे सांभाळ ना!'
या सुधारित केलेल्या शेरात उला मिसर्यात वृत्तासाठी 'कितीदा' ऐवजी 'कितिदा' करावे लागेल.
चुभूद्याघ्या.