ही ज्योत काळजाची मी मालवू कशाला?

Submitted by सतीश देवपूरकर on 27 May, 2012 - 04:05

गझल
ही ज्योत काळजाची मी मालवू कशाला?
आहे उजेड, तोही, मी घालवू कशाला?

मी सोसतो कधीचे पायांमधील काटे;
दुख-याच पावलांना मी चालवू कशाला?

धोके, दगे, मुखवटे, कावे बघून झाले!
आता नवीन सोंगे, मी पालवू कशाला?

का मोजदाद ठेवू, गगनस्थ तारकांची?
बुद्धी उगाच माझी, मी चालवू कशाला?

सौंदर्य निखळ आहे! चिरफाड का करू मी?
जे गोड! त्यात साखर, मी कालवू कशाला?

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

गुलमोहर: 

पुन्हा तोच कालचा प्रतिसाद कॉपी पेस्ट करणे टाळतो आहे ................तरी आपण योग्य तो अर्थ कढाल अशी खात्री आहे !!