फ्रेंच ओपन टेनिस - २०१२

Submitted by Adm on 23 May, 2012 - 03:58

यंदाच्या उन्हाळ्यातली पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा अर्थात फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा येत्या रविवारी म्हणजे २७ मे रोजी सुरु होत आहे. पुरूष एकेरीत नेहमीप्रमाणेच नदाल, जोकोविक आणि फेडरर ह्यांच्यात विजेतेपदासाठी चुरस असेल.
मार्डी फिश आणि सोडर्लिंग उर्फ सोड्या ह्यांनी ह्या स्पर्धेतून माघार घेतल आहे.

पुरूष एकेरीत नोव्हाक जोकोविकला तर महिला एकेरीत व्हिक्टोरिया अझारेंका ह्यांना अग्रमानांकन देण्यात आले आहे. पुरूष एकेरीत जोकोविक आणि फेडरर एका हाफमध्ये आले आहेत तर नदाल आणि मरे एका हाफमध्ये आहेत. महिला एकेरीत सेरेना वि शारापोव्हा अशी उपांत्यपूर्व फेरी रंगू शकते.

मानांकिन खेळाडू सामने जिंकत गेल्यास उपांत्यपूर्व फेर्‍या अश्या होतील:
जोकोविक वि. त्सोंगा
फेडरर वि बर्डीच
फेरर वि मरे
नदाल वि टिपरार्विच

अझारेंका वि स्टोसूर
बार्टोली वि राडावान्स्का
ना ली वि क्विटोव्हा
सेरेना वि शारापोव्हा.

ह्या स्पर्धेसंबंधी चर्चा करण्यासाठी हा धागा..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अपेक्षेप्रमाणे पुरुषांच्या विभागात सगळे सीडेड खेळाडू उपांत पूर्व फेरीत एकमेकां विरुद्ध खेळणार.. आणि महिलांमध्ये नवीनच कोणीतरी विजेती ठरणार... शारापोव्हाला क्विटोव्हा, ली ना किंवा स्टोसूर ह्यांचीच लढत आहे आता..

लोला आहेत का? त्या मला काल शोधत होत्या वाटते ..

त्यांच्या आनंदावर विरजण पडल्याबद्दल मला खेद आहे .. :p

विरजण नाही पडले. खेळ पाहून फार आनंद झाला. Proud

ली ना चे असे कसे झाले शेवटी? मी पाहिली नाही ती मॅच. कोणी पाहिली का?

शारापोव्हा किती ढिसाळ खेळली !!!!
दोघींना दुसर्‍या सेटमध्ये एकही सर्व्हिस राखता येतं नव्हती.. शारापोव्हा धड हालत पण नव्हती.. सर्व्हिस करून झाली की तिला रिकव्हरही होता येत नव्हतं.. असच खेळली तर पुढच्या फेरीत काही खरं नाही !

डेल पोट्रो, त्सोंगा जिंकले.. डेल पोट्रो जोरदार खेळला..

ना ली, स्किव्होनी दोघीही हरल्या..

मरे आणि गॅस्केटचे पहिले दोन सेट मस्त झाले. गॅस्केटला दुसर्‍या सेटच्या शेवटच्या गेममध्ये घालवलेली सर्व्हिस महागात पडली. आधी मस्त खेळत होता तो !

आज सिंगल्सच्या चारही मॅचेस इंटरेस्टींग आहेत.

ज्योको वि त्सोंगा
फेडरर वि डेल पोट्रो
इर्राणी वि कर्बर
चिबुल्कोवा वि स्टोसुर..

टेनिसरसिकहो,

क्वचितप्रसंगी विजेत्याने प्रतिस्पर्ध्यापेक्षा कमी गेम जिंकलेले आढळून येतात. वॉरिंका वि. त्सोंगा या सामन्यात वॉरिंकाने २६ गेम जिंकले तर त्सोंगाने २३. तरीही त्सोंगा जिंकला!

कुकुष्किन (२६ गेम) विजयी वि. गुल्बिस (२७ गेम) आणि म्युलर (२६ गेम) विजयी वि. सिसलिंग (२७ गेम) हे दोन सामनेही असेच आहेत.

यामुळे पराभूतांवर अन्याय होतो का? आपली मते ऐकायला आवडतील.

आ.न.,
-गा.पै.

ज्योको त्सोंगा जबरी सुरू आहे !!!!!
अंडर प्रेशर ज्योको किती अ‍ॅक्युरेटली खेळतो आणि त्सोंगानेही पहिल्या सेट नंतर गेम भारी उंचावलाय...

डेल पोट्रोने पण जबरी फाईट दिली..

मयुरेश.. Proud
इथे निओ वर दोन्ही चॅनल्सवर एकच मॅच दाखवत होते.. त्यामुळे स्कोरवरून जे समजलं तेव्हडच लिहिल.. Wink
अंडर प्रेशर कसं खेळावं ह्याच उदाहरण काल ज्योकोन दाखवलं.. लय भारी मॅच होती..

फेडेक्सची मॅच आज दाखवतील दुपारी पण नेमकी बघता येणार नाही...

जोकोची मॅच जबरीच झाली... त्सोंगा ऐनवेळेस फारच ढेपाळला... शेवटच्या सेट मध्ये सोडून दिल्यासारखी वाटली मॅच... शक्यतो तसे होत नाही.. पण काल दमल्यासारखा वाटत होता...

जोको - फेडेक्स बघायला मज्जा येणार... दोघेही आधीच्या राऊंडला ५ सेटर खेळले आहेत..

गामा.. असले काही नसते... सेट जिंकले की झाले का... मग पूर्ण मॅच मध्ये एकूण किती गेम जिंकले त्याला फार काही महत्त्व रहात नाही...

हिम्सकूल आणि लोला, सेट महत्त्वाचा आहे हा नियम आपण परत स्पष्ट केल्याबद्दल आभार. मात्र त्यामुळे पराभूतावर अन्याय होतो का ते ऐकायचं होतं.

दुसर्‍या शब्दांत मांडतो. विजेत्याचे प्रतिस्पर्ध्यापेक्षा किमान २ गेमच कमी असावेत असा नियम काढला तर कसं होईल?

आ.न.,
-गा.पै.

Pages