दोन अलामती .................

Submitted by वैवकु on 5 May, 2012 - 05:40

एक काफिया काफिया त्याच्या दोन अलामती
एका दादल्याला दोघी लाडे लाडे खुणावती
___________________________________________
शेर माझा कान्होपात्रा गेल्या जन्मी असणार
म्हणूनच त्याच्या भाळी विठ्ठलाची भानामती
__________________________________________
संपला कडबा चारा जित्राबं उपाशी माझी
त्यांची हालत बघून डोळे माझे पाणावती
__________________________________________
राज्यसभेमध्ये गेला क्रिकेटचा देव माझा
(सोनियाचा दिन येता सोनियाजी बोलावती)
___________________________________________
ये रे मोरा ये रे मोरा काळजात नाच माझ्या
गझलवेणेच्या कळा प्राण माझा नभाळती

गझलवेणेच्या कळा प्राण माझा नभाळती ....................

गुलमोहर: 

या गझलेला एकही प्रतिसाद का नाही हे पहायला आलो होतो ........

आपले लेखन खूप चांगले आहे .....गझलविधेची चांगली जाण आहे आपणास असे म्हणावेसे वाटते .....

ही अष्टाक्षरी गझल आहे असे म्हणता येईल .....(अक्षरसंख्येवर आधारलेली रचना )
असा प्रकार जरा कमीच हाताळला जातो गझलेत, आपण तो खूप छान हाताळला आहे इथे !
अभिनंदन!

अष्टाक्षरी किंवा तत्सम (अक्षरांच्या संख्येवर ठरणार्‍या) छंदात गझल लिहिली जात नाही, सबब या रचनेला गझल म्हणता येणार नाही असे माझे मत आहे.
एक स्वतंत्र रचना म्हणून ठीक आहे.

क्ष.य.ज्ञ.जी : आपणास माबो वर प्रथमच पहिले ..........आपण आजच आलात हेही समजले ..................सर्वप्रथम समस्त मायबोलीकरांतर्फे आपले हार्दिक स्वागत !!
आपला प्रतिसाद भावला .............धन्यवाद ( पण मला अशा स्तुतीची सवय नाहीय हो ..निदान माबोवर तरी)

ज्ञानेश जी :आपलेही आभार .
आपण माझ्या गझलेवर बर्‍याच दिवसांनी प्रतिसाद दिलात त्याबद्दल धन्यवाद.
आपले मत १०० % पटत नाहीय .............कारण मी अशी एक रचना एका दिग्गज गझलकाराच्या ब्लॉगवर पाहिली आहे .
शिवाय अक्षर-छंदात गझल होवू शकते ........(.....का नाही ?...).. नक्कीच होवू शकते!! असे माझे बर्‍याच दिवसापासूनचे म्हणणे आहे ..............
अशा रचनांमध्ये प्रत्येक अक्षराच्या दोन मात्रा धरल्या जातात . अभंगामध्ये पण असेच होवू शकते .
कारण ओवी/अभंग गाताना (गुणगुणताना) आपण नेमके असेच करतो अगदी नैसर्गिकपणे !!
शिवाय हे दोन प्रकार अस्सल मराठी मातीतले आहेत त्याना माराठी माणसाने स्वीकारले पाहिजे किंबहुना मराठी गझलेने ..असे मला मनापासून वाटते .
धन्यवाद !!

विठ्ठलाची भानामती........ झेपायला जरा कठीणच !!
बाकी अष्टाक्षरी हा प्रकार मला मनापासून आवडतो... त्यामुळे मला जे जेष्ठांनी सुचवलं तेच सांगते.
अष्टाक्षरी मधे साधारणतः पहिला शब्द दोन अक्षरी असला की जास्त छान लय वाटते.
इथे तिसर्‍या द्विपदीमधे.....

संपला कडबा चारा जित्राबं उपाशी माझी.....च्या ऐवजी..... चारा कडबा संपला, माझी जित्राबं उपाशी....हे जास्त लयबद्ध वाटेल. अर्थात हे माझं मत Happy

यु माईट बी राईट मॅम.............
मला ही गोष्ट अज्जिबात माहीत नव्हती ........... सांगितलीत त्याबद्दाल अंतःकरणापासून आभार

पण अशीही उदाहरणे असतील ना की अगदीच नाहीयत प्लीज सांगाल का ? ...........

वैभव..... अशी सक्ती नाहीये. पण फ्लो जास्त चांगल्या तर्‍हेने येतो म्हणून सुचवलं........ जे मलाही जेष्ठांनी सुचवलं आणि मला पटलं Happy

जयश्री जी धन्स फॉर युवर हेल्प्-फुल्-नेस............... आभारी आहे

(वरचा शब्द बहुधा योग्य असावा .....माझे इन्ग्रजीज्ञान जेमतेम आहे)