Submitted by वैवकु on 25 April, 2012 - 07:29
तुला खूप आवडतं ना गं माझा असा 'पुतळा' करायला
खरं सांगू.... मलाही आवडतं तुझी वाट बघत झुरायला
"या!" असं म्हणूनतरी बघ! मग बघ असा लागतोच कितीसा वेळ
स्वप्नांचे दुःखभेदी कवडसे........ सत्यांच्या उन्हांमध्ये शिरायला
असा बुडुन जा सूर्या जणू उद्याचा दिवस उगवणारच् नाहीये
आणि चंद्रा तू लाग बघू ..... अमृताचे चांदणे पाझरायला
माझे खयाल घुटमळतात सारखे तेथे 'ज्या' पायांशी.......
तेच चालण्याकरता माझेच खयाल लागतात 'वापरायला'
का छळतात असे तुझे ते शेर माझ्या मनास नेहमी नेहमी....
वैभवा जिथे तुझी गझल लागते तिच्यात माझा रंग भरायला
___________________________________
प्रत्येक ओळीत ३६ मात्रा (.... प्रयत्न !!....)
निश्चित अशी 'ल-गा' वली नाही.................
अलामत= अ, अपवादात्मकरीत्या इ / उ .
तात्पर्यः गझल आहे कि नाही.............. माहीत नाही ............
गुलमोहर:
शेअर करा
वेगळीच पण छान गझल.
वेगळीच पण छान गझल.
मुटे सर: या रचनेस गझल
मुटे सर: या रचनेस गझल म्हटल्याबद्दल आभारी आहे
या दुर्लक्षीत रचनेचे "करू नका"............. असे सांगूनही 'उत्खनन' केल्याबद्दल धन्यवाद !!