आखाजी- अक्षय्यतृतीया

Submitted by सुजाता गायकवाड on 24 April, 2012 - 08:38

आखाजी

जसा वैशाख येतो लागते चाहूल आखाजी
मनी सासूरवाशीच्या पडे तव भूल आखाजी

मिळावा सोनियाचा दागिना नवरा तगादोनी
मिळे गंठण कुणाला,हार्,नथनी,डूल आखाजी

तुझ्या वाटेकडे डोळे कधीपासूनचे दादा
निघाला न्यावया भाऊ,उतरतो पूल आखाजी

तुझ्यासाठीच झोपाळा,तुझ्यासाठीच पक्वान्ने
तुझ्यापायीच अंगावर सुखाची झूल आखाजी

मिळे ऊर्जा पुर्‍या वर्षाकरीता एक दिवसाने
पुढे सांभाळणे आहे चुली अन मूल आखाजी.

--सुजाता कैलास गायकवाड

jh.jpg

गुलमोहर: 

तुझ्या वाटेकडे डोळे कधीपासूनचे दादा
निघाला न्यावया भाऊ,उतरतो पूल आखाजी

तुझ्यासाठीच झोपाळा,तुझ्यासाठीच पक्वान्ने
तुझ्यापायीच अंगावर सुखाची झूल आखाजी

मिळे ऊर्जा पुर्‍या वर्षाकरीता एक दिवसाने
पुढे सांभाळणे आहे चुली अन मूल आखाजी.>>

व्वा वहिनी

सासूरवाशी असे करा फक्त

तुझ्या वाटेकडे डोळे कधीपासूनचे दादा
निघाला न्यावया भाऊ,उतरतो पूल आखाजी

तुझ्यासाठीच झोपाळा,तुझ्यासाठीच पक्वान्ने
तुझ्यापायीच अंगावर सुखाची झूल आखाजी

-मस्त.

व्वा व्वा वैनी!!!
<<तुझ्या वाटेकडे डोळे कधीपासूनचे दादा
निघाला न्यावया भाऊ,उतरतो पूल आखाजी<<

क्लास गझल ! Happy

जगावेगळा रदीफ + नितान्तसुन्दर काफिया + कमालीची गझलियत + वृत्तावर हुकूमत

________/\___________

जबर्दस्त मुसलसल गझल !!

डॉक. कैलास गायकवाड यान्ना : डॉ .साहेब तरहीसाठी खूप चॅलेन्जिन्ग म्हणूनच पर्फेक्ट गझल आहे ही......(वैयक्तिक मत)

कुणी वैशाख भिजवावा तसे ते काफिये होते
रदीफाने दिले मग केवड्याचे फूल आखाजी

मिळे ऊर्जा पुर्‍या वर्षाकरीता एक दिवसाने
पुढे सांभाळणे आहे चुली अन मूल आखाजी>>>>>>>>>>>>वाहिनी कळसाचा शेर लिहिला ..

गझल खूपच छान .

छान.

आजच मी_आर्याच्या लेखनावर मी लिंक दिलेली

मस्त !!!!!

मला आता इतक्या दिवसांनी लक्षात आले आहे की यातल्या एक मिसरा मी एका शेरात जवळ्जवळ जसाच्या तसा उचललाय

तुझ्या वाटेकडे डोळे बिजेपासूनचे दादा
जरी जमणार नसल्याचा तुझा आलाय सांगावा

वैनींना खास माझ्यातर्फे धन्स सांगा डॉ.साहेब
(लोक उगीचच आरोप करतात की मी बेफीजींचेच अनुकरण करतो म्हणून Wink )