एक देखणा सूर्योदय - रायगडावरून!

Submitted by आनंदयात्री on 19 April, 2012 - 23:53

नुकताच किल्ले रायगडावर जाण्याचा योग आला. त्यावेळी नगारखान्याशेजारून टिपलेला, तोरणा किल्ल्याच्या मागून होणारा हा सूर्योदय -

- नचिकेत जोशी

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

रायगडावरून दिसणारा सूर्य आणि रायगडावरील सूर्य अश्या दोघांना कितीही पाहावे तरी कमीच... अप्रतिम अनुभव... + १

शेवटचा प्रचि तर काय जबरदस्त आलाय. Happy

धन्यवाद दोस्तहो! Happy

कधी गेला होतास?
सेन्या, मागच्या शनिवार-रविवारी. (कवेने उत्तर दिलंच आहे, पण तरी. :P)

अप्रतिम फोटो रे मित्रा...खास करून शेवटचे दोन तर अगदी खास....
रायगडावरून बुधला व्यवस्थित दिसत नाही का...मला वाटत होतं जसं राजगडावरून त्याचा आकार नीट कळतो तसाच रायगडावरूनही असेल....
पण आजचा दिवस सार्थकी लावलास...फार सुंदर फोटो

सेना, हे लोकं १३-१५ एप्रिल ला गेलेले रायगड दर्शनाला. मुंबईहुन विवन, सानु, घारु, घारुची लेक हे अजुन काही माबोकर्स होते जोडीला.

ह्या वर्षिचा मुलांचा कँप किल्ले रायगड होता. एकुण ५२-५३ जणं होते. नचिकेत, विवन, घारु स्वयंसेवक गटात होते
>>>>

ह्या वर्षिचा मुलांचा कँप म्हणजे?? मायबोलीवरील मेम्बर्सच्या मुलांचा का? की इतर कोणाचा? कोणी अरेंज केलेला?

धन्यवाद दोस्त्स! Happy

सेन्या, किती प्रश्न अरे? Proud
अरे कॅप्टन उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांचा कँप नेतात. एकदा ते, कविता-विश्वेश आणि टीमने माबोकरांच्या मुलांसाठीही राजमाचीला नेला होता. तेव्हा आमची ओळख नव्हती, नायतर तेव्हाही गेलो असतो.
यावेळी माबोपैकी कविताने लिहिलंय तेवढेच होतो. बाकी नॉन-माबोकरच होते.

सारीका, आहे की इथेच! Happy

रायगड, तिथला राजमहाल, दफ्तर-कचेर्‍यांच्या इमारती, राज्याभिषेक ज्या राजदरबाराने अनुभवला ती जागा, नगारखाना, होळीचा माळ, सिंहासनाधीश पुतळा, तिथून दिसणारा सुर्यास्त, गंगासागर-कुशावर्त तलाव, सातमजली मनोरे, जगदीश्वर मंदिर, शिवसमाधी आणि खाली पाचाडला राजमाता आऊसाहेबांची समाधी यांचे आम्हां दुर्गभटक्यांच्या मनात एक चित्र कायम कोरलेले असते. अखंड महाराष्ट्राने नव्हे मानवजातीने नतमस्तक व्हावे अशी ही जाणत्या राजाचा पदस्पर्श लाभलेली पावन भूमी.

“प्रौढप्रताप पुरंधर… क्षत्रिय कुलवतंस… गोब्राम्हणप्रतिपालक, सिंहासनाधीश्वर… राजाधिराज… छत्रपती शिवाजी महाराज…. की जय!!!”

Pages