*** जीवनाचे रंग सारे....[ तरही ]

Submitted by अरविंद चौधरी on 19 April, 2012 - 08:30

*

हासते माझ्यावरी आयुष्य आता जाणवे
जीवनाचे रंग सारे बोलती माझ्यासवे

कोंबड्यांची झुंज एकांतात चाले अंतरी
जिंकतो हारून मी,गाऊ कुणाचे गोडवे !

थडकता माझ्या अपेक्षांच्या घरावर दामिनी
नाचले चमकून या डोळ्यासमोरी काजवे

आरती ओवाळली,केल्या सुखाच्या विनवण्या
लागली नाहीच दुःखाला करावी आर्जवे

साथ अंधारामधे सोडून गेली सावली
भेटतांना मी मला, डोळ्यात आली आसवे

तू अता आलीस जेव्हा पापण्याही आटल्या
कोरडे होऊन गेले हे फुलांचे ताटवे....

------- अरविंद

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

तू अता आलीस जेव्हा पापण्याही आटल्या

कोरडे होऊन गेले हे फुलांचे ताटवे....>>

चांगला शेर Happy

डोळ्यातून आली आसवे मध्ये काहीतरी वृत्त बदलले असावे बहुधा

नेहमीप्रमाणेच......... बेफिन्शी सहमत !!

जामोप्यांनी सुचवलेला बदल आमलात आणलात ते बरे केलेत.

बाकी मी किती दिवस वाट पाहत होतो की माझ्या शिवाय आणखी कोण या ओळींवर केव्हा एकदा तरही करतंय आणि मला ती वाचायला मिळतेय याची ...........आपण माझी प्रतिक्षा संपवलीत ..........आभारी आहे .
मला ही तरही खूप आवडली!!

बाकी मी किती दिवस वाट पाहत होतो की माझ्या शिवाय आणखी कोण या ओळींवर केव्हा एकदा तरही करतंय आणि मला ती वाचायला मिळतेय याची ...........आपण माझी प्रतिक्षा संपवलीत ..........आभारी आहे .
मला ही तरही खूप आवडली!!>>

चला वैवकू, आपण फर्माईश करताय तर मीही एक गझल पाडतोच या ओळीवर

हो थम्बीनच की.............
तसाही आपल्या शीघ्रगझलत्वावर माझां अतूट विश्वास आहेच म्हणा!!