मराठा इतिहास दिनविशेष - एप्रिल महीना ... भाग २

Submitted by सेनापती... on 14 April, 2012 - 19:53

मराठा इतिहास दिनविशेष - एप्रिल महीना ... भाग १

१५ एप्रिल १६४५ - शके १५५७ म्हणजेच इ. स. १६४५ च्या १५ एप्रिल रोजी वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी शिवाजी राजांनी स्वराज्य शपथ वाहिली.

३० एप्रिल १६५७ - शिवाजी महाराजांनी मुघलांच्या ताब्यात असलेल्या जुन्नरवर हल्ला करून ते लुटले.

२९ एप्रिल १६६१ - शिवाजी राजांनी फेब. ते मे १६६१ मध्ये ४ महिन्यांची कोकणात मोहिम काढली. त्यात त्यांनी श्रृंगारपुर २९ मे ला जिंकून घेतले.

१५ एप्रिल १६६७ - शिवाजी राजे आणि पुतळाबाई यांचा विवाह.

१५ एप्रिल १६७३ - स्वराज्याचे सरनौबत प्रतापराव गुजर यांनी बहलोलखान पठाण विरुद्ध मोठी लढाई जिंकली.

२४ एप्रिल १६७४ - भोर-वाई प्रांतामधला जिंकायचा बाकी राहिलेला एकमेव असा केंजळगड स्वतः शिवरायांनी राजाभिषेकाच्या ४२ दिवस आधी स्वारी करून जिंकला.

१७ एप्रिल १६७५ - फोंड्याच्या स्वारीमध्ये मराठा फौजांनी छत्रपति शिवरायांच्या उपस्थितीत किल्ल्याचा मुख्य बुरुज उडवला.

२१ एप्रिल १७०० - दख्खन स्वारीमध्ये औरंगजेबाने साताऱ्याचा किल्ला जिंकला. आता त्याने आपला सरदार फत्ते-उल-खान याला सज्जनगड जिंकण्यास पाठवले.

१८ एप्रिल १७०३ - महत् प्रयासाने औरंगजेबाने सिंहगड ताब्यात घेतला. गडाची व्यवस्था लावण्यात आणि पावसाळा संपायची वाट बघत तो तिकडेच ठाण मांडून बसला. पावसाळा संपला
की राजगडकडे कूच करायचा त्याचा मनसुबा होता.

१७ एप्रिल १७२० - बाळाजी बाजीराव यांच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहू महाराजांनी पेशवेपद बाजीरावास बहाल केले. हा सोहळा कर्‍हाड जवळील मसुरे गावी संपन्न झाला.

१५ एप्रिल १७३९ - वसई किल्ल्यावरील मराठ्यांच्या हल्यामध्ये पोर्तुगीज ऑफीसर पिंटो आणि सिलवेरा यांचा मृत्यू.

१७ एप्रिल १७३९ - छत्रपती शाहू महाराज आणि नानासाहेब यांची म्हैसळ गावी भेट.

२० एप्रिल १७४० - रावेरखेडी (सध्या मध्यप्रदेश येथे) मुक्कामी थोरले बाजीराव पेशवे यांची प्रकृति बिघडली.

१८ एप्रिल १७७४ - पेशवे सवाई माधवराव यांचा किल्ले पुरंदरावर जन्म.

१६ एप्रिल १७७५ - आनंदीबाईसाठी फितूरी करणाऱ्या येसाजी विश्वासराव आणि रामचंद्र सावंत यांना अशेरीगडच्या किल्लेदाराने मारून टाकले.

२० एप्रिल १७७५ - नारो शंकर यांचे पुत्र रघुपंत नारायण यांचा पेशव्यांतर्फे जहाँगीर देउन सत्कार. नारों शंकर यांचा जानेवारी १७७५ मध्ये मृत्यू झाला होता. त्यांनी केलेल्या सेवेबद्दल त्यांच्या पश्चात् त्यांचा मुलाला जहाँगीर दिली गेली.

२१ एप्रिल १७७९ - सवाई माधवराव पेशवे यांची पुण्यामधील पर्वती येथे मुंज संपन्न.

१९ एप्रिल १८१८ - दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी किल्ले आणि महत्वाची शहरे ताब्यात घेतली. त्यात १७ एप्रिल रोजी नाशिक शहराचा पूर्ण ताबा कॅप्टन ब्रिजने मिळवला.

२२ एप्रिल १८१८ - दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात २२ एप्रिल १८१८ रोजी मात्र कर्नल मॅक्डोवेल याला त्र्यंबकगड घेण्यात अपयश.

२४ एप्रिल १८१८ - २४ एप्रिल १८१८ रोजी मात्र कर्नल मॅक्डोवेल याला त्र्यंबकगड घेण्यात यश.

तळटीप: सदर तारखा, प्रसंग मी विविध संदर्भ पुस्तकांमधून मिळवलेले आहेत...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी सविस्तर अशा नोंदी असून या विषयात रुची असणार्‍यांना हा घटनाक्रम पुढील अभ्यासासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल यात शंका नाही.

वर आबासाहेब यानी म्हटल्याप्रमाणे माझ्या मनी १६ एप्रिल १८०१ ची एका क्रूर शिक्षेची नोंद आहे. या तारखेला शनिवारवाड्यासमोर विठोजी होळकर याना हत्तीच्या पायी दिले गेले. ही घटना यशवंतराव होळकर याना दुसर्‍या बाजीरावाच्या विरूद्ध लढा पुकारण्यासाठी पुरेशी ठरली.

अशोक पाटील

छान संकलन, सेनापती :स्मित्त:
शिवशाहीत एप्रिल महीन्यात घडलेल्या आणखी काही महत्वाच्या घटनांची नोंद यात करता येईल.
३ एप्रिल १६६७ - आग्र्याला औरंगजेबाच्या कैदेत असलेले रघुनाथपंत व त्रिंबकपंत यांची सुटका.
१६ एप्रिल १६७३ - सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी हुबळी लुटली.
८ एप्रिल १६७४ - राज्याभिषेकाच्या आधी शिवाजीमहाराजांची चिपळूणच्या छावणीची पहाणी.
१८ एप्रिल १६७७ - त्र्यंबकपंत डबीर शिवापुरात वारले
२ एप्रिल १६७९ - संभाजीने भुपाळगड जिंकला.

छान उपक्रम सेनापती!
>>अगदी सविस्तर अशा नोंदी असून या विषयात रुची असणार्‍यांना हा घटनाक्रम पुढील अभ्यासासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल यात शंका नाही.<< +१