नेटवर अनेकदा स्त्री प्रोफाईलशी सामना होतो. त्या ख-या कि खोट्या याबद्दल मनात गोंधळ होतो. अशा वेळी काय करावं याबद्दल माझ्या अनुभवातून मायबोलीच्या सदस्यांना माहिती देत आहे. ( मी इथे नवीन आहे)
१) एखादं स्त्री प्रोफाईल खूप विनोद करू लागलं कि सावध व्हावं. ख-या स्त्रियांचं विनोदाशी वावडंच असतं. ( त्यांना विनोद आवडतात पण झेपत नाहीत आणि करता येत नाही हा कळीचा मुद्दा आहे )
२) स्त्री प्रोफाईल डिस्कशन फोरम मधे भाग घेतं आणि विद्वत्तापूर्ण भाषणं ठोकतं. प्रत्यक्षात स्त्रिया असे फोरम टाळतात. अशा ठिकाणी मतं देणं त्यांना जमत नाही.
३) स्त्री प्रोफाईल चित्कारण्याचे आवाज टाईप करतं. उदा. ईईईईईई किंवा शीईईईईईई असे. प्रत्यक्षात स्त्रिया कितीही कर्कश्श असतील तरी असं त्या लिहून दाखवत नाहीत.
४) बरेचदा फेक प्रोफाईल फोटो लावतं. प्रत्यक्षात स्त्रिया पानं, फूल, निसर्गचित्र, अॅक्ट्रेस यांची चित्रं लावतात. जुन्या परिचयाच्या स्त्रिया फक्त आपले जुने फोटो लावताना दिसतात. माझ्या माहितीत एक आज्जी आहेत त्या स्वतःचे दुरून काढलेले फोटो लावत असतात. क्वचितच फोटोवाल्या स्त्रिया ख-या निघतात. अपवाद असतोच तसं.
५) फेक स्त्रिया ताबडतोब लक्ष वेधून घ्यायला सुरूवात करतात. कविता, चित्रं असलं काही तरी टाकत असतात. प्रत्यक्षात स्त्रिया ओळखी झाल्याशिवाय असं वागत नाहीत.
६) खोट्या स्त्रिया कधीच कुकिंगबद्दल काही लिहीत नाहीत. ख-या स्त्रिया मात्र जुन्या असोत कि नव्या अशा ठिकाणी पटकन लिहीत्या होतात.
७) खोट्या स्त्रिया क्रिकेट बद्दल भरभरून बोलतात. ख-या स्त्रियांना ते आवडत नाही.
८) खोट्या स्त्रिया राजकारणावर मार्मिक कोट्या करतात. ख-या स्त्रियांना त्यातलं काही कळत नाही.
९) खोट्या स्त्रिया अर्थकारणावर बोलतात. ख-या स्त्रियांना त्यात काही रस नसतो.
१०) खोट्या स्त्रियांना अपराधी भावना असते. त्यातून त्या सारख्या क्षमा मागतात. क्षमा मागणे हे ख-या स्त्रीचे लक्षण नाही. म्हणतात ना, मॅन लर्न्स फ्रॉम हिज मोस्टेक्स.....नॉट वूमेन !
वरील दहा टिपा समजून घेतल्या तर तुम्हाला खोट्या स्त्रिया ओळखता येणं कठीण नाही. ओळ्कहल्यावर त्यांना तसं कळू देऊ नका. फक्त निरीक्षण करत रहा. त्यांचे हेतू तपासून पहा. काही दिवसांनी त्या ख-या कोण हे आपोआपच कळून येइल.
धन्यवाद.
सुंदर बापट
विश्ल्या एकाबरोबर अनेकांची
विश्ल्या एकाबरोबर अनेकांची मळमळ पडतेय बाहेर
प्रगो - अॅडमिनांची परवानगी लागत नाही. सुंदर बापटांचा हात डोक्यावर असला की बास.. सगळंच लिंगनिरपेक्ष
गरजूंनी वाट्टेल ते घ्या.
वगैरे
दक्षे, इथे रोज ड्युआय काढून
दक्षे, इथे रोज ड्युआय काढून आचरट, अर्थहीन, बाष्कळ बडबड करणारे धागे काढायचं पीक आलंय सध्या. जाउदेत ना. कशाला टीआर्पी वाढवायचाय? या लोकांना फक्त इतरांच्या झुंजी लावून देऊन मजा बघायची आहे...
जल्ला आज कित्त्ती कित्ती
जल्ला आज कित्त्ती कित्ती दिवसानी पह्यल्या पाणावर आले तर लईच मनोरंजक मजकुर दिसुन राह्यला की राव.
बापट तुमचा लेख अगदीच पटला हो. अगदी १००% पटला. आणि त्यामुळे मी सगळीकडे आता -पानं फुलं लाऊ की काय प्रोफाईल फोटु म्हणुन हा विचार कराले लागले.
बघा ना इतकं तुमी समाजकार्य करताय लोकास्नी सावध करायच कार्य हाती घ्येतलय तर इकडच्या पोष्टी वाचुन माला तर "ज्याच करायला जाव भल......" असलंच दिसतंय की.
पण तुम्ही मनावर घेऊ नका असले प्रयत्न चालूच ठेवा. नव्या उमेदीनं लिहा.
रच्याकने तुम्ही नक्की कंच्या प्रोफाईलच्या मागे लागल्यावर तुमचं असं झालय हो? म्हणजे मानसिक धक्का बसाय ते हो.
लोक्स जरा समजुन घ्या की मानशिक दृष्ट्या शिक हायेत ते कंच्या तरी फेक स्री प्रोफाईलमुळे. त्यामुळे त्यांच असं झालय. आपण सगळ्याम्नी त्याना मदत करायला हवी नायतर हायेच आपलं "ज्ञानसाधना" .
बरोबर हाय का न्म्हाय.
आजारी मान्साले [ते पन मानशिक] या मायबोलीवर अशी वागनुक देत्यात व्हय र लोकानु.
ज्यांना कोणाला जालावर 'मला
ज्यांना कोणाला जालावर 'मला ओळखा पाहू' असे (अलिखित) खेळ खेळायचे असतील त्यांना ह्या टिपा उपयुक्त आहेत. मला स्वत:ला विनोद, अर्थकारण, राजकारण, विद्वत्तापूर्ण भाषण या मुद्यांना सणसणीत असे स्त्री अपवाद ठाऊक आहेत. त्यामुळे हा लेख 'पटणे' वा 'न पटणे' अश्या रीतीने मलातरी वर्गीकृत करता येत नाही. इतरांची मते वेगळी असू शकतात!
गा.पै.
फेक स्त्रिया ताबडतोब लक्ष
फेक स्त्रिया ताबडतोब लक्ष वेधून घ्यायला सुरूवात करतात. कविता, चित्रं असलं काही तरी टाकत असतात. प्रत्यक्षात स्त्रिया ओळखी झाल्याशिवाय असं वागत नाहीत.>>> आता यावरून हा फेक स्त्री आयडी आहे असा अंदाज लावायचा का? त्यांनी अर्ध्या तासातच लक्ष वेधून घ्यायला सुरूवात केलीय.
मान ना मान मै तेरा मेहमान
विचार करतोय, चांगभलं हा आयडी
विचार करतोय, चांगभलं हा आयडी कसा ओळखला होता बरं? आठवायला हवं

ती मात्र उलटी केस होती.
अनेकदा मुलं अशा मुलींच्या
अनेकदा मुलं अशा मुलींच्या मागे वेळ घालवतात. नंतर त्यांना जो मानसिक धक्का बसतो तो बसू नये म्हणून असा लेख लिहायला नको का ?
---- मुली शोधण्यासाठीच मुले येथे येत असतात का ?
दहा टिपा काढायला तुम्हाला असे किती वेळा मानसिक धक्के बसले आहेत ? लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा.
असे काय गैर लिहिले यांनी यात
असे काय गैर लिहिले यांनी यात की जुने मायबोलीकर ( नावे लिहायची जरुरी अज्जीबात नाही ) लगेच तुटुन पडले? की स्त्रियांवर टीका झेपत नाही ? की ड्यु आयडींविषयी उल्लेख केला गेला म्हणून झोंबले? की खरे नाव असले तरी मतेच पटली नाहीत ?
जुन्या हितगुजवर वर काय काय तमाशे होते ते बघितलेत अन अनुभवलेत की. फक्त वाचायचीच खोटी. जुन्या आयडींविषयी तर विचारुच नका. नव्या मायबोलीवर येतांना फक्त काना, मात्रा वेलांटी बदलायची आणी कमेंटस टाकायची, आपण फार्र फार्र एज्युकेटेड, रीऑलोस्टीक, विनोद कळणारे, व्हेरी व्हेर्री इम्पार्शल आहोत असा आव आणणारेही खूप पाहिलेत.
दुर्दैवाने याच घटनांमुळे मायबोली सोडली होती, पण आज अजूनही दिनेशजी सारखे व्यक्तीमत्व आदर्श म्हणून डोळ्यासमोर असल्याने परत यावेसे वाटले.
अर्थात स्त्रियांना मार्मिक विनोद कळत नाहीत हे खरे. कारण हळवेपना आणी विनाकारण गैरसमज करुन घेणे हा स्त्रियांचा स्थायीभाव असतो, त्याला मायबोलीकर स्त्रिया तरी कशा अपवाद असतील?
वरील लेखकाचा आयडी स्त्री की पुरुष हे सोडा पण काही गोष्टी तरी नाकारता येत नाही हे सत्य आहे.
आता राहिले माझ्या विषयी तर मी स्त्रीच आहे, वरील लेखकांची ड्यु नही ( सभासदत्व वेळ तपासुन बघा बरं का. )
वरील प्रतीसादात दिनेशजींचा
वरील प्रतीसादात दिनेशजींचा उल्लेख आलाय, आनी त्यामुळे जर दुखावले गेले तर खरच सॉरी अन तेही मनापासुन, कारण एक सच्चा माणुस बनणे फार अवघड असते, आणी ते काम ते करु शकलेत, त्यामुळे मायबोलीवर नुसतेच रोमात न रहाता ( ते ही जवळजवळ ९ वर्षे ) शेवटी सभासदत्व स्वीकारावेसे वाटले. माझ्या मतांमुळेही कुणाला राग आला असेल तर सॉरी.
त्यामुळे मायबोलीवर नुसतेच
त्यामुळे मायबोलीवर नुसतेच रोमात न रहाता ( ते ही जवळजवळ ९ वर्षे ) शेवटी सभासदत्व स्वीकारावेसे वाटले. माझ्या मतांमुळेही कुणाला राग आला असेल तर सॉरी.
------ वरिल पैकी दहावी टिप :स्मित:.... खोट्या स्त्रियांना अपराधी भावना असते. त्यातून त्या सारख्या क्षमा मागतात. क्षमा मागणे हे ख-या स्त्रीचे लक्षण नाही.
अनेकदा या स्त्रिया म्हणजे
अनेकदा या स्त्रिया म्हणजे पुरूषच असतात. पुरूष आयडी म्हणजे स्त्रिया असं आढळलेलं नाही. असेल तर माहीत नाही>>>>पुरुष आयडी कडे तुम्ही हा एका स्त्री चा आयडी असेल या संशयाने कधी पाहिले नसेल असे दिसते.
अनेकदा मुलं अशा मुलींच्या मागे वेळ घालवतात. नंतर त्यांना जो मानसिक धक्का बसतो तो बसू नये म्हणून असा लेख लिहायला नको का ?>>>> मुळात मुलींच्या मागे वेळ घालवावाच का? आणि वेळ घालवण्यासाठी नेट वर येत असाल तर समोरचा पुरुष किंवा स्त्री असेल तर त्याने काय फरक पडतो?
अहो ! मायबोलीकरांच्या माहीतीसाठी आणि त्यांना सावध करण्यासाठीच सभासदस्त्व घ्यावं लागलं. तसं लिहीता येत नाही ना..>>>> पण मायबोलीकरांनी आपणास कुठे विचारले आहे कि खोटा स्त्री प्रोफाईल कसा ओळखायचा ते?
ईथे लिंगनिरपेक्ष मैत्री आणि ओळखीच्या पानावर जाऊन या आधि....आपण आहात कुठे?
नाही मि. उदय. अपराधाची भावना
नाही मि. उदय. अपराधाची भावना आली किंवा समोरच्याचे मन दुखावले तरी काही स्त्रिया अथवा पुरुष सुद्धा माफी मागत नाहीत, कारण अहंभाव. मग त्यात स्त्री पुरुष भेद नाहीच, तो निव्वळ दुराभिमान.
राहिता राहिले रोमातील सदस्यत्वाचे, तर माझे लिखाण क्षेत्र हे मायबोलीवर काही छोट्या कविता, ललित व पाककृती यापुरतेच मर्यादीत होते, ते काही फार मोठे योगदान नव्हतेच त्यामुळे स्वत:ला मायबोलीकर कसे म्हणवुन घेणार?
अहो इथे मोठे मोठे कलाकार आहेत, लेखक आहे, प्रतिभाशाली कवी आहेत, त्यापुढे आम्ही स्वयंघोषीत काजवे काय चमकणार?
पण एका मराठी माणसाच्या कर्तुत्वाला जागुन अनेक मराठींनी दिलेली दाद आणी त्यांच्यात घडलेला मोकळेपणाचा आणी आपुलकीच संवाद यातुन मायबोली आकाराला आली पण तरीही माणसा माणसात दुरावा निर्माण झाला, आणी तो पाहिला म्हणुनच वरील प्रतीसादात मनातील विचार व्यक्त झाले आता तुम्ही अथवा इतर कुणी काहीही म्हणो, शेवटी विचार स्वातंत्र्य माझ्यासकट प्रत्येकाला, हो ना?
अत्यंत हृदयद्रावक! तुम्हाला
अत्यंत हृदयद्रावक!
तुम्हाला आलेले कटू अनुभव व त्यातून उत्पन्न झालेले हे लेखनमय रत्न वाचून गलबलून आले.
लिहीत रहा, समाजाला (या नेटवरच्या पडिक बरं का! बाहेरच्या समाजात असे काही बोलू नका. बाल मनावर विपरीत परिणाम होईल) योग्य दिशा दाखवत रहा. बाकी आयडीचा खेळ व त्यातून होणारा मनस्तःप तुम्ही सांगितला ते बरं झाले मी असल्या आयडी पासून दुर राहण्याची प्रतिज्ञा करतो.
सुंदर बापट सुंदर !!! खरे तर
सुंदर बापट सुंदर !!! खरे तर ख-या व सुंदर स्त्रिया नेट वर वेळ घाळवत नाहीत.
बाप्रे सारु : बर झालं
बाप्रे
सारु : बर झालं तुकाफुगे
सुंदर बापट जी मला अस वाटत
सुंदर बापट जी
मला अस वाटत आहे तुम्ही फेस बूक नावाच्या वादळात सापडला आहात वाटत कधीतरि.....म्हणुन ''खोट्या स्त्री प्रोफाईल्स'' हा लेख तुम्ही मा बो वर ( आपल्या माणसांना त्याची फसगत होवु नये म्हणुन टाकलात धन्यवाद )
सोनावणे
सोनावणे ------------"-----------------
काय !!!!!!
काय !!!!!!
इथं स्त्री आयडीमागे पुरूष
इथं स्त्री आयडीमागे पुरूष असावेत आणि ज्यांना पुरूष समजतोय त्या स्त्री असाव्यात असं वाटू लागलंय. ज्याला मित्र समजतोय तो प्रत्यक्षात एक सुंदर ललना असावी, काय सांगावं.. मी कोण आहे , हा कोण आहे, ती कोण आहे, ते कोन आहेत...हे बापट कोण आहेत
अरारारा .. गोंधळ नुस्ता.
( मानसिक धक्का वाचून सौम्य धक्का बसला.. टायमिंग हो )
माझे मन भरुन आले सगळॅ वाचुन
माझे मन भरुन आले सगळॅ वाचुन .....कीती तो अत्याचार पुरषांवर होत आहे....त्यांच्या भावनांशी खेळले जात आहे...कोणीतरी पुरुष बचाव मोहीम उघडायला हवी........हे नाय चॉल बे......... अन्याय हा अन्यायच असतो......या अन्यायाला वाचा फोडायलाच हवी.... असा मानसिक छळावाद थांबवा... हे प्रकरण युएन च्या दरबारात न्यायला हवे... गरीब बिच्चारे पुरुषांला फसवणे हे काय आहे...हे असे नाही पाहीजे.......असे होता कामा नयेच.....

.
.
.
.
.
.
.
.
सुन्दर बापट - तुम्ही जे
सुन्दर बापट - तुम्ही जे लिहिले ते इतराना पटत नसले तरीही (मलाही पटत नाही) लिहिल्याबद्दल खेद मानु नका. तुमचे अनुभव जरी कोणत्याही कारणाने आले असतिल तरी थोडेफार सत्य असावेत असे वाटते.
असो - जर तुम्ही संगणक उद्योगामधे (computer science) असाल तर हा एक machine learning (यान्त्रिक निष्कर्ष) साठी चान्गला अभ्यास-संशोधन प्रश्न आहे.
'सुंदर' म्हणजे स्त्री की
'सुंदर' म्हणजे स्त्री की पुरुष ?
'सुंदर' म्हणजे स्त्री की
'सुंदर' म्हणजे स्त्री की पुरुष ?
----- या प्रश्नाचे उत्तर मिळाल्यावर बापटांचा खरे अथवा खोटे असा पुढचा प्रश्न असायला हवा.
१. >>नेटवर अनेकदा स्त्री
१. >>नेटवर अनेकदा स्त्री प्रोफाईलशी सामना होतो. त्या ख-या कि खोट्या याबद्दल मनात गोंधळ होतो. अशा वेळी काय करावं याबद्दल माझ्या अनुभवातून मायबोलीच्या सदस्यांना माहिती देत आहे.<<<<
सुंदर बापट, तुमचा मा. बो. चा लेख एकदम हास्यास्पद वाटला. तुम्ही नेटचा उपयोग "स्त्री प्रोफाईल शोधण्याकरत असाल " तर तुम्ही प्रचंड संभ्रमात आहात. आणि तुम्ही नेट चा वापर "त्या" करणा करता करत असाल, तर स्वतः वेळीच सावध व्हा, आणि मग इतरांना सावध करा.
"व्हॉट आर जेंडर स्टिरिओटाईप्स
"व्हॉट आर जेंडर स्टिरिओटाईप्स अँड हाऊ टू राईट समथिंग लेडन वुइथ दोज?" याचा (एक) आदर्श वस्तुपाठ. अभिनंदन.
It's so annoying knowing that
It's so annoying knowing that all the fake girls get all the lovely guys and it's effortless for them.
आत्ता संदर्भ लागला... ठाणे
आत्ता संदर्भ लागला... ठाणे येरवडा शटल !!
इथंही आठवण निघाली होती तर

करमतच नाही पॅसेंजर्सना
Kiran.. त्या शटलीला दोन
Kiran.. त्या शटलीला दोन प्रकारची पाशिंजरं असतात. तुम्हाला कुठली म्हणायचीयेत?
आ.न.,
-गा.पै.
^^ @निशदे प्रश्न कळ्ळा
^^
@निशदे
प्रश्न कळ्ळा नाही.
रच्याकने , तुम्ही घाईत नाही ना आता ?
Kiran.. , अहो, मी आणि निशदे
Kiran.. ,
अहो, मी आणि निशदे एकमेकांचे अवतार नाही आहोत.
असो.
ठाण्याहून येरवड्याला जायची किंवा यायची इच्छा अजिबात नाही. घाई तर दूरच!
कुतूहल मात्र जरूर आहे. दोन्ही ठिकाणी तुरुंग आणि वेड्यांची इस्पितळे आहेत. म्हणून म्हंटलं शटलीला दोन प्रकारचे प्रवासी असतात! 
आ.न.,
-गा.पै.
Pages