रानवाटा प्रस्तुत "आरंभ" - छायाचित्र प्रदर्शन

Submitted by जिप्सी on 20 March, 2012 - 23:48

रंगीबेरंगी गुढ्यांनी चैत्रपाडवा दंगला
ठाणे कलाभवनात छायाचित्रांचा खेळ रंगला

रानवाटा प्रस्तुत "आरंभ" - नवीन कलाकारांना रंगमंच देणारे छायाचित्र प्रदर्शन.
"रानवाटा" छायाचित्र कार्यशाळेचे आयोजन करून नवीन कलाकार घडवत असते. या सर्व नवीन कलाकारांना त्यांची कला दाखवण्याची संधी मिळावी म्हणून रानवाटा तर्फे त्यांनी काढलेल्या छायाचित्राचे प्रदर्शन "ठाणे कलाभवन" येथे भरवले आहे. या प्रदर्शनामध्ये जवळपास ५०० छायाचित्रे वेगवेगळे विषय, छायाचित्रकारांच्या कल्पनेतून मांडण्यात आले आहेत.

"रानवाटा" संस्थेतर्फे हौशी छायाचित्रकारांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन "ठाणे कलाभवन" मधील तीनही दालनांमध्ये येत्या २३ ते २५ मार्च दरम्यान भरवण्यात येत आहे. १०० नवोदित छायाचित्रकारांची एकूण ५०० छायाचित्रे या प्रदर्शनात मांडण्यात येणार असून त्यात देश-विदेशातील पर्यटनस्थळे, वन्यजीव, कोकण, स्थापत्यशास्त्र, निसर्ग, चाकोरीबाहेरील छायाचित्रे यांसारख्या विविध विषयांवरील छायाचित्रांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे छायाचित्रांसोबतच ती घेण्यासाठी जुन्या काळात वापरले गेलील जुने व काळानुसार सुधारणा झालेले नवीन कॅमेरे आणि त्यांची थोडक्यात तांत्रिक माहितीसुद्धा प्रदर्शनामध्ये मांडण्यात येणार आहे. त्याचसोबत प्रदर्शनानंतर छायाचित्रण कार्यशाळेचेसुद्धा आयोजन करण्यात आले आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार श्री संजय केळकर यांच्या हस्त होणार असुन कॅमेरा उत्पादनात अग्रगण्य असलेली कॅनन कंपनी मुख्य प्रायोजक आहे. सदर प्रदर्शन विनामूल्य असून सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहे.

मायबोलीकर आल्हाद पाटील, राहूल०७, जिप्सी यांच्यासहित शंभर एक हौशी छायाचित्रकारांच्या छायाचित्रांच्या या प्रदर्शनाला सर्व मायबोलीकरांना अगत्य येण्याचे निमंत्रण. गेल्या प्रदर्शनाला मायबोलीकरांनी भरघोस प्रतिसाद दिला तसाच याही वेळेस द्यावा आणि आम्हा हौशी कलाकारांना पुढिल वाटचालीस शुभेच्छा द्याव्यात.

(मायबोलीकर ललिता-प्रीती, आनंदयात्री यांनी "आरंभ" ओळख आणि प्रेस रीलीज लिखाणासाठी मदत केल्याबद्दल मनापासुन आभार) Happy

या प्रदर्शनातील विविध छायाचित्रांची एक झलकः

गुलमोहर: 

मनःपूर्वक अभिनंदन, मित्रा!
सहीचे असणार ह्याहीवेळेच चे प्रचि!

मी येणार! Happy
ह्यावेळेस "करेक्ट- न ब्लर होता" फोटू क्लिकून मिळंल काय?? Wink

ह्यावेळेस "करेक्ट- न ब्लर होता" फोटू क्लिकून मिळंल काय??>>>>>नक्कीच Proud तो फोटो माझ्यावर उधार राहिला आहे. Wink

अरे वा! आली का इथे माहिती...
मी नक्की येणार, शक्य असल्यास स.कु.स.प. Happy

व्व्वा जिप्सी. मस्तच!!!
अभिनंदन आणि शुभेच्छा!!!
मी हे सगळ मिसतोय रे Sad

Pages