दिवस जसा येतो.....

Submitted by वैवकु on 16 March, 2012 - 03:44

दिवस जसा येतो मी तसाच घालवतो
तिच्याच आठवणी काळजात कालवतो

उदास रातदिवा त्यात आत वात तिची
तिलाच चेतवतो अन् तिलाच मालवतो

दिलीच नीज तरी पापण्यांत भीज उरे
तिच्यात काय कधी स्वप्नतरू पालवतो

हयात मी नसतो भेटते गझल तेंव्हा
तिचा खुमार-असर बंद श्वास चालवतो

----------------------------
खरी गझल इतकी विठ्ठलास आवडते
त्वरे तिच्यातच तो कारभार हालवतो

(चाल: झुकीझुकी सी नजर बेकरार है के नही )

गुलमोहर: 

मी सुन्न झालो आहे.

पुढचे चोवीस तास मी भूमीगत होत आहे ह्याची संबंधितांनी नोंद घ्यावी

उदास रातदिवा त्यात आत वात तिची
तिलाच चेतवतो अन् तिलाच मालवतो

कोपरापासून

(मी नमस्कार करत आहे, नाहीतर चेतवणे मालवणे याचा संबंध लागायचा)

धन्यवाद ठेवणीतल्या प्रतिसादांबद्दल !
अम्हाचसाठी आपण असे प्रतिसाद राखून आहात हे पाहोन बहु संतोष जाहला .

विदिपा :भूमिगत झालात असे समजले , दिवंगत झाला असतात तर पेढे वाटले असते मी
बेफीनाही घेउन जा हवंतर तुमच्या दोघात घनिष्ठ स्नेह आहे हे तुमच्या एकसारख्या प्रतिसादातून दिसतंचय.

खरी गझल इतकी विठ्ठलास आवडते
त्वरे तिच्यातच तो कारभार हालवतो

>>>

ह्या शेरावर खास पंढरपुराहुन .....वाहवा ...माशाहल्ल्या Light 1 ...क्या बात है ....असा प्रतिसाद आला आहे

माशाहल्ल्या >>

प्रगो, माशाल्ला म्हणायचे आहे का? माशा हल्ल्या म्हणजे विठ्ठलाच्या चेहर्‍यावरची माशीही हालत नाही असा अर्थ घेऊन ते पुन्हा रागावतील

काळजी घ्या

विदिपा :भूमिगत झालात असे समजले , दिवंगत झाला असतात तर पेढे वाटले असते मी>>>

दिवंगत झालो असतो तर बरे झाले असते, तुमच्या मानगुटीवर बसून हे 'प्रझल' चे खूळ तरी तुमच्या डोक्यातून उपसून काढले असते

'प्रझल' चे खूळ >>>

हे प्रझल काय असते ?

आम्हाला अप्रेझल माहीत आहे सध्या तेच चालु आहे Biggrin

खरी गझल इतकी विठ्ठलास आवडते
त्वरे तिच्यातच तो कारभार हालवतो

>>> मला भारीच वाटलाय हो ...पण कारभार गझलेत हालवने म्हणजे नक्की काय हे कलाले नाही ...न कळे बापडे ...आपल्या विठ्ठलाची लीला अगाध आहे Proud

या गझलेत जिथे जिथे 'ती' चा उल्लेख आहे तिथे गझल असा अर्थ काढणे अपेक्षित आहे ; अपवाद फक्त ......पालवतो या शेरात आहे .

दिलीच नीज तरी पापण्यांत भीज उरे
तिच्यात काय कधी स्वप्नतरू पालवतो

अधीच्या शेरांमधून असे सांगण्याचा प्रयत्न केलाय की दिवस कसा जातो आणि रात्र कशी...
या शेरात नीज दिली गेलीय म्हणजे ती सहज येत नाहीय आणि दिलीच तरी पापण्यातली भीज / ओल उरते ती जात नाहीय......... आणि जी काही उरतेय तेवढ्यावर स्वप्नांचं झाड पालवी धरत नाहीय

तात्पर्य : झोप मिळाली तरी स्वप्नं फुलत नाहीत त्यात अशी अवस्था गझलेशिवाय होऊन जाते असे म्हणायचे आहे .

हे प्रझल काय असते ? >>>>
"गझल तन्त्र :परिचय आशय विषय ' च्यावेळी त्यात असा प्रकार्बिकार काही दिला नव्हता गझलेचा नै??
तो द्यायला हवा होता नै ??
की दिला होता; पण माझ्या कडे असलेल्या प्रतीतून ते पान गहाळ झालं होतं बरं......नेमकं ??
(हल्ली मा.बो.च्या मुख्यपृष्ठावरून तो लेखच गहाळ झालाय म्हणे...... अख्खाच्याअख्खा !!!)

अवान्तर : हा प्रतिसाद एक स्वतन्त्र स्फूट म्हणून सहज खपेल नै??