माटटूपेट्टी डॅम व इको पॉईंट

Submitted by Yo.Rocks on 29 February, 2012 - 05:04

माटटूपेट्टी डॅम.. जिल्हा इड्डूकी.. या परिसराची ओळख करुन द्यायची झाली तर केरळमधील मुन्नारपासून अंदाजे १३ किमी अंतरावर.. १७०० मी. उंचीवर असलेले.. हिरव्यागार डोंगरांनी वेढलेले... 'शोला' फॉरेस्टच्या कुशीत असलेले.. निसर्गसौंदर्य अनुभवण्याचे एक उत्तम ठिकाण... याचपुढे काही अंतरावर इको पॉईंटसुद्धा आहे.. इथेही तुम्हाला डोंगरकाठचा जलाशय ही चीज काय असते ते अनुभवता येइल..

'माटटूपेट्टी डॅम' ची ख्याती तशी बरीच.. डॅम म्हटले की धरणातून सोडण्यात येणारे पाणी व त्यानुसार केली जाणारी वीजनिर्मिती हे नेहमीचेच.. पण याव्यतिरिक्त सांगायचे तर इथे असलेले 'इंडो स्वीस लाईव स्टॉक प्रोजेक्ट'.. (याबाबतीत मला नंतर कळले.. त्यामुळे काही बघता नाही आले.. कोणी गेले तर जरुर ते हुडकून काढा.. नि फोटो धाडा )..

मुन्नारमध्ये दिवसाची सुरवात अश्या काही दृश्याने होतच असते..
प्रचि १:

मुन्नारपासून मेटटापुट्टी डॅम परिसरात येतानाचा रस्ता एकदम मस्त.. ऐकू येणारी पक्ष्यांची गुंज... उंचच उंच झाडीच्या जंगला-जंगलातून जाणारा..अधुनमधूनच सुर्याची थेट नजरभेट करणारा... तर कधी चहाच्या शेतीने नटलेल्या हिरव्यागार डोंगरांचे सौंदर्य घडवणारा.. त्यामुळे हा १३ किमीचा प्रवास खूपच सुखावह ठरतो..

प्रचि २:

आमची 'मुन्नार' भ्रमंती सुरु होती ती ऑफसीजन मध्ये.. 'फेब्रु ते मार्च'.. पण इथे पोहोचलो तेव्हा परिसर गर्दीने फुलला होता.. गर्दी कोणाची तर आमच्यासारख्याच हनिमुनर्स लोकांची.. नि तात्काळ फोटो प्रिंटसकट काढून देतो म्हणत मागे लागणार्‍या फोटोग्राफर्संची..! सुरवतीला एका बाजूस खादाडी नि सटरफटर वस्तुंचे नेहमीचेच स्टॉल्स दिसतात.. पण हे सगळे सोडून डॅमवर न जाता थोडे बाजूला गेलो जिथे पाण्याचा काठ अगदी जवळ आहे.. शिवाय सावली देण्यासाठी काठावरची झाडे.. इथूनच लक्ष गेले ते समोर असलेल्या नैसर्गिक सौंदर्यावर.. लांबच्या लांब पसरलेला जलाशय.. त्याची राखण करणारे व गगनास भिडतील असे डोंगर नि यांच्याशी झटापटी करणारे पांढरे शुभ्र ढग.. एकदम मस्त..

प्रचि ३:

- -

प्रचि ४ :

- -

प्रचि ५:

इथे स्वतःचे फोटो काढून घेण्यासाठी बरेच चांगले स्पॉट आहेत.. जशे काठावर उन्मळून पडलेले वृक्ष..

प्रचि ६:

इथेच नवविवाहीत जोडयांचे - कपललोकांचे फोटो तेथील फिरते फोटोग्राफर काढत होते.. जल्ला अशी पोझ द्या तशी पोझ द्या.. आमचे मात्र समोरील जलाशयाचे सौंदर्य टिपणेच चालू होते.. त्यातल्या त्यात एकेरी फोटो काढले.. मग मला सभोवताली चालू असलेल्या इतरांच्या कंटाळवाण्या पोझेस बघून राहवले नाही.. सौं रॉक्स कडे कॅम दिला नि बाकीचे काय म्हणतील हा विचार न करता सरळ कठडयावर उभे राहून एक कसाबसा उडी फोटो काढून घेतला.. Proud अर्थात ट्रेकमार्क उडी जमली नाही.. Happy

प्रचि ७:

डॅमचा रस्ता सुरु होण्यापुर्वी सटरफटर खाणे विकणारी बरीच स्टॉल्स आहेत.. पण विशेष घेण्यासारखे काही दिसले नाही.. (खरेदीवर ताबा ठेवण्याचे प्रमुख अस्त्र 'घेण्यासारखे काही विशेष नाही' Proud )

इथे डॅमवर पर्यटकांची गर्दी असल्याने गाडी पार्कींगसाठी डॅमवरूनच सरळ पुढे जाउन काही अंतरावर रस्त्याच्या कडेला एक रांग दिसते.. डॅमवरचा पुर्ण रस्ता चालुन गेले असता पुन्हा खादाडीचे व शोभवंत वस्तूंचे स्टॉल्स सुरु होतात.. इथले नारळ पाणी जरुर प्यावे.. मस्तपैंकी गारेगार ! बाकी लाकडी वस्तूंचे स्टॉल्स बघून लगेच सावंतवाडीच्या मार्केटची आठवण येते.. इथे आम्ही घेतले फक्त होममेड चॉकलेट्स.. ! तिथूनच मग पुढचा रस्ता धरला जो इको पॉईंटवर जातो.. जर या माटटूपेट्टी डॅमच्या पाण्यात बोटींग करायची असेल तर या रस्त्याच्या सुरवातीलाच The District Tourism Promotion Council (DTPC) ने तशी व्यवस्था करून दिली आहे.. पण आमचा पुढचा दिवस हाउसबोट असल्याने इथे काहीच इंटरेस्ट वाटत नव्हता.. !

मेटटापुट्टी डॅमवरुन इको पॉईंटसाठी निघालो तेव्हा एक अशी जागा दिसली जिथून सुंदर नजारा दिसत होता..

प्रचि ८:

- -
इको पॉईंट आला की स्टॉल्सच्या रांगा सुरु होतात.. इथे काहींच्यामते बघण्यासारखे काही नाही.. काठावर उभे राहायचे नि जोरात साद घालायची.. लगेच समोरच्या जंगलमय डोंगररांगातून प्रतिध्वनी उमटतो.. आपणास ऐकू येतो खरा पण पर्यटकांची गर्दी कमी असेल तर तो शांततेत अनुभवताना परिणाम अधिक जाणवेल.. पण मला हा परिसर खूप आवडला.. तासनतास बसून रहायला आवडेल अशी जागा.. फक्त नको ती गर्दी नि नको ते स्टॉल्स.. ! लांबच्या लांब शोला फॉरेस्टने पांघरलेला जलाशयाचा एक काठ.. दुरवर दिसणारे नेहमीचे डोंगर.. नि बघत रहावा असा उनसावलीचा खेळ !

प्रचि ९: प्रतिध्वनी उमटवणारे समोरील डोंगर

प्रचि १०:

प्रचि ११:

प्रचि १२:

प्रचि १३: इथे पेडल-बोटींगसुद्धा करु शकतो..

प्रचि १४:

प्रचि १५:

प्रचि १६:

शेवटी कुठे नाही तर इथे आम्ही दोघांचा एकत्र असे फोटो काढून घेतले.. इथेपण फिरते फोटोग्राफर असतातच.. त्यांच्यापैंकी एकाकडून तात्काळ फोटो काढून घेतला (भाडे रु.२०/-) नि मग त्याच्याकडे माझा कॅम दिला नि १०-१५ फोटो मस्तपैंकी काढून घेतले.. Proud इथे एक विक्रेता १० रुपयाला बोरांच्या आकाराची स्ट्रॉबेरी विकत होता.. घरच्या शेतीची आहेत असे म्हटल्यावर विकत घेतले.. खरच चवीला खूप गोड ! तिथेच एका स्टॉलवर चुलीवरची मॅगी व पॅशन फ्रुट नावाचे फळ खाउन माघारी फिरलो.. निघताना वातावरण खूपच ढगाळ झाले.. इथे पावसाचा काही नेम नसतो.. त्यामुळे पावसाचे आगमन होण्याआधी आम्ही परतीचा रस्ता धरला..

प्रचि १७:

क्रमश :
(आगामी : केरळा हॉर्टीकल्चर गार्डन)

भाग १ : मुन्नार
http://www.maayboli.com/node/32878

गुलमोहर: 

तिकडे संसार थाटायचा असेल तर मुंबईतून सर्व किराणासामान घेऊन जा.

>>>> Biggrin काय प्रॅक्टिकल सल्ला आहे! जाऊ दे गं. अभी वो सातवे आसमान में है, जल्दी ही खुद-बखुद दाल आटे का भाव पूछने लगेगा. Happy

ए पण मला नाही आवडल मुन्नार
म्हणजे फोटो मध्ये छान दिसतय पण सगळ्या केरळ मध्ये हे अस्च आहे
तेच ते...आणि माझ्या मते हे तु फोटो काढलेस तो एकच स्पॉट पहाण्यासारखा आहे.
चहाच्या मळ्यात नाही गेलास का?
Sad

त्यापेक्षा मला कोडाईकॅनॉल आवडल

मामी Biggrin

सगळ्या केरळ मध्ये हे अस्च आहे.. तेच ते.. >> साहाजिकच आहे ते.. म्हणून मी तोचतोचपणा कटाक्षाने टाळला होता... Happy

खरेदीवर ताबा ठेवण्याचे प्रमुख अस्त्र 'घेण्यासारखे काही विशेष नाही'
>>
ह्या एका वाक्यावरुनच लक्षात येतंय दगड्या लवकरच दाले आटे का भाव पुछने लगेगा.. Proud

फोटो झकासच रे.

Pages