दुरावा

तुझी भेट झाली, किती काळ गेला
कपोली न लाली, किती काळ गेला

न वैशाख सरला, न अमृत बरसले
रिकाम्या पखाली, किती काळ गेला

न आली खबर ना तुझे पत्र आले
न ख्याली-खुशाली, किती काळ गेला

इथे अंतरी मेघ ग्रासे स्मृतींना
धुके भोवताली, किती काळ गेला

दुराव्यात मन पेट घेते कशाला
शरीरे विझाली, किती काळ गेला...


मॄण्मयी : चांगली जमलीय... मतला विशेष आवडला

    ================
    हीच शोकांतिका तुझी माझी
    काच शाबूत पण चरे होते

      -वैभव जोशी यांचा गझल अल्बम ’सोबतीचा करार’!
      प्रकाशन सोहळा : १ सप्टेंबर
      एस. एम. जोशी हॉल, पुणे



      मॄण्मयी, गझल आवडली.
      शेवटी 'शरीरे विझाली' पेक्षा''शरीरे निमाली' बरं राहील का?



      वाह..
      शरीरे साठी चिन्नुला अनुमोदन



      मृण्मयी, सुरेख!
      लगागा लगागा लगागा लगागा
      न वैशाख सरला, न अमृत बरसले - इथे वृत्त टिकले आहे का? एकदा पुन्हा बघणार का? चू.भू.द्या.घ्या.

      दुराव्यात मन पेट घेते कशाला
      शरीरे विझाली, किती काळ गेला...

      मला 'विझाली'च छान वाटतय!



      छान गझल! ख्याली-खुशाली शेर विशेष आवडला.

      शलाका - वैशाख मधेही वृत्त पाळले आहे. "न अमृत" - हे ल(न) गा(अ: पुढे येण्यार्‍या कठोर स्वरामुळे) गा(ल+ल) होते.



      @ daad
      न वैशाख सरला, न अमृत बरसले - इथे वृत्त टिकले आहे का?
      न वै शा ख सर ला, न अ मृत ब रस ले
      ल गा गा ल गा गा ल गा गा ल गा गा
      'मृ' या जोडाक्षरामुळे आधीच्या 'अ'वर आघात येऊन तो गुरू होतो.

      "किती मृण्मयीने सजवावे मातीला ह्या तुजसाठी ?
      दोन घडी तुज रिझवायाला किती जन्म शृंगार मला ?"



      प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे मनःपूर्वक आभार.

      विझाली / निमाली
      फरक अर्थछटेचा आहे. मला अभिप्रेत असलेला अर्थ - ती स्वतःस विचारते आहे की या दीर्घ दुराव्यात शरीरे, गात्रे कधीची विझून गेलेली आहेत तरीही हे मन का असे पेट घेते? 'निमाली' वापरल्यास मीलनाच्या तृप्तीने शरीरे निमाली त्याला खूप काळ होऊन गेला, मग आता हे मन का पेट घेत आहे हा अर्थ होईल. यात, माझ्या मते, विरोधाभास आहे. जर 'शरीरे निमाली' याला बराच काळ होऊन गेला असेल तर मग आसक्तीने मनाचे पेट घेणे साहजिक ठरेल. परंतु शरीर विझून गेले असूनही असे का व्हावे हा तिला पडलेला प्रश्न आहे. मात्र तिच्या लक्षात येत नाही की तिच्या प्रश्नातच त्याचे उत्तर दडलेले आहे. वास्तवात आग विझून गेलेली नसून धुमसत आहे व म्हणूनच मन पेट घेत आहे.

      "किती मृण्मयीने सजवावे मातीला ह्या तुजसाठी ?
      दोन घडी तुज रिझवायाला किती जन्म शृंगार मला ?"



      मृण-मयी, तुमच्या अर्थपूर्ण विवेचनाबद्दल धन्यवाद. वृत्ताबद्दल ज्ञानात नक्की भर पडली. विझाली हा नवा शब्द माहीत झाला.
      तुमच्या सहीमधल्या ओळी खूप सुंदर आहेत.



      सुंदर..!

      मी वैशाखातला दर्द, तू श्रावण हिरवागर्द..!



      आवडली. खास करून शेवटचा.

        ***
        ...s a Moebius signature. This is a Moebius signature. Th...



        मृण्मयी, धन्स. अब समझे. गजल खरच सुरेख झालीये.



        क्या बात है....!! खूप आवडली गझल स्मित



        वाह! क्या बात है!!
        परागकण



        सही !!!