खोटे चेहरे

Submitted by सांजसंध्या on 6 February, 2012 - 13:36

वृत्त : मालीबाला / मेनका

दूर जाता ओळखीने चेहरे
राहु दे दिलदार खोटे चेहरे

मी खुषीने ही कुपी सांभाळली
हासले तेव्हां कुणाचे चेहरे

वैर सोडा, धाडली होती पत्रे
विसरले रे, नेमके.. ते चेहरे

भरवशाने ज्यास दिधली कुंडले
मारण्या मज ते निघाले चेहरे

कोण चुकले, न्याय करतो, हा कुणी
आरसे लप_वून, सांगे चेहरे

यौवनाचे, ओसरे.. जेव्हां भारे
ऐकती ना मग तगादे, चेहरे

काहिलीने, जाळली माझी चिता
वेदना ठेवू'नि गे'ले चेहरे

सांजसंध्या विसरली रे या क्षणी
घाव गझलांनी दिलेले चेहरे

- संध्या

गुलमोहर: 

मेनका वृत्तात पहिल्यांदाच गझल लिहीलीये. (खूप दिवसांनी गझल लिहीलीये Happy ) दोन लघु = एक गुरू ही सूट जरा जास्तच वापरावी लागलीये. अन्यत्र यावर खूपच चर्चा झाल्याचं आठवतंय. सूचनांचं स्वागत आहे.

आठ कवितांचे बिल (फक्त वाचण्याचे) धाडण्यात येत आहे. सूचनांचा चार्ज वेगळा पडेल.

प्रतिसाद देतोय खरा, पण गझलेतलं मला काही कळत नाही. इतकंच म्हणायचं कि, कुठल्याही शहरात, गावात, गल्लीत, पेठेत, संस्थळावर , संस्थाळाबाहेर, अवकाशात, जमिनीवर, पाण्यात ही गझल वाचता येऊ शकेल आणि (आवडलीच तर ) आनंद घेता येईल. चौकटीत न बसणारं असं काही अनुभवायचं असेल तर त्यासाठी मनातली चौकट काढून टाकणे आवश्यक आहे.

गझल म्हणून कशी आहे यावर मी काहीच सांगू शकत नाही.

मस्त गझल
एक बाकी बर केलंत.वृत्ताचं नाव सांगितलंत.
मला मी केलेल्या गझलांच्या वृत्तांची नावेच माहीत नसतात आणि इथे इतर तज्ञ गझलकारही अभावानेच त्यांच्या रचनांच्या वृताचे नाव जाहीर करतात त्यामुळे माझ्यां सारख्या अज्ञांयास नीट शिकायला मिळत नाही
पण तुमचे आभार !!