माझा यावेळचा भारत दौरा आणि पुढचा न्यू झीलंडचा दौरा खुपच अविस्मरणीय झाला. पहिले कारण
म्हणजे तीन तीन गटग झाली,शिवाय यावेळी न्यू झीलंड मधे जास्त दिवस मुक्काम करता आला आणि लेकीसोबत मनसोक्त भटकता आले.
गेलो त्या दिवशीच, घरी बॅग ठेवली आणि लगेच ठाण्याला जिप्स्याचे प्रचि प्रदर्शन बघायला गेलो. त्याबद्दल त्याने लिहिलेच होते. मामी, मोनालि, इंद्रा पासून थेट पंत, सेनापती असे सगळे भेटले. आणि
माझा जूना मायबोलीकर मित्र, बाँबे व्हायकिंग सहकुटुंब आला होता. निव्वळ त्या गटगची बातमी वाचून तो आला होता. खुप छान वाटले सगळ्यांना भेटून. तिथेच निसर्ग उद्यानातल्या गटगची चर्चा झाली होती.
मग मी व्हीसाच्या मागे लागलो. माझे एमिरेटस चे बुकिंग होते आणि ते विमान फक्त मेलबर्न ला थांबणार होते. आणि तेच विमान पुढे ऑकलंड ला जाणार होते. निव्वळ या टेक्नीकल हॉल्ट साठी मल
ऑस्ट्रेलिया चा व्हीसा लागणार होता. ती सगळी कागदपत्रे थॉमस कुक कडे देऊन मी पूण्याला रवाना झालो.
पुण्याचे गटग पण अविस्मरणीयच झाले. दक्षिणावर सगळ्यांना आमंत्रण द्यायची जबाबदारी टाकली होती. ती तिने व्यवस्थित पार पडलीच, पण माझा आद्य मित्र गिरीराज ने पण आयत्यावेळी फोन करुन
अनेक जून्या मित्रांची भेट घडवली.
मायबोलीवर सर्वात पहिल्यांदा ओळख झालेली सई, जी एस, आरती, कूल, स_सा, अशा पहिल्या पिढीतल्या मायबोलीकरांपासून कूल, बेफी, आशू, मंजो असे सगळेच भेटले. मायबोलीकर मैतर आणि ऋचा यांच्यांशी पण बोलणे झाले. चंपक आणि चंपी पण फोनवर बोलले. शशांक शांकली शेवटपर्यंत माझ्यासोबत होते.
मग माझा आजोळचा दौरा सुरु झाला, मलकापूर, देवरुख, रत्नागिरी, मार्लेश्वर आणि संगमेश्वर असा प्रवास केवळ २ दिवसात आटपला. मार्लेश्वराची जत्रा असूनदेखील माझ्या मामाच्या ओळखीने दर्शनही झाले. त्याच्याच आग्रहावरुन मी संगमेश्वरच्या एका पुरातन देवळात गेलो.
आपल्या संभाजी महाराजांना, इथेच औरंगजेबाने अटक केली होती. देवळात, सहसा आपल्याकडे न दिसणारे कोरीव कम दिसते. मुघलांनी अनेक मूर्ती विद्रुप केल्या आहेत, तरीही तो परीसर अत्यंत रम्य आहे.
या देवळाबद्दल मी इथे वाचल्याचे आठवत नाही, त्या बाजूला गेल्यावर अवश्य भेट द्या या देवळाला. (संगमेश्वरच्या कसबा भागात अगदी आतमधे आहे हे.)
मला न्यू झीलंडचा व्हीसा मिळायला तसा वेळच लागला आणि ऑस्ट्रेलियाचा व्हीसा मिळवण्याएवढा वेळ नव्हता माझ्याकडे. मग थॉमस कूकच्या पायल देसाई, यांनी मला कॅथे पॅसिफिक वर एक सीट मिळवून दिली. त्याबाबत्त मी सुदैवी ठरलो, नाहीतर लेकीला भेटणे मला शक्य झाले नसते.
मग आमचे धारावीचे गटग झाले. प्रमोदकाका, नरेंद असे (मला) सिनीयर लोक तर भेटलेच पण नीधप, मामी, साधना, रीमा, ज्ञानेश पण भेटले. उजू थेट अंबरनाथहून आणि नितीन विरारहून आले होते. जागूची मात्र भेट नाही होऊ शकली.
ते आटपून मी रात्रीचे कॅथे पकडले. कॅथेची सेवा आणि जेवणही मस्त असते (म्हैसूर मसाला डोसा, सांबार, चटणी सकट होता.. ) सकाळी हाँग काँगला पोहोचलो. तिथे आयत्यावेळी व्हीसा मिळत असल्याने, तो घेऊन मी बाहेर पडलो (आणि अशा रितीने माझे पाय १९ व्या देशाला लागले.)
रेल्वेने हाँग काँग शहरात गेलो. हवामान फारच थंड होते, भ्रुरुभुरु पाऊसपण होता.
मग दुपारचे कॅथेचेच ऑकलंडचे विमान पकडले. तोही प्रवास दिवसाचाच होता, ढग नसल्याने पापुआ न्यू गिनीचा गूढरम्य प्रदेश विमानातून छान दिसला. पूर्वेकडे जाताना, रात्र तोकडी होते, ती पार पाडून ११ तासांच्या प्रवासानंतर ऑकलंड ला पोहोचलो.
ही माझी ऑकलंडला चौथी भेट असल्याने विमानतळावर येऊ नकोस असे मैत्रिणीला आधीच सांगितले होते. तिथून शटल करुन (हा टॅक्सीला उत्तम पर्याय आहे तिथे, आपल्यासोबत एखाद दुसरा प्रवासी असतो, पण टॅक्सीपेक्षा निम्मे पैसे पडतात.)
दुसर्या दिवसापासून लेकीसोबत भटकंती सुरु झाली. आधी इडन गार्डन या बागेला भेट दिली. एका बंद पडलेल्या दगडाच्या खाणीत ही बाग वसवलीय. पण यावर विश्वास बसू नये इतकी उत्तम राखलीय ती.
त्या त्या ऋतूप्रमाणे इथे फुले फुलतात. मला ट्यूलिप्स बघायची होती, पण त्यासाठी सप्टेंबर मधे तिथे जायला हवे. खुपच सुंदर बाग आहे ही. इथल्या डोंगरावर चढून, शहारचे सुंदर दर्शन घेता येते.
यावेळी रोटोरुआ या गावी जायचे होते (पुढे लिहितोच.) आम्ही सगळी मित्रमंडळी तिथे निघालो. सोबत ४ मूले (वय वर्षे ११ ते १५ ) त्यामुळे प्रवासत नुसती धमाल चालली होती. ऑकलंड सोडताना एक बाँबे नावाचे गाव लागते, तसेच रामारामा नावाचे पण गाव लागते. केंब्रिज नावाच्या गावात, चहापाण्यासाठी थांबलो.
आम्हाला रोटोरुआ गावात मुक्काम करणे भाग होते. या गावाचे नाव घेतले की जिओ थर्मल असेच शब्द आठवतात, पण तो भाग य गावापासून २८ किमीवर आहे. प्रत्यक्ष रोटोरुआ च्या जवळ काही गार्डन्स आहेत.
तसे ते गावही सुंदर आहेत. गावात अनेक मॉटेल्स आहेत, आणि खाण्यापिण्याच्या उत्तम सोयी आहेत.
तर त्या जिओ थर्मल म्हणजे भूगर्भातील हालचाली जाणवणार्या भागलाही आम्ही भेट दिली. तिथला हा लेडी नॉक्स गिझर. हा रोज सकाळी सव्वा दहाला गरम पाण्याचा फवारा सोडतो.
आणि तिथले मुख्य आकर्षण असणारा हा शँपेन् पूल
रोटोरुआ गावाजवळच एक मोठे सरोवर आहे. तिथल्या एका डोंगरावरुन त्याचे असे विहंगम दर्शन होते.
ऑकलंडचे प्राणीसंग्रहालय देखील प्रेक्षणीय आहे. प्राणी तर सुदृढ आहेतच आणि त्यांची तसेच प्रेक्षकांची सोय पण उत्तम आहे.
बीच म्हंटले की माझ्या मनात एक ठराविक दृष्य येते. पांढरी वाळू, निळा समुद्र आणि गरम हवा. त्यामूळे मित्रांनी बीच वर जायचे सूचवले त्यावेळी मी जरा नाखुषच होतो. पण वेस्ट ऑकलंडच्या बीचची ही भेट, माझ्या मनातले सर्व किल्मीष दूर करुन गेली. मी आजवर कधीही प्रत्यक्ष न बघितलेले एक दृष्य तिथे जवळून बघता आले. ( या फोटो वरून अंदाज करु शकाल ! )
शेवट्च्या दिवशी, लेकीला शाळेत सोडून मी ऑकलंड दर्शन ची टूर घेतली. त्यातल्या काही जागा मी बघितल्या होत्या पण म्यूझियम बघितले नव्हते. उत्तम व्यवस्था असलेले हे वस्तुसंग्रहालय बघण्यासारखे आहेच. तिथल्या कलाकुसरीच्या वस्तू आपल्याला तितक्याश्या आकर्षक वाटणार नाहीत पण तिथला ज्वालामुखी जागृत होण्याचा अनुभव घेण्यासरखा आहे. स्कार्स ऑफ द हार्ट असे समर्पक नाव असणारा, वॉर म्यूझियमचा विभाग मात्र, मन हेलावल्याशिवाय रहात नाही.
म्यूझियममधे अपूर्या प्रकाशामूळे फोटो नीट घेता येत नव्हते. त्यामूळे मी तिथे जास वेळ न घेता, तिथे बाजूलाच असणार्या विंटर गार्डन मधे गेलो, ती वास्तू मला कधीची खुणावत होती.
आणि व्हायचे तेच झाले, मी त्या ठिकाणी इतका गुंतलो की शेवटच्या बसची वेळ कधी झाली ते कळलेच नाही. (का गुंतलो असेन बरं ?)
मग ती रात्र मी ऑकलंड एअरओर्ट वरच काढायचे ठरवले (लेकीकडे जायला वेळ लागला असता.) इतर कुठल्याही विमानतळावर न बघितलेली एक सोय तिथे बघितली. प्रत्यक्ष विमान बोर्ड होत असताना, बघण्याची सोय तिथे केलेली आहे, पाहुण्यांना सोडायला आलेल्या मंडळींना तिथे बसून सर्व बघता येते. तिथेच मी झोप काढली. शॉवरची पण सुविधा आहे. ते सगळे आटपून बोर्ड बघितला तर माझे विमान लेट झाल्याचे दिसत होते. माझा हाँग काँगचा हॉल्ट फक्त १ तासाचा होता, त्यामूळे मला चान्स घ्यायचा नव्हता आधीच्या विमानात सुदैवाने एक सीट होती, तिथल्या स्टाफच्या सहकार्याने ती मिळवली, हाँग काँगला मस्त टाईमपास झाला (मायबोलीवर !!) अगदी शेवटी कळले की ते विमान बँग्कॉक ला उतरणार आहे. तिथे उतरल्यावर असे दिसले कि विमानात आम्ही फत ८ जण थेट प्रवासी होतो. आता असेच रिकामे उडणार असे वाटतानाच, एक यात्रा कंपनीची मराठी मंडळी विमानात चढली. मायबोलीकर काय करतील, असा कल्ला त्यांनी सुरु केला. हवाई सुंदर्यांना चक्क खांदे धरुन त्यांना बसवावे लागले. बायकांच्या गप्पा आणि पुरुष मंडळींचा "आनंद" सुरुच होता,
मग मुंबईत एका दिवसाचा मुक्काम करुन मी दुबईमार्गे नैरोबीला पोहोचलो. वाटेत आमच्या माऊंट केनया (आफ्रिका खंडातील दुसर्या क्रमांकाचे ऊतुंग शिखर ) चे असे दर्शन झाले.
तर एकंदर दौरा असा अगदी मनात आठवत राहण्याजोगा. म्हणजे दिन जो पखेरु होते,,, वगैरे वगैरे असा.
आता म्हणाल, कि हा लेख मी अगदी गुंडाळलाच.. तर मंडळी हि केवळ रिक्षा आहे. यातल्या एकेक ठिकाणाची भरपूर प्रकाशचित्रे घेऊन, भेटीला येतोच आहे..
दिनेशदा - 'आपला दिन जो पखेरू
दिनेशदा - 'आपला दिन जो पखेरू होते ' हा प्रकाश चित्रांचा खजिना म्हणजे खरोखरच आठवणींच्या पिंजऱ्यात कायमचा बंद करून ठेवावा असा कुबेराचा खजिनाच आहे.
आणि हो जर हा लेख गुंडाळला असेल तर आता सविस्तर प्रवास वर्णनाची अनुभूती लवकरच उलगडू दे.
आपल्या दौऱ्यात आपण पुण्यास जावून आलात वाचून देखील मन सुखावले. नयनरम्य प्रकाश चित्रांच्या दर्शनाने डोळे सुखावले . पुढील लेखाची आतुरतेने वाट पाहत आहे.
मस्त दिनेशदा. खुप खुप
मस्त दिनेशदा. खुप खुप आवडेश.
सविस्तर वर्णन तो मंगता ही है
अरे दा.. मस्त फोटो.. आपली
अरे दा.. मस्त फोटो..
आपली भेट झाली जीप्स्यामुळे नशीब माझे..
पण निसर्ग गटग हुकलेच थोडक्यात.. 
वा छान वर्णन आणी फोटो
वा छान वर्णन आणी फोटो
आहाहा!!!..मस्त दौरा झाला
आहाहा!!!..मस्त दौरा झाला नं...
अजून प्रचि अपेक्षित आहेतच...
पुढच्यावेळी भारत ट्रिप आखताना मला भेट द्यायला चायना किंवा हाँगकाँग मधे ब्रेक घ्याच!!!!!
दिनेशदा मस्त फोटो..! काश
दिनेशदा मस्त फोटो..! काश हमारीभी मुलाकात होती देस में..
आता एकेक करून प्रची बरोबर सविस्तर लिहा पण...
दिनेश, खरंच जाऊ नयेत असे
दिनेश,
खरंच जाऊ नयेत असे वाटणारे दिवस निघून जातात.
मात्र, अशा सुंदर प्रकाशचित्रांनी ते कायमचे स्मृतीमंजुषेत गोठवून ठेवलेत ही आनंदाची गोष्ट आहे.
सर्वच वर्णने आणि फोटो आवडले.
सय नाही जात, गेल्या दिसांची
येती न जाऊन जे दिस,
मन का पुकारे, त्यांस
दिस पाखरू जर असते,
पकडून मी ठेविता
पाळता त्यांना खुशीने,
मोत्यांचे दाणे देता
छातीशी जपता धरून
प्रतिमा तयांची जरी का,
लपवता नजरेसमोरून
हृदयी उमटली मूर्ती,
परंतु हटे न हटवून
परकेच म्हटले जरी ते
दिनेशदा डोळ्यावर विश्वास
दिनेशदा
डोळ्यावर विश्वास बसणार नाहीत इतकी सुंदर प्रचि आहेत. तुम्ही चांगले कुक आहात हे माहीत आहे.. पण फोटोग्राफी पण !!!
मस्त फोटो!!! दिनेशदा, पुढच्या
मस्त फोटो!!!
दिनेशदा, पुढच्या वेळी मेलबर्नला येण्यासाठी आत्ताच आमंत्रण देते आहे! नक्की या!
मस्त वर्णन आणि प्रकाशचित्रे
मस्त वर्णन आणि प्रकाशचित्रे !! किती दिवस होतात तुम्ही न्युझिलंड ला?
अप्रतिम, नेहमीप्रमाणेच !!! <<
अप्रतिम, नेहमीप्रमाणेच !!!
<< आणि अशा रितीने माझे पाय १९ व्या देशाला लागले. >> !!!!!!
दिनेशदा, सर्व फोटो छान आहेत.
दिनेशदा, सर्व फोटो छान आहेत. थक्स,तुमच्या ओल्या ह्ळदिच्या लोणच्यासाठि त्यामूळे काल हेद्राबादमध्ये आमच गटग झाल. अर्थातच तुमच्या मुद्देसूद रेसिपि, लेख ह्यावर चर्चा झाली. आणि आज सकाळि तुमचा इतका सुंदर ले़ख वाचायला मिळाला.
खूप खूप आभारि आहे. कारण काल दोन छान मा.बो. मेत्रिणी मिळाल्या. त्याच क्रेडिट तुम्हाला. कारण गितू ताईसाठि ओली हळद सुलतान बाजारमधुन मी घेऊन आली, आणि मग कालची भेट नक्की झाली. मी, गितूताई, निलमताई आणि त्यांच्या मुलांनी मिळून काल खूप मजा केली.
दिनेशदा, मस्त वर्णन. सगळेच
दिनेशदा, मस्त वर्णन. सगळेच फोटो खासच!!!!

पण, सविस्तर वर्णन आणि अधिक फोटो पाहिजेच
(आणि अशा रितीने माझे पाय १९ व्या देशाला लागले.)>>>>>>__/\__
आवडलं !
आवडलं !
मस्तच! फोटोही आणि वर्णनही
मस्तच! फोटोही आणि वर्णनही
छान लेखन दिनेशदा. आवडले 'दिन
छान लेखन दिनेशदा. आवडले 'दिन जो पखेरु होते'
प्रकाशचित्रे ही मस्तच!
मस्त.. आता सविस्तर लेख
मस्त.. आता सविस्तर लेख येऊद्या लौकर...
दिनेशदा...आपली भेट हुकली ह्या
दिनेशदा...आपली भेट हुकली ह्या वेळेस.... ( साबा न्ना बरं नाहिये)...
फोटो खुप सुरेख आहेत. बीच चा एकदम खास. लेकी बरोबर मजा केलेली दिसतिये!!!
केनिया बद्दल तुम्ही मागे कधी लिहिलं आहे का? असल्यास लिंक द्या ना!! नसल्यास लिहा. आफ्रिकन देशांबद्दल लिहाना.
माझी एक लॉयर मैत्रिण होती. तिचं बहुतेक बालपण आफ्रिकेत गेलं होतं. तिचे वडिल फॉरेन सर्व्हीस मध्ये होते. ती आफ्रिके बद्दल खुप गमती सांगायची. आफ्रिकन भाषेत बोलुही शकायची लिहु शकायची कारण तिचं शिक्षण तिथेच झालं. तिच्या बहीणीचा फोन आला की मला खुप गम्मत वाटायची. दोघी अगम्य भाषेत बोलायच्या. थोडं विषयांतर झालं. माफ करा.
मस्त फोटो.
मस्त फोटो.
मस्त ! मस्त !! मस्त!!!
मस्त ! मस्त !! मस्त!!!
दिनेशजी हे फोटो तर मस्त आहेत
दिनेशजी हे फोटो तर मस्त आहेत पण डोळे आजुन पुढच्या फोटोची वाट पहातायेत.
अप्रतिम फोटो. लेख तर छानच पण
अप्रतिम फोटो. लेख तर छानच पण यावर एवढ्यावर समाधान नाही. अजुन डिटेल लेख नी प्रचि हवेत
अप्रतिम फोटो. लेख तर छानच पण
अप्रतिम फोटो. लेख तर छानच पण यावर एवढ्यावर समाधान नाही. अजुन डिटेल लेख नी प्रचि हवेत स्मित>>>>>> अनुमोदन.
तुम्ही आता जेवढी सफर केलीत त्याचे हे अगदी 'मासले' / नमुना वाटावे एवढेच फोटो आहेत हे....... काहीच पोट भरले नाही याने....
दिनेशदा, १९ देशांची वारी
दिनेशदा, १९ देशांची वारी एवढ्या कमी वेळात. शिवाय जिकडे तिकडे गटग, आणी त्यात कुठेही गडबड नाही, गोधळ नाही. आमच्या पुण्यातल्या गटगच्या वेळी पाहिलेय ना कि नंतर एवढा प्रवास करायचा आहे ह्याचं टेंशन नाही.. ईतक्या शांतपणे सगळं करण्याचं सिक्रेट काय आहे जरा आम्हाला पण सांगा ना!
चार दिवसाचा प्रवास असेल तरी आम्हाला किती तयारी करावी लागते..:अओ:
बाकी फोटो प्रवासवर्णन ह्याविषयी ..... वरील सर्वांचे प्रतिसाद + १.
लेखांची वाट पाहतेय.
अप्रतिम फोटो आणि वृत्तांतही
अप्रतिम फोटो आणि वृत्तांतही छान.
नरेंद्र, मस्त रुपांतर.
नरेंद्र, मस्त रुपांतर. दोस्तानो हजाराच्या वर फोटो आहेत, म्हणून विभाग पाडतोय.
किरण, माझा आपला एम अॅंड शूट कॅमेरा आहे, पण दृष्येच सुंदर होती, ती.
वर्षू, आमच्या गटग मधे खुप आठवण काढली, हाँग काँग जमवायलाच पाहिजे आता.
वत्सला, मेलबर्नचा स्वतंत्र व्हीसा काढला असता तर लगेच मिळाला असता, पण ट्रांझिट हवा होता, म्हणून आधी न्यू झीलंडचा घ्यावा लागला. ऑस्ट्रेलियन दूतावासात आयरीस स्कॅन दिला आहे. पुढच्या वेळेस मिळेल लवकर.
अमया, आधी ४/५ दिवसच रहायचो तिथे. म्हणून लेक नाराज असायची. यावेळी चांगला १० दिवस राहिलो. तरीही नाराजच होती. तिला न सांगताच निघावे लागले. अजून कट्टीच आहे, माझ्याशी.
आर, झाले का लोणचे ? मी ते सुकवून ठेवलेय. अजून टिकलेय.
भाऊ, जिप्सी, काही लोकांच्या पायाला भोवरा असतो !!
मीरा, माझ्या जून्या रंगीबेरंगी पानावर आहेत ते लेख. dineshvs या नावाने लिहायचो मी.
प्रवासाचे काही वाटतच नाही आता, अजिबात कंटाळा येत नाही.
आणखी फोटो येताहेतच.
आपलि ह्यावेळिहि भेट हुकल्याचे
आपलि ह्यावेळिहि भेट हुकल्याचे दु:ख्ख होत आहे. पण वर्णन अगदि घरच्यांशि बोलल्यासारखे. फोटोहि ग्रेट.
मस्त फोटोस आणि वर्णन दिनेशदा
मस्त फोटोस आणि वर्णन दिनेशदा
फोटो आणि वर्णन दोन्हीपण खासच.
फोटो आणि वर्णन दोन्हीपण खासच. पुढच्या भरपूर फोटोंच्या प्रतिक्षेत.
वा! दिनेशदा सुंदर फोटो आणि
वा! दिनेशदा सुंदर फोटो आणि वर्णनही!
भेटीचा योग या वेळी नव्हता...खूप चुटपुट लागली.
Pages