आनंदी

पॅरिसमध्ये हिंडताना हे एक वृद्ध जोडपे रस्त्यावर व्हायोलिन आणि ऍकॉर्डियन वाजवताना दिसले. तसे रस्त्यावर वाद्य वाजवणारी लोकं वेगवेगळ्या तर्‍हेची असतात. अमेरिकेत बरेचदा हिप्पी प्रकारातली लोकं दिसतात. किंवा युरोपमध्ये सुद्धा उगाच गिटारच्या तारा खाजवत रस्त्यावर बसलेली लोकं दिसतात. काहीकाही जण मात्र अफलातून असतात. ऍमस्टरडॅम सेन्ट्रल स्टेशनच्या बाहेर बरेचदा तुम्हाला पुर्व युरोपातून आलेले वादक दिसतील. तिघे-चौघे मिळुन इतके अफलातून संगीत निर्माण करत असतात की कान तृप्त होतात.

तर पॅरिसमधील हे जोडपंच का लक्षात राहिलं? तर त्यांच्या चेहर्‍यावरुन आनंद अक्षरशः ओसंडून वाहात होता. जणु काही ते स्वतःसाठीच वाजवत होते. मी अर्धा तास त्यांचं वाजवणं ऐकत उभा होतो. पण एकदाही असे वाटले नाही की ते पैश्यासाठी वाजवत आहेत. केवळ स्वांतसुखाय.. अप्रतिम..

आणखी एक गोष्ट म्हणजे मला ह्या पुर्व युरोपियन लोकांचे संगीत ऐकताना नेहेमी शंकर जयकिशनच्या गाण्यांशी साम्य आढळते.. का कुणास ठाउक.. दोन्ही मध्ये ऍकॉर्डिअन हे मुख्य वाद्य होते की राज कपूरच्या समाजवादी चित्रपटांना संगीत देताना शंकर-जयकिशनने पुर्व युरोपातील साम्यवादी देशांमधील संगीताची पद्धत उचलली??

paris_couple.jpg


टण्या, मस्त फोटो. स्मित

रस्त्यावर वाद्य वाजविण्यामागे त्यांचा उद्देश स्वतः त्याचा आनंद घेणे आणि लोकांना आनंद देणे हाच असावा.
प्रीतम (लाईफ इन मेट्रो चा संगितकार... नाहीतर... विचाराल हा कोण? म्हणून आधीच क्लियर केलं फिदीफिदी)
असो तर सांगायचा मुद्दा हा की, त्याने ही थीम त्या सिनेमात वापरली आहे. But I am sure ह्या जोडप्यानं
वाजवलेलं संगित आणि प्रीतम ने मेट्रो मध्ये केलेली वाद्यांची 'बडवाबडवी' यात जमिन्-आसमानाचा फरक आहे.