केप टाऊन - निसर्ग सौंदर्याचा खजिना- भाग १

Submitted by शापित गंधर्व on 14 December, 2011 - 03:55

पण मी म्हणते इतकी घाई करायची काही गरज आहे का? आत्ताच आपण क्रुगरला जाऊन आलो ना? त्याचा हँगओव्हर तरी उतरला का? जाऊ नंतर सावकाश केव्हातरी...

बायकोच्या या वाक्यांनी क्षणभर माझ्या मनाची चलबिचल झाली. पण क्षणभरचं. डिसेंबर मधे केपटाऊनची ट्रिप करायच बर्‍याच दिवसांपासुन डोक्यात होत. डिसेंबरच का? एकतर सगळीकडे ख्रिसमसची धामधुम असते आणि दुसरं म्हणजे सुट्यांची चंगळ. कामाचा ताण अजिबात नसतो. आपण करु म्हटलं तरी गोरासाहेब करु देत नाही. Take it easy my boy, enjoy the festive season म्हणत आपल्यालाही त्याच्या हॉलिडे मुड मधे खेचतो. म्हणुन डिसेंबर.

बर्‍याच दिवसा पासुन डोक्यात जरी होतं तरी पुर्वतयारी अशी काही केली नव्हती. १६ ला सुट्टी होतीच, १९ ची आणखी एक सुट्टी टाकुन ५ दिवसची केप टाऊन ट्रिप करायचे पक्के केले. मग शोधाशोध सुरु झाली ती फ्लाईट तिकीटाची. अस्मादिकांना शेवटच्या क्षणी जाग आलेली. ख्रिसमस सिझनमुळे सगळ्या फ्लाईटस फुल्ल होत्या. अ‍ॅव्हिलेबल होत्या त्या अव्वाच्या सव्वा किमती सांगत होते ज्या माझ्या मध्यमवर्गीय खिशाला परवडणार्‍या नव्हत्या. शेवटचा पर्याय होता ड्राईव्ह करुन जाणे. जोहनसबर्ग ते केप टाऊन एका दिशेचा प्रवास १५०० कि.मी. बायकोला विचार बोलुन दाखवला तर...

अहो काय वेड लागलय का तुम्हाला?
अग पण आपण क्रुगरला गेलोच होतो ना ड्राईव्ह करुन?
अहो ते ५०० कि.मी. हे १५०० कि.मी. काही फरक आहे की नाही? एकटे कसे ड्राईव्ह करणार तुम्ही? जरा प्रॅकटीकल विचार करा...

मी पण मग थोडा विचारात पडलो.. खेचुन ताणुन १५०० कि.मी. कव्हर तर केले असते, पण तिथे पोहोचेपर्यंत इतका थकलो असतो की दिवस झोपुन काढावा लगला असता आणि सगळ्या ट्रिपचा विचका झाला असता.

मग एक चालुगिरी केली. माझ्या सारखाच एक वेडा फकीर शोधला आणि त्याला या ट्रिपसाठी तयार केले. दोन ड्रायव्हर असले की सहाजिकच बायकोचा विरोध मवाळ होणार होता. बरं पार्टनर पण असा शोधला की त्याची बायको माझ्या बायकोची खास मैत्रीण म्हणजे विरोधाची धार आणखी बोथट Wink

हो-ना करता करता अखेर बायकोने होकार दिला आणि १५ ला पहाटे निघण्याचा निर्णय पक्का झाला. पण म्हणतात ना, नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न. अखेरच्या क्षणी १५ च्या सकाळी ऑफिसमधे एक महत्वाची मिटींग स्केडुल झाली जी मी टाळु शकत नव्हतो. मिटींग संपवुन घरी परत यायला १:०० वाजला. मित्र आणि त्याची बायको आधिच येऊन बसले होते. आमच सगळ सामान पण मित्राच्या गाडित भरुन ठेवलं होत. मग मी पण पटापट आवरलं आणि साधारण २:१५ ला आम्ही केप टाऊनच्या दिशेने आमचा प्रवास सुरु केला.

प्रवास सुरु केला तेव्हा १५०० कि. मी. खुपच वाटले होते. पण रस्ता एकदम मस्त होता. १२० ची स्पिड लिमीट असुनही योग्य तिथे कळजी घेत, स्पिड कॅमेरे चुकवत १६० कि.मी. च्या वेगाने आम्ही पुढे सरकत होतो. सुरवातीचे काही तास वगळता सगळा प्रवास रात्रीचाच झाला. तीन ठिकाणी पेट्रोल/जेवणाचे स्टॉप सोडले तर इतर कुठेही न थांबता सकाळी साधारण ६:०० वाजता आम्ही केप टाऊनला पोहोचलो. हॉटेल मधे चेकइन केल आणि सरळ पडी मरली.

साधारण दहा साडे दहा ला उठलो आणि सगळ आवरुन १२:०० च्या दरम्यान बाहेर पडलो. आजचा पहिला स्पॉट होता "व्हिक्टोरीया अ‍ॅन्ड अल्फ्रेड वॉटरफ्रंट". शहरच्या मधोमध असलेले हे सगळ्यात बिझी हार्बर आहे. भरपुर रेस्टॉरंटस आणि शॉपिंग मॉल्समुळे इथे खुप गर्दी होती. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या बोटींग राइड्स आणि हॅलिकॉप्टर राइड्स करता येतात.

व्हिक्टोरीया अ‍ॅन्ड अल्फ्रेड वॉटरफ्रंट

प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
प्रचि ८ केप टाऊन स्टेडियम - खास २०१० च्या फिफा वर्ल्डकप साठी बांधलेले
प्रचि ९ मध्य भागी आडवा दिसतो तो टेबल माउंटन, सगळ्यात उजव्या बाजुला आहे ते लायन्स हेड आणि त्याच्या जरा डाव्या बाजुला लहान टेकडी दिसते ती सिग्नल हिल.
प्रचि १०
प्रचि ११ हा सी इगल सारखा सारखा समोर येऊन माझा पण एक फोटो काढ म्हणुन रडत होता Wink

आमचा आजचा पुढचा स्पॉट होता "चॅपमन्स पिक". केप टाऊन पासुन सधारण १५ कि. मी. दक्षिणेस असलेला हा खुपच सुंदर ड्राईव्ह आहे. रस्त्यात जातांना मधे "हाऊट बे" लागतो.

हाऊट बे
प्रचि १२
प्रचि १३
चॅपमन्स पिक
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८

काल रात्रभराच्या जागरणामुळे खुपच थकलो होतो. म्हणुन मग आज जास्त त्रास करुन न घेता सुर्य मावळायच्या आत हॉटेलवर परतलो आणि आराम केला.

क्रमशः

केप टाऊन - निसर्ग सौंदर्याचा खजिना- भाग २ - केप पॉईंट आणि केप ऑफ गुड होप
एक झलक Wink

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

वा``````````````````````````````ह!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
कमाल सुंदर फोटो आहेत हे. Happy
तुमचे क्रुगरपार्कचे फोटोदेखील मस्त होते.

गंधर्व, खूप खूप छान ! माझं स्व्पन आहे कि अफ्रिका ला जावे. तुम्हि तिथे आहात्..छान्..खूप मजा करा..
क्र्रुगर ची ट्रिप पन छान वाटली. सेरेनगेटि चा प्लान कधी ?

मस्तच फोटो. चॅपमन्स पिक सुंदरच दिसतय.

रच्याकने इतका सुंदर स्वर्ग बघितल्यावरही अजून स्वतःला शापित म्हणवता? Happy

धन्स दोस्त लोक्स.
काही फोटोंमधे सारखे पणा वाटतोय?...पॉइंट टेकन...पुढच्या भागात काळजी घेतो.

सुंदर फोटो.
निळाई फोटोशॉपमधून दिलेली आहे कि??
कारण काही फोटोत लिनीअर तर काही फोटोत रॅडिअल दिसत आहे. (प्रचि २० आणि २३).

निळाई फोटोशॉपमधून दिलेली आहे कि??>>> नाही. फोटो मधे काहिही एडिटींग नाही केल. CPL फिल्टर वापरला आहे लेन्स वर.

सेरेनगेटि चा प्लान कधी ?>>> लवकर माहिती पुरवा. चार दिवसांची सुट्टी आहे या विकांताला. लगेच उरकुन टाकतो सेरेनगेटि.

मी पण झब्बु टाकणार!!>>> चिंगी झब्बु आवडला. तिन दिवस सतत कॅम्स बे ला जात होतो एकदातरी टेबलक्लॉथ दिसेल म्हणुन. पण छे. नाहिच दिसला Sad

mastach.. nilyaa samudrache photo tar sahich.. fkt kahi photot sarkhepana janavtoy..>> ...पुढच्या भागात काळजी घेतो.

मी कालपासून आठवायचा प्रयत्न करतोय.
एक सिनेमा आहे, त्यात बराच वेळ हा डोंगर मागे दिसत राहतो. मला नाव आठवत नाही.

वॉव... सिंपली ऑसम... समुद्राचा निळा रंग किती मनमोहक आहे!!! ,सुर्रेख फोटोज ,जोडीला सुंदर वर्णन ही Happy

सही आहे !! तो चॅपमन्स पिकचा रस्ता एकदम इथल्या(कॅलिफॉर्नियातल्या) पॅसिफिक कोस्टल हायवे १ सारखा आहे! फक्त समुद्राचे पाणी जास्तच नीळे वाटले.. Happy

सुंदर.

चटपटीत वर्णन !
असं वाटलं कि समोर बसून बोलत आहेस .
प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे एक स्त्री असते आणि तुमच्या सारख्या भ्रमान्तिकार मागे आहेच . संधीचा पुरेपूर उपयोग .
जियो! जिंदगी न मिलेगी दोबारा

वाह ! अतिशय सुंदर आहेत प्रचि..
वॉटर फ्रंटला गोविंदाच्या कुठल्यातरी सिनेमाचं शूटिंग झालेलं, शिकारी नावाचा आहे का सिनेमा ?

Blouberg च्या रस्त्यावर Seafront Road (M14).
इथून सिग्नल हील आणि लायन्स हेड एकाच दिशेला दिसतात.
बीचवर गर्दी जवळ-जवळ नव्हतीच.
आज सदरलँडला आहे - इथे सॉल्ट (SALT) आहे - दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठा ऑप्टीकल टेलेस्कोप.
cP4149212.JPG

Pages