धाड वार्‍यातून थोडी मखमली सळसळ इथे

Submitted by बेफ़िकीर on 13 December, 2011 - 04:04

धाड वार्‍यातून थोडी मखमली सळसळ इथे
लावली आहे स्मृतींची बोचरी हिरवळ इथे

तू पुन्हा येशील या भीतीमुळे येते अता
यायची केव्हातरी विरहामुळेही कळ इथे

जर तुझे नि:श्वास परक्याच्या मिठीने गंधती
का मला भंडावतो मग हा तुझा दरवळ इथे

मी कधी आलेच नाही ना तुला भेटायला
व्यक्त कर केव्हातरी येऊन ही हळहळ इथे

वाट मदिरेची स्मशानालाच जाते शेवटी
ते वळण येईल आपोआप सध्या वळ इथे

मी मनांची ओल शोधत पुटपुटत रेंगाळतो
'याइथे पाणी असावे... ऐकली खळखळ इथे'

फक्त तेव्हा शेर होतो शेर म्हणण्यासारखा
आपले आयुष्य जेव्हा वाटते निष्फळ इथे

हुंदका आला तरी जाणीव ना होवो मला
आसवे येतात तेव्हा पावसा कोसळ इथे

या मनाच्या मोसमांचे चक्र सोसावे कसे
एकदा उत्साह येतो एकदा मरगळ इथे

सोडुनी लज्जा खरे ते चित्र मी रेखाटले
जो खरा गंभीर त्याला मानती अवखळ इथे

दोष लोकांचा नसावा ... ते खरे बोलायचे
वाटते आता मलाही आपली अडगळ इथे

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

तू पुन्हा येशील या भीतीमुळे येते अता
यायची केव्हातरी विरहामुळेही कळ इथे

क्या बात है !

मी मनांची ओल शोधत पुटपुटत रेंगाळतो
'याइथे पाणी असावे... ऐकली खळखळ इथे'

वाव्वा.. बढिया !

फक्त तेव्हा शेर होतो शेर म्हणण्यासारखा
आपले आयुष्य जेव्हा वाटते निष्फळ इथे

सुरेख.

संपूर्ण गझल आवडली. आवडत्या दहात.
तुमचे शेर अधिकाधिक टोकदार होत चाललेले पाहणे आनंददायक आहे. Happy

व्वाह!!!

तू पुन्हा येशील या भीतीमुळे येते अता
यायची केव्हातरी विरहामुळेही कळ इथे
सुंदर!

मी कधी आलेच नाही ना तुला भेटायला
व्यक्त कर केव्हातरी येऊन ही हळहळ इथे

वाट मदिरेची स्मशानालाच जाते शेवटी
ते वळण येईल आपोआप सध्या वळ इथे
>> सहज!

मी मनांची ओल शोधत पुटपुटत रेंगाळतो
'याइथे पाणी असावे... ऐकली खळखळ इथे'

फक्त तेव्हा शेर होतो शेर म्हणण्यासारखा
आपले आयुष्य जेव्हा वाटते निष्फळ इथे
>> अप्रतिम!

प्रामाणिक वाटले शेर!
धन्यवाद! Happy

धाड वार्‍यातून थोडी मखमली सळसळ इथे
लावली आहे स्मृतींची बोचरी हिरवळ इथे......आहाहा....क्या बात!

तू पुन्हा येशील या भीतीमुळे येते अता
यायची केव्हातरी विरहामुळेही कळ इथे.....आरपार....

जर तुझे नि:श्वास परक्याच्या मिठीने गंधती
का मला भंडावतो मग हा तुझा दरवळ इथे......सही!

मी कधी आलेच नाही ना तुला भेटायला
व्यक्त कर केव्हातरी येऊन ही हळहळ इथे.... किती सहज सुंदर..

वाट मदिरेची स्मशानालाच जाते शेवटी
ते वळण येईल आपोआप सध्या वळ इथे....सिंपली ग्रेट!

मी मनांची ओल शोधत पुटपुटत रेंगाळतो
'याइथे पाणी असावे... ऐकली खळखळ इथे'......अप्रतिम!

फक्त तेव्हा शेर होतो शेर म्हणण्यासारखा
आपले आयुष्य जेव्हा वाटते निष्फळ इथे...... लाईफ टाईम मेमोरेबल..

हुंदका आला तरी जाणीव ना होवो मला
आसवे येतात तेव्हा पावसा कोसळ इथे.....लाजवाब!

या मनाच्या मोसमांचे चक्र सोसावे कसे
एकदा उत्साह येतो एकदा मरगळ इथे.....नस पकडली मनाची.

सोडुनी लज्जा खरे ते चित्र मी रेखाटले
जो खरा गंभीर त्याला मानती अवखळ इथे....ह्म्न!

दोष लोकांचा नसावा ... ते खरे बोलायचे
वाटते आता मलाही आपली अडगळ इथे.....अफाट्च!

मनःपुर्वक धन्यवाद या गझलेबद्दल.

धाड वार्‍यातून थोडी मखमली सळसळ इथे
लावली आहे स्मृतींची बोचरी हिरवळ इथे --- ------------------- खल्लास मतला!!

तू पुन्हा येशील या भीतीमुळे येते अता
यायची केव्हातरी विरहामुळेही कळ इथे................... तुफ्फान!

जर तुझे नि:श्वास परक्याच्या मिठीने गंधती
का मला भंडावतो मग हा तुझा दरवळ इथे--------------- ठीक वाटला.

मी कधी आलेच नाही ना तुला भेटायला
व्यक्त कर केव्हातरी येऊन ही हळहळ इथे--------------- छान!

वाट मदिरेची स्मशानालाच जाते शेवटी
ते वळण येईल आपोआप सध्या वळ इथे-----------कहर!

मी मनांची ओल शोधत पुटपुटत रेंगाळतो
'याइथे पाणी असावे... ऐकली खळखळ इथे'---------___खूपच छान

फक्त तेव्हा शेर होतो शेर म्हणण्यासारखा
आपले आयुष्य जेव्हा वाटते निष्फळ इथे---------------------- क्लिक नाही झाला इतका.

हुंदका आला तरी जाणीव ना होवो मला
आसवे येतात तेव्हा पावसा कोसळ इथे--------------- सुंदर!

या मनाच्या मोसमांचे चक्र सोसावे कसे
एकदा उत्साह येतो एकदा मरगळ इथे-------------- व्वा व्वा!!

दोष लोकांचा नसावा ... ते खरे बोलायचे
वाटते आता मलाही आपली अडगळ इथे------------ मस्तच

गझल खूप छान झाली आहे.

मी मनांची ओल शोधत पुटपुटत रेंगाळतो
'याइथे पाणी असावे... ऐकली खळखळ इथे'........व्वा !!

इतर शेर ही भन्नाट......

गजल खूपच छान. Happy

हुंदका आला तरी जाणीव ना होवो मला
आसवे येतात तेव्हा पावसा कोसळ इथे......

वा वा.

गजल पुन्हा वाचली. हा शेर सुद्धा जबरी.

बेफिकीर, उत्तम गझल. फार आवडली. काही शेर उल्लेखनीय आहेत. ज्ञानेशरावांनी, पोचपावती दिली आहे. यावर अजून काय बोलणार ?

<<मी मनांची ओल शोधत पुटपुटत रेंगाळतो
'याइथे पाणी असावे... ऐकली खळखळ इथे'<<

मस्त आहे... एक से एक! खुप आवडली. Happy

.

मी मनांची ओल शोधत पुटपुटत रेंगाळतो
'याइथे पाणी असावे... ऐकली खळखळ इथे' >>>>>> जीवघेणा शेर ! सगळी गझल सहीच.

सर्व प्रतिसादकांचे अनेक अभार!

किरण्यके, आपले विशेष आभार!

ज्ञानेश, आपले विशेष विशेष आभार!

-'बेफिकीर'!

>>मी मनांची ओल शोधत पुटपुटत रेंगाळतो
'याइथे पाणी असावे... ऐकली खळखळ इथे'

असे वाटतय की हा शेर माझ्यासाठीच लिहला गेलाय.... मस्त!

प्रचंड, खूप खूप आवडली. सगळीच छान आहे, तरी विशेष आवडत्या ओळी

>>जर तुझे नि:श्वास परक्याच्या मिठीने गंधती
का मला भंडावतो मग हा तुझा दरवळ इथे

क ह र!!!

वैभव वसंतराव कु... | 17 December, 2011 - 15:02 नवीन
बेफिकिर राव स्वतः गझलेचे तन्त्र लिहिले म्हणून स्वतःला गझलेचा बाप तर समजत नाहीना तुम्ही?>>>

Happy

आपल्या या प्रश्नाचे, जो आपण जेथे विचारायला हवात तेथेही विचारलाच आहेत म्हणून. :

http://www.maayboli.com/node/31302#comment-1776222

तेथेच उत्तर दिलेले आहेत. या गझलेची या प्रतिसादासाठी दखल घेण्याबद्दल आभार! Happy

-'बेफिकीर'!

कित्ती सुरेख गझल आहे ही..

कुलकर्णी - आधी बेफिकीर यांच्याशी नीट वागा :रागः

तू पुन्हा येशील या भीतीमुळे येते अता
यायची केव्हातरी विरहामुळेही कळ इथे...

सगळेच शेर तूफान आहेत.....अख्खी गझल आवडली

Pages