कुण्या देशीचे पाखरु, माझ्या अंगणात आले
त्याचे पंख परदेसी, परि ओळखीचे डोळे
माती कोठल्या धरेची, त्याच्या नखांना लागली
माया हिरवी कोणती, त्याच्या उरात साठली
आणि कोठले आकाश, त्याने सर्वांगा माखले
माझ्या अंगणात आले.......
कुठे पिऊन घेतले, त्याने मेघातले जळ
दिली वार्याने कोठल्या, त्याला चोचीतली शीळ
त्याच्या लकेरीत गाणे, कुण्या जन्मीचे भेटले
माझ्या अंगणात आले.......
माझ्या ओंजळीचे झाले मऊ घरटे राजस
त्याला न्हाऊ घालावया ओला काजळ पाऊस
माझे मन त्याच्यासाठी फांदी होऊनिया झूले
माझ्या अंगणात आले.......
(शब्दः सुधीर मोघे, स्वरः अनुराधा पौडवाल)
आमच्या घरासमोरच पिंपळाचे आणि शेवग्याचे झाड आहे. सध्या पिंपळावर फळे आणि शेवग्याच्या झाडावर भरपूर फुले आली आहेत. पिंपळावरची फळे खाण्यासाठी आणि शेवग्याच्या फुलातील मधुरस पिण्याकरीता तांबट, बुलबुल आणि सूर्यपक्षी रोजच येत आहेत, अर्थात आपले नेहमीच्या चिमण्या कावळे आहेतच :-). यांचे फोटो टिपण्यासाठी मला जास्त मेहनत नाही करावी लागत फक्त भल्या पहाटे सात वाजता उठुन कॅमेरा घेऊन गॅलरीत जाऊन यांना टिपावे लागते. फोटो काढुन झाल्यावर मस्तपैकी चहाचा कप घेऊन गॅलरीत उभा राहून पिंपळ/शेवग्याच्या झाडांवरचा यांचा ब्रेकफास्ट पहात उभे राहणे हाच काही दिवसांपासुन माझा सकाळचा कार्यक्रम ठरला आहे. आज २ किंगफिशर आणि अजुन एक वेगळा पक्षी दिसला पण फोटो काढता आला नाही. बघु उद्या सकाळी परत दिसतात का ......
=======================================================================
=======================================================================
तांबट
तांबट (शास्त्रीय नावः Megalaima haemacephala indica) हा महाराष्ट्रात प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर आढळणारा पक्षी आहे. याला इंग्रजीत कॉपरस्मिथ किंवा क्रिमसनब्रेस्टेड बार्बेट तर हिंदीत छोटा बसंत असे म्हणतात. हा तांबूस रंगाचा असून साधारणपणे चिमणीच्या आकाराचा असतो. अतिशय दाट झाडीत याचे वास्तव्य असल्याने सहजपणे दिसत नाही. परंतु उन्हाळ्याच्या दिवसात यांचे तांब्यावर घण घालताना जसा आवाज येतो तसा दिवसभर आवाज काढत रहातो. त्यामुळे याचे अस्तित्व लक्षात येते. याचे पुकपुक्या असे स्थानिक नावही काही ठिकाणी आढळते.
या पक्ष्याच्या कपाळ आणि छातीवर किरमिजी रंग असतो. डोळ्यांच्या वर व खाली अर्धवर्तुळाकार पिवळे पट्टे असतात पिवळाधम्मक कंठ दिसून येतो तर हिरव्या-पांढऱ्या रंगाचा आरीयुक्त अंतर्भाग असतो. पक्ष्याच्या नर-मादीत फारसा फरक नसतो. तांबट पक्ष्याचे पिल्लू हे हिरव्या रंगाचे असते, परंतु त्याच्या डोक्यावर व छातीवर लाल रंग नसतो. शुष्क वाळंवटी प्रदेशात मात्र हा पक्षी आढळत नाही. मृत झाडांवर वा झाडांच्या मृत खोडांवर हे पक्षी पोकळी करून राहतात. अशा खोडाची निवड करण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे या खोडांवर लाकूड पोखरणे त्यांना सोपे जाते. तांबट पक्षी या पोकळीचे घरटे म्हणून वापर करतो. तांबट पक्षी शक्यतो एकटा किंवा जोडीने आढळतो. वड, पिंपळ, अंजीर, जांभूळ अशा झाडांवर हा पक्षी आढळून येतो. या पक्ष्याच्या आहारात प्रामुख्याने फळांचा समावेश असतो. त्यातही वड-पिंपळाची फळे तो आवडीने खातो. त्याला रसयुक्त फळे आवडतात. तसेच ठराविक फुलांच्या पाकळ्याही खातो. प्रथिनांची गरज भागवण्यासाठी तांबट पक्षी काही ठराविक कीटकही खातो. तांबट आपल्या शरीराच्या दीड ते तीन पट फलाहार करतो असे आढळून येते.
(मराठी विकिवरून साभार)
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
=======================================================================
=======================================================================
रेड व्हिस्कर्ड बुलबुल
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
=======================================================================
=======================================================================
सनबर्ड (सूर्यपक्षी)
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
=======================================================================
=======================================================================
चिमणा/चिमणी
प्रचि २२
प्रचि २३
=======================================================================
=======================================================================
किती गोड कविता..त्याहीपेक्षा
किती गोड कविता..त्याहीपेक्षा गोड इटुकले पिटुकले पक्षी!!!
सुंदरच...
सुंदरच...
मस्त आहेत फोटो आणि कविताही
मस्त आहेत फोटो आणि कविताही
कसले भारी आहेत हे फोटो.
कसले भारी आहेत हे फोटो. त्यांनी तुझ्या कॅमेर्यात बंदिस्त होण्याकरता खास 'बर्डवॉक' केलाय असं वाटतय. बर्डवॉककरता रॅम्प पण मस्त निवडलाय.
प्रची ३ खूप मस्त टिपले आहेस. आणि प्रची २२ मधले ते पिंपळपान सुंदरच.
वॉव, मस्त.
वॉव, मस्त.
छानच!
छानच!
प्रचि १० खासच
प्रचि १० खासच
सुंदर फोटो, या तांबटाने
सुंदर फोटो, या तांबटाने आमच्या पेरुच्या झाडावर ढोली करायचा प्रयत्न केला होता. आश्चर्य म्हणजे आमचे घर ऐन रस्त्यावर आहे तरी त्याने ते झाड निवडले होते. पण त्याचे काम अंधार पडल्यावरच चालायचे. (हे पण नवलच)
खरंच वाटलं, इथे असतास तर अनेक पक्षी टिपता आले असते. अगदी रोज सकाळ-संध्याकाळ मला वेगवेगळ्या पक्ष्यांचे दर्शन होते
बापरे! कसली सुंदर आहेत हो ही
बापरे! कसली सुंदर आहेत हो ही प्रचि.
२२ मधलि पिंपळपानं, ११ मधला बुलबुल आणि २० मधला शिंजिर!! मस्त मस्त मस्त!!!
जिप्सी - काय वर्णन करणार रे
जिप्सी -
काय वर्णन करणार रे तू काढलेल्या या फोटोंचे - छान, सुंदर, अप्रतिम वगैरे सर्व विशेषणे फिकी पडतील असे फोटो काढतोस बाबा तू......... संपूर्ण नि:शब्द.......
माहीती आणि फोटो दोन्ही
माहीती आणि फोटो दोन्ही अप्रतीम योगेश.
सुप्पर्लाईक.........
सुप्पर्लाईक.........
मस्त प्रचि
मस्त प्रचि
वा जिप्सि द ग्रेट ..........
वा जिप्सि द ग्रेट .......... एकदम आवडेश
प्रचि १८ ले महाशय कोण आहेत ? मला कालच यांचे दर्शन झाले,अतिशय चपळ, ईकडे तिकडे उड्या मारत होता.
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे आभार
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे आभार
खास 'बर्डवॉक' केलाय असं वाटतय. बर्डवॉककरता रॅम्प पण मस्त निवडलाय. >>>>माधव,

खरंच वाटलं, इथे असतास तर अनेक पक्षी टिपता आले असते. अगदी रोज सकाळ-संध्याकाळ मला वेगवेगळ्या पक्ष्यांचे दर्शन होते>>>>दिनेशदा, कधी येऊ???
२० मधला शिंजिर!! >> धन्स वैजयंती, नावाबद्दल
अतिशय चपळ, ईकडे तिकडे उड्या मारत होता. >>>>>अगदी अगदी
सुंदर मित्रा... काय छान पक्षी
सुंदर मित्रा...
काय छान पक्षी आहेत...
जिप्सी, तुझ्या सर्व सकाळ ह्या
जिप्सी, तुझ्या सर्व सकाळ ह्या पक्ष्यांमुळे खूप सुरेल होत असतील नाही?.....
बाकी फोटोंबद्द्ल नेहेमी नेहेमी वापरलेले शब्द काय लिहू? आता वेगळे शोधावे/तयार करावे लागतील.
तुझा कवितांचा पण चांगलाच अभ्यास दिसतोय हं!...........
जिप्स्या आता कौतुक बिवतुक
जिप्स्या आता कौतुक बिवतुक करायला शब्द अजिबात नाहियेत माझ्याकडे.
तुला जे समजायचं असेल ते तुझं तु समजून घे.
जिप्सी... मी अजुन माझ्या
जिप्सी... मी अजुन माझ्या निर्णयावर ठाम आहे रे... भारतात आलो की तुझ्या कडे शिकवणी लवणारच...सगळे फोटो अप्रतीम!!!
पिंपळफळे, आणि ती खाणारे तांबट
पिंपळफळे, आणि ती खाणारे तांबट काय सुरेख टिपले आहेत.
मी तर पहिल्यांदाच पाहतो आहे, एवढ्या जवळून!
लकाकीची प्रकाशचित्रे आणि त्यांकरता निवडलेल्या बहारीच्या चौकटींनी मन प्रसन्न केले.
मनःपूर्वक धन्यवाद आणि हार्दिक शुभेच्छा!
अप्रतिम फोटो !!!
अप्रतिम फोटो !!!
शशांक पुरंदरे ना १००% अनुमोदन
शशांक पुरंदरे ना १००% अनुमोदन
अप्रतिम कविता आणि फोटो..
मस्तच , सगळे आवडले सुरेख एकदम
मस्तच , सगळे आवडले सुरेख एकदम !
एकदम भारी!!!
एकदम भारी!!!
सहीये
सहीये
धन्य तो जिप्सी , धन्य ते
धन्य तो जिप्सी , धन्य ते पक्षी आणि धन्य ती सकाळ!
फार फार सुंदर आहेत फोटो.
फार फार सुंदर आहेत फोटो.
पुन्हा पुन्हा पाहिले.. 
अप्रतिम फोटो! तुझ्याकडे आता
अप्रतिम फोटो! तुझ्याकडे आता भरपूर उत्क्रुष्ट फोटो जमले असतिल, प्रदर्शन कधी करतोयस?
अप्रतिम प्रकाशचित्रण!! तुझ्या
अप्रतिम प्रकाशचित्रण!!
तुझ्या प्रत्येक प्रचिला छोटीशी काळी तीट लावत जा बाबा!!
हेवा वाटावा इतकं सुंदर टिपलसं!
जिप्सी, तुला ७०*३०० घ्यायला
जिप्सी,
तुला ७०*३०० घ्यायला हवीये रे.
सही जा रैला है.