हितगुज दिवाळी अंक २०११ - अभिप्राय

Submitted by संपादक on 25 October, 2011 - 20:16

मायबोलीच्या हितगुज दिवाळी अंक २०११ बद्दलच्या आपल्या अभिप्रायांचे नुसते स्वागतच नव्हे, तर ते वाचण्याची आम्हांला उत्सुकताही आहे. तेव्हा अंकाबद्दलचे आपले अभिप्राय आम्हांला इथे जरूर कळवा.
***********************************************
हितगुज दिवाळी अंक २०११ पीडीएफ स्वरुपातही उपलब्ध आहे. अंकातल्या प्रत्येक विभागाची एक आणि अनुक्रमणिका अशा एकूण दहा फाईल्स झिप स्वरुपात या दुव्यावरून उतरवून घेता येतील. फाईल्स उतरवून घेण्यासाठी दिलेल्या दुव्यावर खालच्या उजव्या बाजूला असलेला 'Slow download' हा पर्याय निवडावा (approximate file size ~ 10 MB).
***********************************************
-संपादक मंडळ

Best viewed in Mozilla Firefox 3.0 and above with 1024x768 resolution

विषय: 

अरे वा आला का अंक.. सही.. Happy

मुखपृष्ठ आवडलं. अजुन अंक वाचायला सुरूवात करायची आहे. पण चांगला झाला असेलच याची खात्री आहे.

अंक नुसता चाळलाय आता हळूहळू वाचेन आणि अभिप्राय देईन.
दिवाळी अंक टिमचे हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद!!! Happy

पण चांगला झाला असेलच याची खात्री आहे.>>>>अनुमोदन Happy

|| शुभ दीपावली ||

"थांग अथांग" पासून सुरुवात केल्ये वाचायला.

"इस रिश्ते का कोई नाम न दो", "टाके", "मनाच्या श्रीमंत - राजाबाई" आणि "एक नाते हिरवेगर्द" वाचून झालय. मस्त!
"नाती खगोलशात्रीय" पण एकदम वेगळ्या विषयावरचा मस्त लेख.
सावलीचा "नभा सावर सावर" आणि आऊटडोअर्स चा "साद देती हिमशिखरे" दोन्ही लेख आणि फोटो खूप छान Happy
बाकी अजुन वाचायचं आहे. पण सगळी रेखाटनं सुप्पर मस्त आहेत Happy

अंक अगदी देखणा झालाय. आत्ता नुसताच वरवर चाळलाय.
वाचून झाल्यावर अभिप्राय देईनच.
सगळ्या टीमचे अभिनंदन आणि मेजवानीबद्दल धन्यवाद. Happy

संपादक मंडळाच अभिनंदन.प्रथम कविता वाचल्या ,सगळ्या आवडल्या .बाकीचा अंक सावकाश वाचायचा आहे .धन्यवाद .दिपावलीच्या शुभेच्छा.

अहा....... आला अंक आला......मुखपृष्ठ एकदम मस्त !! बाकी वरवर चाळला. प्रचंड मेहेनत घेतलेली दिसतेय. सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन !! वाचून अभिप्राय कळवेनच Happy

प्रथम काव्यविभाग पाहिला.

१. क्रान्ती यांची यावेळेसची गझल दिवाळी अंकाच्या निमित्ताला शोभेलशी आहे.

२. उमेश कोठीकरांनी गझल बरीचशी नीट हाताळली आहे व रदीफही नावीन्यपूर्ण आहे.

३. सुप्रिया जाधव यांची गझलही सुंदर आहे.

४. जयन्ता ५२ यांनीही मस्त गझल दिलेली आहे.

नेहमीप्रमाणेच 'झाड' यांची कविता सुरेखच!

बाकी काव्य वाचत आहे.

-'बेफिकीर'!

दिवाळी अंक सुंदर. Happy संपादक मंडळाचे अभिनंदन आणि मनापासुन आभार.
नुकतेच वाचायला सुरुवात केली आहे.

अश्विनीमामी यांचे लेखन "ब्रीफकेस" हेलावुन टाकणारे. हॅट्स ऑफ टू यु.

अश्चिग, छान माहितीपुर्ण लेख.
मंजिरी "गांबारोऽ निप्पोन!" लेख छानच. आडोचा "साद देती हिमशिखरे" लेख आणि फोटो दोन्ही मस्त.

बाकी अजुन वाचते आहे.

Happy

व्वा.. खूप सुंदर... नेहमीप्रमाणेच अगदी 'आकर्षणीय' नि 'नीटनेटका' झालाय.. चाळतानाच मस्त वाटले.. संपूर्ण टिमचे मनःपुर्वक अभिनंदन.. !! आता एकेक करून वाचणार.. साहाजिकच ऑडोचा लेख पहिला डोळ्याखालून घातला.. कसले क्लास फोटोज आहेत.. मस्तच.. सगळे एकापेक्षा एक लेख असतीलच ही खात्री आहे.. पुनश्च अभिनंदन !

संपादक मंडळ आणि सर्व संबंधित सदस्यांनी दिवाळी अंकावर भरपूर मेहनत घेतलेली जाणवली. साहित्याची रेलचेल दिसली. या सर्व सभासदांचं अभिनंदन.
सद्ध्या अंक नुसता चाळलाय. सावकाश वाचून अभिप्राय देता येतील.

मस्त दिसतोय अंक.. सगळं वरवर चाळलय. वाचतेय हळूहळू..
संपादक मंडळ आणि अंकासाठी काम करणार्‍या संबंधित सर्वजणांचे आभार आणि अभिनंदन!!

सर्व मायबोलीकरांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा ! Happy

दिवाळी अंकासाठी संपादक मंडळाचे आभार. पुढच्या व मागच्या पानावर (लेखावर) जायची सोय आवडली. टेम्पलेटच्या रंगामुळे एक सलग वाचणे देखील सुसह्य होते आहे (काही ईतर इ-दिवाळी अंकांशी तुलना करता)
पण टेम्पलेटचे डिझाइन (एकिकडे दोन पक्षी आणि दुसरीकडे आकाशदिवा हे) भलतेच बाळबोध वाटतेय.

आऊटडोअरच्या साद देती हिमशिखरे मधिल काही फोटो फार आवडले. लेख अजून वाचला नाही.
श्याम यांचे सण वाढा सण सुरेख.
गांबारो निप्पॉन वाचनीय
रैनाची आकाशपाळण्याची गोष्ट आवडली. त्यातील "ये सब पढा नही ऐसे बोल नहीं सकतें. जैसे एनिमल फार्म, हू मुव्ह्ड माय चीझ वगैरे . . . इसके लिए लोग पढते हैं." हे भारी Lol

गेल्या काही अंकात होते तसे यावेळी व्हिडीओ क्लिप्स आलेल्या दिसत नाहीत.

आणखी वाचीन तसे लिहीनच.

अंक छानच...वाचून अभिप्राय देईनच, तरीही..जे वाचलं त्यात

काव्य विभाग खमंग आणि कुरकुरीत ..झालाय Happy

सगळ्या मायबोलीकरांना...

0000.jpg

-शाम

सुबक अंक वेळेवर उपल्बध करुन दिल्याबद्दल संपादकांचे आभार. आत्तापर्यंत वाचलेल्यात -ब्रीफकेस आणि वर्तुळ आवडले.
दिवाळी संवाद मधली दिलखुलास मुलाखातीत जो अनौपचारीक टोन पक्डलाय तो जमलाय मात्र जया भुमिके बद्दल पारीतोषीक मिळालेय , त्याबद्दल फार काही हाती लागत नाही. त्यातले कृष्णधवल प्रकाशचित्र उत्कृष्ट आहे.
स्वरचित्रे-संध्येच्या पारावरती , उत्तम रितीने सादर केलिय आणि ध्वनीमुद्रण चांगल्या दर्जाचे आहे
सफर बांधवगडची - पार्श्व संगिताचा ट्रॅक चुकिचा निवडलाय , एडीट करुन बरेचसे कॅमेरा जर्क कमी करता आले असते.
साद देती हिमशिखरे वाचले नाहिय पण नीळकंठ शिखर हे प्रकाशचित्र खास आहे.

अरे वा छान अंक. सध्या नुसताच चाळलाय. नेव्हिगेशन दिले ते बरे झाले. आता आधी थांग-अथांग वाचणार Happy

संपादक मंडळाचे अभिनंदन !!!

अतिशय सुंदर नि देखणा दिसतोय अंक. अजून वाचले नाहिये काहि. अंक नुसता चाळलाय, सवडीने वाचता येईल.

संपादक मंडळाचे अभिनंदन !!!

अंक प्रकाशनाबद्दल संपादक मंडळाचे अभिनंदन आणि धन्यवाद !

मुखपृष्ठ मस्त. टेम्प्लेटमधले बाजूचे टॅब मस्त आहे. त्यावरची पणती आणि टेक्स्टचा इफेक्ट छान आहे. वरचे ते पक्षी पण छान आहेत. तो कंदील आवडला नाही. कदाचित त्याची रंगसंगती बाकी रंगांबरोबर जमत नाहीये त्यामुळे तो कंदिलच जास्त रंग वेधून घेतोय. एकूणात टेम्प्लेटबद्दल HH ला अनुमोदन. बर्‍यापैकी बाळबोध वाटले.
खालचे लेखमालेसारखे नॅविगेशन मस्त !

लेख वाचायला सुरूवात केली. संघमित्राचा लेख आणि कविता दोन्ही टँजंट ! टेनीसविषयक काहितरी कवितेत आल्याने छान वाटले.. Wink 'अतीत' हलकी फुलकी. ऋयाम वेगळी शैली ह्यावेळी. नीरजाचा लेख छान.
समहाऊ 'ब्रीफकेस' नाही आवडलं अजिबात. अनुभव हृद्य आहे. पण लेख खूपच ऑफ-फोकस्ड वाटला. व्यक्तीचित्र, तलवारांबरोबरच नातं आणि वैयक्तिक अनुभव ह्या सगळ्याची सरमिसळ झाली आहे आणि कुठलीच एक गोष्ट पूर्णपणे व्यक्त झालेली नाहीये. 'ब्रीफकेस' हे नाव आणि संबंध पण ओढून ताणून आणल्यासारखा वाटला.
सावलीचा लेख आणि प्रचि मस्त.. 'रंगवूनी आसमंत'ची पुन्हा आठवण झाली.
श्यामलीची ऑडियो कविता ह्याही वर्षी जबरी !

--

अंतर्नाद मधलं 'सण वाढा सण' टचिंग आहे खूप !
'गांबारोऽ निप्पोन!' विचार करायला लावणारं... मस्त लिहिलय मंजिरी.
एलिमेंटरी आणि वजन उतरो देवा हलके फुलके आहेत पण गुंडाळल्यासारखे वाटले.
साद देती हिमशिखरे ... आडो मस्तच ! आणि रैनाची VOF मालिका आणि आता हे.. पुढे ढकललेले सगळे ट्रेक्स लगेच करावेसे वाटतायत..
आकाशपाळण्याची गोष्ट.. रैना छान लिहिलयस.. सुरूवात अगदी विशिष्ठ शहरी पण.. Wink

थांग अथांग मधलं लहानशा गोष्टी ठिक ठिक..
नाती खगोलशास्त्रीय इंटरेस्टींग पण हेही अचानक गुंडाळल्यासारखं वाटलं.
पूनमची कथा मस्त ! डिटेलिंग छान जमलय.

कथाकथीतली वर्तुळ वाचली.. चांगली आहे पण सुखात्मे आणि उत्तर सारखी अगदी लक्षात राहील अशी नाही वाटली. कथेचा विषय पहाता अजून फुलवता आली असती असं वाटलं.
कथा विभागात शोनू आणि दाद ह्यांनी ह्याही वर्षी दांडी मारली आहे ! मंडळानी त्यांच्यावर कडक कारवाई करावी. Happy
-

बर्‍याच ठिकाणचे ब्लर्ब्स संदर्भ सोडून काढल्यासारखे वाटले. ब्ल्रर्ब्स आणि लेख ह्यांच्यामधल्या सेपरेटरचं डिझाईन सुरेख आहे !

-
वळचणीचे पक्षी नाही आवडली फारशी.. मधेमधे फार लांबल्यासारखी वाटली.
सर्वस्व जर विस्कळीत वाटली. ही पण फार नाही आवडली.
चिलॅक्स मॉम.. ठिक ठिक वाटली.
सावलीची बालकथाही छान आहे.
डॉक्टर विसरभोळी ठिक ठिक वाटली.

शम्मी कपूरवरचा लेख आवडला.

अंकाची सजावट, मुखपृष्ठ आवडले. आकाशकंदिलाकडे खरं तर इथले अभिप्राय वाचल्यावर लक्ष गेले.... मला तो फेस्टिव्ह वाटला! Happy नॅव्हिगेशन खूप सोपे आहे. त्यामुळे कसरती कराव्या लागत नाहीएत. अंकातील चित्रे आवडली.

आतापर्यंत वाचलेल्या मुलाखतींत कविताने घेतलेली 'त्याच्याविना...त्याच्यासाठी' मुलाखत आवडली. प्रेरणादायी वाटली.
अंतर्नाद विभाग सर्वात जास्त आवडला. रैनाची आकाशपाळण्याची गोष्ट रस्त्यावरच्या विक्रेत्यांच्या जीवनाचे वास्तव जाणवून देणारी, आणि म्हणूनच आवडली. शैलीही आवडलीच! सईचा 'वजन उतरो देवा' लेख खुसखुशीत. शाम यांचा 'सण वाढा सण' वाचताना मनात चर्र झालं. गांबारो निप्पोन वाचून __/\__ झालं.
साद देती पुन्हा एकदा नीट वाचायचंय.

कथाकथीत अतीतखाली ऋयामाचं नाव वाचून दोनदा खात्री केली. सुखद धक्का. चिल्लॅक्स मॉममधील लक्ष्मण फार्फार आवडला. Happy तळ्यातली कमळेही छान. वळचणीचे पक्षी कथा चांगली फक्त मांडणी जरा विस्कळीत वाटली. वर्तुळही आवडली.

थांग-अथांगमध्ये विरंगुळा, टाके, लहानशा गोष्टी, ऐका हो शंकरा, मनाच्या श्रीमंत-राजाबाई, मानसकन्या आवडले. इसे रिश्ते का कोईचा शेवट नाही आवडला. कथा फुलवली मात्र फार मस्त आहे. नभा सावर सावर मधील प्रकाशचित्रे भन्नाट.

स्मृतिगंधमधील लेख ठीक ठीक.

आणखीही काही वाचायचं आहे. त्यानंतर उर्वरित अभिप्राय देईनच!

संपादक मंडळ आणि अंकासाठी मेहेनत घेणार्‍या सगळ्यांचं अभिनंदन!! अंक देखणा झाला आहे.

नेहमीप्रमाणे आधी भराभर चाळला. आता निवांत वाचायला घेता येईल.

संपादकांचे अंकासाठी आभार आणि अभिनंदन! Happy

अंक भरगच्च दिसतो आहे. अजून वाचायला सुरुवात केली नाही. सजावट बाळबोध दिसते आहे हे खरं आहे. पण नॅव्हिगेशन सोपं सुटसुटीत आहे.

सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा! Happy

संपादक मंडळ आणि इतर हातभार लावलेल्यांचे अभिनंदन आणि आभार!

टेम्प्लेट एकदम सुटसुटीत, छान झाले आहे. डिझाईनबद्दल हहला अनुमोदन. ते पक्षी, कंदील आणि विभागांच्या नावाआधीची पणती याऐवजी दुसरं काही किंवा या गोष्टी नसत्या तरी चालल्या असत्या. सध्या नुसता पाहिलाच आहे. बाकी वाचल्यावर.

Pages