जालरंग प्रकाशनाचा दिवाळी अंक, ’दीपज्योती २०११’ चे प्रकाशन झालेले आहे.

Submitted by प्रमोद देव on 21 October, 2011 - 02:37

नमस्कार मंडळी! आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने बनलेला, जालरंग प्रकाशनाचा दिवाळी अंक,
’दीपज्योती २०११’ चे प्रकाशन झालेले आहे असे आम्ही जाहीर करत आहोत...खालील दुव्यावर तो आपल्याला वाचता येईल.

http://deepjyoti2011.blogspot.com/p/blog-page_12.html

काय आवडलं/नावडलं, काय चुकलं/काय बरोबर आहे, ते नि:संकोचपणे सांगा. दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रियातून आम्हाला प्रोत्साहन आणि भविष्यात अजून काही तरी चांगलं करण्याची प्रेरणा,दिशा मिळेल...तेव्हा अंक जरूर वाचा/ऐका/पाहा आणि आवर्जून आपल्या प्रतिक्रियाही द्या.

आपणा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

धन्यवाद

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन, मस्त झालाय अंक. सद्ध्या ओझरती नजर फिरवुन आलिये. नंतर सविस्तर प्रतिक्रिया देते वाचल्यावर.

प्रमोदकाका माझे लिखाण व्यवस्थित दिसत नाही हा प्रॉब्लेम माझ्या पिसी चा आहे का ? म्हणजे पहिला फोटो आणि शेवटचा फोटो स्थिर आहे पण मधले स्क्रॉल करून पण मला व्यवस्थित पुर्ण दिसत नाही. काही भाग कट केला आहे का ?

जागू, मला तर व्यवस्थित दिसतोय तुझा लेख....
तू कोणता न्याहाळक(ब्राऊजर) वापरते आहेस?
मी अग्नीकोल्ह्यावर(फाफॉ) आणि एपिकवर पाहतोय.

जागु एक्प्लोरर ८/९ आहे का तुझा?? तुझा लेख माझ्या इथे एक्स्प्लोरर असुन व्यवस्थित दिसतोय.

@कविता, अंक संपूर्ण्पणे पिडिएफ मध्ये देता येणे अशक्य आहे कारण त्यात काही अभिवाचने-विडीयोज आहेत. तो वगळून किंवा त्याचे फक्त दुवे देऊन हे करता येऊ शकेल. पण आत्ताच्या मेहनतीपेक्षा देखील दुप्पट मेहेनत यावर घ्यावी लागेल, त्यामुळे दिवाळीपूर्वी तरी हे काम शक्य होईल असे वाटत नाही.

अभिनंदन सगळ्यांचे... Happy
खुप छान आहे दिवाळी अंक... आताच अर्ध्याहून अधिक अधाशासारखा वाचून काढला Happy
पुन्हा एकदा दिवाळीच्या वेळेला वाचेन म्हणते... म्हणजे एक वेगळाच उत्साह येईल वाचायला Happy

केवळ माझं आणि क्रांतीचं नको तर...अंक सजावटीबद्दल श्रेया रत्नपारखी म्हणजेच मायबोलीची सदस्या majhiduniya हीचही खास अभिनंदन करा...
ह्या अंकाला भरगच्च करण्यात महाजालावरील इतर लोकांबरोबरच मायबोली सदस्यांनीही खूप मोठ्या प्रमाणात हातभार लावलेला आहे...त्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे विशेष अभिनंदन आणि आभार....म्हणूनच मी नेहमी हा आपल्या सगळ्यांचा अंक आहे असे म्हणत असतो...आणि ह्यापुढेही आपल्या सगळ्यांचा असाच सक्रिय सहभाग राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो.

सगळ्या टिमच अभिनंदन Happy देव काकांच्या उत्साहाला मनापासून दाद Happy
अंक दिसायला एकदम मस्त झाला आहे, मांडणी आवडली,निवांत वाचून प्रतिक्रीया नोंदवेनच.

देवकाका अभिनंदन Happy अंक अजुन वाचला नाहीये पण आधीच देतोय Happy अंक वाचल्यावर व्याजासहीत आणखी अभिनंदन करेन Happy

Pages