सुश्राव्य संगीत - सकल कलांचा उद्गाता - केदार पावनगडकर



सकल कलांचा उद्गाता
गुणेश गजानन भाग्यविधाता ||धृ||
प्रथम पूज्य हा शिवगौरीसुत
गणनायक शुभदायक दैवत
या विश्वाचा त्राता विनायक या विश्वाचा त्राता ||१||
आदिदेव ओंकार शुभंकर
मी नतमस्तक या चरणांवर
तू विद्येचा दाता गजमुखा तू विद्येचा दाता ||२||


कवयित्री : क्रांति साडेकर
संगीत : प्रमोद देव
गायन : श्री केदार पावनगडकर
हार्मोनिअम : श्री केदार पावनगडकर
तबलासाथ : श्री सुहास कबरे
Submit to kanokani.com

अतिशय सुरेख काव्य,संगीत,वादन आणि गायन.

वाह....
तृप्त झाले कान ! गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया !!

सर्वांचेच मनापासून अभिनंदन !
सुरेख !!!

व्वा व्वा.. सुंदर काव्य, संगीत आणि गायन ... आवडेश !! स्मित

बाप्पा मोरया रे !!

फार मस्त आवडले

सुंदर !

मस्त

व्वा सुंदर ... स्मित
सर्वांचेच मनापासून अभिनंदन !

सुंदर,सर्वांच अभिनंदन.

व्वा.. खरच प्रसन्नदायक... सुंदरच !! अभिनंदन करण्यापेक्षा धन्यवाद म्हणेन.. स्मित

क्या बात है!
क्रांती, देवकाका मस्तच, आवाजही मस्त स्मित

क्या बात है !! सहज सुंदर शब्द......चाल सुद्धा अप्रतिम !! आवाज तर फारच सुरेख !!! मस्तच जमलंय !!!!! प्रसन्न वाटतंय ऐकल्यावर !!!!!!!!

किती मनापासून गायलय. वा!
देवकाका- चालही सुरेख आहे.

फ़ारच सुंदर झालेय.
गीत, संगीत आणि गायनही सुंदर. स्मित

गीतकार आणि संगीतकार आपल्यापैकी कोणीतरी आहे म्हटल्यावर आवडण्यामध्ये जिव्हाळ्याची भर पडते.
आणि मग ते वर्णन करणे शब्दापलीकडे होऊन जाते, तसेच झालेय हे गीत ऐकताना.

सर्वांचे अभिनंदन!!! स्मित

गीतकार आणि संगीतकार आपल्यापैकी कोणीतरी आहे म्हटल्यावर आवडण्यामध्ये जिव्हाळ्याची भर पडते.आणि मग ते वर्णन करणे शब्दापलीकडे होऊन जाते, तसेच झालेय हे गीत ऐकताना.>>>>अगदी अगदी स्मित

सुंदर गीत, संगीत आणि गायलंयही मस्त!
देवकाका आणि क्रांती - मस्तच आहे हे गाणं!

सुंदर भावपूर्ण शब्द, संगीताच्या साजाने सजले की,
’सोने पे सुहागा’ असं वाटतं.

क्रांति, केदार पवनगडकर, सुहास कबरे आणि प्रमोद देव ...... अभिनंदन

सुंदर ! सुंदर !!
धन्यवाद क्रांति आणि देवकाका.

खूप छान!
सर्वांचं अभिनंदन.

क्या बात है!

वा देव बुवा ! झकास झालंय गाणं. सहभागी झालेल्या सर्व कलाकारांचं मनापासून कौतुक

झकास ,. गीत, संगीत आणि गायनही सुंदर... !! प्रसन्न वाटतं ऐकताना .. !!

मस्तच! हे ऐकून कुणाचा विश्वासच बसणार नाही की ही सगळी कलाकार मंडळी एकाच ठीकाणी नसून वेगवेगळ्या शहरांत आहेत आणि तरीही इतकं सुंदर काँम्पोझिशन. उपल्ब्ध तंत्रज्ञानाचा अतिशय उत्तम आणि प्रभावी वापर केलेला आहे. गणपती बाप्पा मोरया!!

शांतीसुधा..अगं, तसं नाहीये. माझ्याच घरी एकत्रपणे बसून हे ध्वनीमुद्रण केलंय. माझ्या आयुष्यातला तो एक वेगळाच आणि आनंददायक अनुभव होता! स्मित
प्रतिसाद देणार्‍या समस्तांचे मन:पूर्वक आभार! आपल्याला आम्ही केलेले काम आवडले ह्यापेक्षा अजून काय हवंय!
अगदी भरून पावलो.

मस्त काका
सर्वांचेच अभिनंदन !

वाह ! वाह ! काय तृप्त वाटलं गाणं ऐकुन. सुंदर गायन, शब्द आणि संगित. तुम्हा सर्वांचे आभार आणि अभिनंदन.

अप्रतीम चाल आहे स्मित

देवकाका, गणराज खुश झाले गीत ऐकून.स्मित

देवकाका, खूप छान चाल. सर्वांचे अभिनंदन! धन्यवाद!

वाह्,खूप छान.