Submitted by बेफ़िकीर on 17 August, 2011 - 02:09
गरीबीतही लोक संतुष्ट होते
जरी त्या जमान्यामधे कष्ट होते
मला तू विसरलीस त्या पद्धतीने
धुके सूर्यकिरणांमधे नष्ट होते
तुझ्यावाचुनी राहिल्याने कळाले
उन्हाहूनही सावली दुष्ट होते
नको बंद पाडूस तू हा अबोला
अशाने गझल फार निकृष्ट होते
कुठे जायचे हे ठरवणार नाही
ठरवल्यामुळे वाट अस्पष्ट होते
पहा थोर झालास माझ्यामुळे तू
तिमीरामुळे तेज सुस्पष्ट होते
तुला आतपर्यंत भिजवायचे त्या -
ढगांहूनही मन तुझे भ्रष्ट होते
धपाटे दिले त्या नशीबास मीही
तसे कारटे ते नतद्रष्ट होते
उभा जन्म डोळे मिसळण्यात गेला
कवीवर कुठे काव्य आकृष्ट होते
तिचा शेर वगळून ती दाद देते
इतर 'बेफिकिर' शेर उत्कृष्ट होते
-'बेफिकीर'!
गुलमोहर:
शेअर करा
सुंदर गझल, अत्यंत वेगळे
सुंदर गझल, अत्यंत वेगळे काफिये. तुमचा खास ट्च आहेच. सगळे शेर आवडलेच.
अस्पष्ट, नतद्रष्ट, आकृष्ट आणि मक्ता हे शेर अतिशय आवडले.
धन्यवाद!
जबरदस्त. कणखरांशी १०० %
जबरदस्त.
कणखरांशी १०० % सहमत.
मला निकृष्ट सुद्धा फार आवडला.
अप्रतीम....
अप्रतीम....
तुम्ही इतराहून वेगळचं लिहता
तुम्ही इतराहून वेगळचं लिहता राव.
गझल सुंदर आहे.
आवडली.
तिचा शेर वगळून ती दाद
तिचा शेर वगळून ती दाद देते
इतर 'बेफिकिर' शेर उत्कृष्ट होते
सही.......
दिलखुष गझल.
तिचा शेर वगळून ती दाद
तिचा शेर वगळून ती दाद देते
इतर 'बेफिकिर' शेर उत्कृष्ट होते
व्वाह!
सूट घेतली..
तुझ्यावाचुनी राहिल्याने
तुझ्यावाचुनी राहिल्याने कळाले
उन्हाहूनही सावली दुष्ट होते >>>
क्या बात है !
अप्रतीम.... कुठे जायचे हे
अप्रतीम....
कुठे जायचे हे ठरवणार नाही
ठरवल्यामुळे वाट अस्पष्ट होते
>>>> हा जास्त भावला...
सॉल्लिड ! फार आवडली गझल. पहा
सॉल्लिड !
फार आवडली गझल.
पहा थोर झालास माझ्यामुळे तू
तिमीरामुळे तेज सुस्पष्ट होते
व्वा !
गरीबीतही लोक संतुष्ट होते जरी
गरीबीतही लोक संतुष्ट होते
जरी त्या जमान्यामधे कष्ट होते
हे तर totally गद्य आहे...
भूषणजी, अभिनव कडून फार मोठी
भूषणजी, अभिनव कडून फार मोठी दाद मिळाली आहे.
आपण एकमेकांशी बोलतो,तश्या गझला लिहील्या गेल्या पाहि जेत असं भट साहेबांचं मत होतं. जर अभिनव ह्यास गद्य म्हणताहेत तर भट साहेबांचा निकष आपण पूर्ण केला असं म्हणायला हरकत नाही.
अभिनवजी,
मनाचे श्लोक ज्या चालीत म्हटले जातात्,त्या चालीत ही गझल म्हणून पहा. तुम्हास यात निश्चित ''पद्य'' आढळेल.
मतला सुरेख.. सगळेच शेर
मतला सुरेख..

सगळेच शेर आवडले
तखल्लुस नेहमी प्रमाणेच भन्नाट!!
...........
अबोला बंद पाडू नको पेक्षा अबोला सोडू नको असं का नाही?
खास बेफी टच
खास बेफी टच
तुला आतपर्यंत भिजवायचे त्या
तुला आतपर्यंत भिजवायचे त्या -
ढगांहूनही मन तुझे भ्रष्ट होते>>> व्वा!!!
काय सॉलिड गझल आहे! भुंग्याशी सहमत! एकदम बेफि टच!!! खुपच आवडली...
मला तू विसरलीस त्या
मला तू विसरलीस त्या पद्धतीने
धुके सूर्यकिरणांमधे नष्ट होते
.
नको बंद पाडूस तू हा अबोला
अशाने गझल फार निकृष्ट होते
.
पहा थोर झालास माझ्यामुळे तू
तिमीरामुळे तेज सुस्पष्ट होते
.
धपाटे दिले त्या नशीबास मीही
तसे कारटे ते नतद्रष्ट होते
.
तिचा शेर वगळून ती दाद देते
इतर 'बेफिकिर' शेर उत्कृष्ट होते
जबरदस्त आहेत हे शेर.
---------------------------------------
(अवांतर- आजकाल भरपूर आणि काहीच्या काहीही प्रमाणात, तारतम्य न बाळगता गझला लिहिल्या जातात,
त्यामुळे गझला निकृष्ट होतात, असे तुम्ही लिहिले असावे, असे उगिच मनाचे मांडे रचून मी तुमच्याशी भांडायला
पुर्या तयारीने आलो होतो. :हाहा:)
खूप छान
खूप छान
आवडलीच
आवडलीच
मला तू विसरलीस त्या
मला तू विसरलीस त्या पद्धतीने
धुके सूर्यकिरणांमधे नष्ट होते
तुझ्यावाचुनी राहिल्याने कळाले
उन्हाहूनही सावली दुष्ट होते
तिचा शेर वगळून ती दाद देते
इतर 'बेफिकिर' शेर उत्कृष्ट होते >> भूषणजी हे तीन शेर तर अफ्फाट आवडले!!!
सर्वांशीच सहमत. वा...
सर्वांशीच सहमत.
वा...
सुपर्ब. गजल कशी असावी? तर अशी
सुपर्ब. गजल कशी असावी? तर अशी असावी. अजून कय लिहू?
वाह.. झक्कास....!!!
वाह.. झक्कास....!!!
बेस्ट.
बेस्ट.:)
छान आहे.
छान आहे.
धन्यवाद मंडळी
धन्यवाद मंडळी
आह्हा !!.. बेफीजी काय
आह्हा !!.. बेफीजी काय लिहिलय्त राव ......
बेफीजी आता लवकरच दुसरा दीवान प्रकाशित करा
(या वेळी मी स्वखर्चाने विकत घेईन म्हणतोय !!........;))
आहे खरे मनात, दुसर्या
आहे खरे मनात, दुसर्या गझलसंग्रहाचे
सह्ही, सुर्रेख, अप्रतिम......
सह्ही, सुर्रेख, अप्रतिम......
अप्रतिम कारीगरी......
अप्रतिम कारीगरी......:)
सुंदर गझल... सगळेच शेर चांगले
सुंदर गझल...
सगळेच शेर चांगले आहेत..
कुठे जायचे हे ठरवणार नाही
ठरवल्यामुळे वाट अस्पष्ट होते
आणि
तिचा शेर वगळून ती दाद देते
इतर 'बेफिकिर' शेर उत्कृष्ट होते
अफाट..
खूपदा वाचली आज... मला खूप
खूपदा वाचली आज... मला खूप आवडते ही गझल....
मतल्यातील ओळींच्या क्रमावर विचार करावा लागेल..
आणि नशीबास मीही मधल्या "ही" मुळे शेर कमजोर होतोय असे वाटते....
यावर कोणतीच चर्चा नको.. माझे मत चुकीचेही असू शकते...
धन्यवाद!
Pages