''जगाचे कायदे पाळू,सुखाने हारण्यासाठी''

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 5 August, 2011 - 10:33

कुणाशी बोललो नाही कधी संवादण्यासाठी
अताशा ढोल वाजवतो जरासा गाजण्यासाठी

फ़ुकाचा शोधतो कागद,जिणे संपून गेल्यावर,
पुन्हा आलेख जगण्याचे ,नव्याने आखण्यासाठी

प्रकाशाने गरीबी जाहली उघडी, बघावे का
जरा जाळून सूर्याला,पुन्हा अंधारण्यासाठी?

सदा लाथाडले आहे जगाने दु:ख देवूनी
कधी भेटेल संधी हे जगत झिडकारण्यासाठी

नियम पाळून कोणीही कुठे जिंकायचा नाही
जगाचे कायदे पाळू,सुखाने हारण्यासाठी

जगाने जाणली ”कैलास”ची नुकतीच श्रीमंती
जरासा संकुचित झालो ,इथे विस्तारण्यासाठी

--डॉ.कैलास गायकवाड

गुलमोहर: 

प्रकाशाने गरीबी जाहली उघडी, बघावे का
जरा जाळून सूर्याला,पुन्हा अंधारण्यासाठी?

तुफान शेर आहे.... तुफान!!!!!!!

सदा लाथाडले आहे जगाने दु:ख देवूनी
कधी भेटेल संधी हे जगत झिडकारण्यासाठी

नियम पाळून कोणी ही कुठे जिंकायचा नाही
जगाचे कायदे पाळू,सुखाने हारण्यासाठी

जगाने जाणली ”कैलास”ची नुकतीच श्रीमंती
जरासा संकुचित झालो ,इथे विस्तारण्यासाठी

सुरेख!!!!

कुणाशी बोललो नाही कधी संवादण्यासाठी
अताशा ढोल वाजवतो जरासा गाजण्यासाठी - वा

फ़ुकाचा शोधतो कागद,जिणे संपून गेल्यावर,
पुन्हा आलेख जगण्याचे ,नव्याने आखण्यासाठी - वा वा वा

प्रकाशाने गरीबी जाहली उघडी, बघावे का
जरा जाळून सूर्याला,पुन्हा अंधारण्यासाठी? - व्वा

सदा लाथाडले आहे जगाने दु:ख देवूनी
कधी भेटेल संधी हे जगत झिडकारण्यासाठी - हम!

नियम पाळून कोणी ही कुठे जिंकायचा नाही
जगाचे कायदे पाळू,सुखाने हारण्यासाठी - छानच!

जगाने जाणली ”कैलास”ची नुकतीच श्रीमंती
जरासा संकुचित झालो ,इथे विस्तारण्यासाठी - व्व्व्वा!

फार फार आवडले शेर! Happy

(अवांतर - याच जमीनीतील माझी http://www.sureshbhat.in/node/1689 ही गझल आठवली. ) Happy

खूप खूप शुभेच्छा कैलासराव! (नियम पाळून कोणीही मधील 'कोणीही' एकच शब्द लिहितात ना?) Happy

-'बेफिकीर'!

मतला आणि मक्ता......लाजवाब!

फ़ुकाचा शोधतो कागद,जिणे संपून गेल्यावर,
पुन्हा आलेख जगण्याचे ,नव्याने आखण्यासाठी..क्या बात है!

Happy

क्या ब्बात है डॉ.साब!

खुदा भी आसमासे जब जमीं पे देखता होगा |...

नुसती वॄत्तातच नाही......चालीत म्हणून पहा

मला तर खूप मजा आली.....

बेफींची सुध्दा अफलातूनआहे, Happy

अतिशय प्रवाही आणी प्रभावी गजल. प्रत्येक शेर जबरदस्त , वजनदार आणी गहन अर्थ सांगणारा. हॅट्स ऑफ तु यू डॉक्टर.

छान.

अ प्र ति म गझल डॉक. !! Happy

<<कुणाशी बोललो नाही कधी संवादण्यासाठी
अताशा ढोल वाजवतो जरासा गाजण्यासाठी<<

<<जगाने जाणली ”कैलास”ची नुकतीच श्रीमंती
जरासा संकुचित झालो ,इथे विस्तारण्यासाठी<<

हे शेर अफाट आहेत.

सुंदर गझल डॉक,

कुणाशी बोललो नाही कधी संवादण्यासाठी
अताशा ढोल वाजवतो जरासा गाजण्यासाठी

फ़ुकाचा शोधतो कागद,जिणे संपून गेल्यावर,
पुन्हा आलेख जगण्याचे ,नव्याने आखण्यासाठी

प्रकाशाने गरीबी जाहली उघडी, बघावे का
जरा जाळून सूर्याला,पुन्हा अंधारण्यासाठी?

हे तीन शेर खूप आवडले, ठळक केलेला शेर अप्रतिम!!

प्रकाशाने गरीबी जाहली उघडी, बघावे का
जरा जाळून सूर्याला,पुन्हा अंधारण्यासाठी?

जगाने जाणली ”कैलास”ची नुकतीच श्रीमंती
जरासा संकुचित झालो ,इथे विस्तारण्यासाठी >>> शेर खुप आवडले डॉक Happy

छान Happy

मस्त गझल डॉक..

मतल्यातला दोन्ही ओळी उलट्या केल्यातर अजून प्रभावी होईल असे वाटले...

फ़ुकाचा शोधतो कागद,जिणे संपून गेल्यावर,
पुन्हा आलेख जगण्याचे ,नव्याने आखण्यासाठी >>> मस्त

प्रकाशाने गरीबी जाहली उघडी, बघावे का
जरा जाळून सूर्याला,पुन्हा अंधारण्यासाठी? >>> मस्त

नियम पाळून कोणीही कुठे जिंकायचा नाही >>> कुठे ऐवजी कधी केले तर?

मक्तातला सानि मिसरा पण आवडला