- स्वगृह
- या गृपमधे भाग घेण्यासाठी मायबोलीत प्रवेश करा/मायबोलीकर व्हा !
उपग्रह वाहिनी
सदस्य प्रवेश |
मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिरातीतुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा. |
|
मला ही मॅकडोनाल्डची नविनच दाखवायला सुरुवात केलेली जाहीरात आवडली. जाहीरातीपेक्षा मला त्याचे गाणे खुप आवडले. कुठल्या भाषेतले आहे?
http://www.youtube.com/watch?v=QLyh32axL0o
इथे हल्ली एक कुठल्यातरी फ्रोझन भाज्यांची जाहिरात लागते. हीरे जैसी चमचमाती हुई सब्जी ?
काय तर शादी के बाद प्यार जतानेके तरीके बदल जाते है म्हणे!! काहीच्य काहीच. त्या प्यार जतानेका अन फ्रोझन भाजीचा संबन्ध काय!! 
डार्क टेम्पटेशन ची जाहीरात मलाही किळसवाणी वाटते... नाक काढून आईस्क्रिमवर पसरतो.... आयाई....

आणि हा बॉडी स्प्रे वापरल्यावर इतक्या प्रचंड प्रमाणात बायका (त्या ही इतक्या दुरून) धावत येतात, असं दाखवण्याचं प्रयोजन काय? AXE च्या सगळ्याच जाहीरातीत असं काहीतरी असतंच... भरपूर बायका.
कुणितरी करण जोहर सारखा असेल तर त्या बिचार्याला हा स्प्रे वापरताच येणार नाही. सगळाच प्रॉब्लेम व्हायचा वापरला तर...
हो, मला पण ती जाहिरात आवड्त नाही, पण ते "डार्क" टेम्पटेशन आहे मला वाटतं, ब्लॅक टेम्पटेशन नाही
मला त्या टॉयलेट क्लिनरच्या जाहिराती पण नाही आवड्त, त्या दाखवण्याआधी स्टॅच्युटरी वॉर्नींग द्यायला हवी, आणि तुम्ही जेवत असताना त्या लागल्या तर बघायलाच नको
स्वप्ना बदल केलाय.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मौत वो अच्छी की जिसके बाद मिल जाए हयात I
जो सबब है मौत का वो जिन्दगी बेकार है II
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
डेअरी मिल्कची केनिया जिंकल्यावर चॉकॉलेट खायची जाहिरात अफलातून आहे. तसंच घशातली खिचखिच थांबवायची नवी गोळी आली आहे "ट्रिव्हिसिल" का काय त्यांच्या दोन्ही जाहिराती मस्त आहेत - पहिली तो माणूस सरकारी कार्यालयात काम करून घ्यायला जातो त्याची आणि दुसरी मुलगी दाखवायच्या कांदापोहे कार्यक्रमाची
मला मिरिन्डाची.. रावण तुने सिता देनी कि नहि देनी ...ती जाहिरात आवड्ते ..
उगाच येतो मधे मधे
कोणी Country club ची add बघीतली आहे का?.. तो जाडा कोण आहे त्यात
तो एमडी आहे म्हणे Country club चा, तसंच एमडिएच मसाल्यांच्या जाहिरातीत पण असाच त्यांचा एक म्हातारा येतो, बहुतेक तो त्यांचा आद्य प्रवर्तक असावा
रिलायन्स बिगची जाहिरात एकदम बकवास आहे, मला तर तो जाड्या राजा पडून फुट्ला की काय असं वाटलं, तो म्हणे खड्डा करून त्यातून पाणी काढ्तो, काहीही दाखवतात!
आणि ती टाटा स्कायची ऍड आहे का? आमिर खानची? काय फालतू आहे....
हो टाटा स्कायची जाहीरात आमिरची आहे, त्याने योग्य तो न्याय दिलाय त्याला, पण जाहीरातीची मूळ कल्पनाच फ्लॉप आहे.
कालच max newyork life ची जाहीरात पाहीली. छान आहे. आपल्या कडे जे नाही ते हवेसे वाटते अशी काही थीम आहे.
एक्स आणि आमीर खान दोन्ही बकवास.
सुरभी मी सुद्धा हेच लिहायला हा बीबी उघडला. मॅक्स न्यू यॉर्क ची जाहीरात खुपच छान आहे.
दुसरी ती अभय देओल आणि रायमा सेन ची जाहीरात ... त्यातले गाणे 'बावरा मन' छान वाटते ऐकायला...
त्या एअरटेलच्या जाहिरातील गाणे 'बावरा मन' ३-४ वेळा मी "बाबुराव पन देखने चला एक सपना" असे ऐकले. मग नंतरच्या ओळीवरुन संदर्भ लागला
मी ऐकलेल्या चुकिच्या गाण्याच्या बी बी वर टाका...
दक्षिणा
आज एक जाहिरात पाहिली... कसल्यातरी मोबाईल कंपनीची होती.... इतकी भिकार.... इतकी हीन पातळीवरची....
पेशंट बेडवर झोपलेला.... बाजूला नर्स उभी.... त्याचा फोन वाजतो... त्याचे हात जायबंदी असल्याने तो तीला त्याच्या खिशातून फोन काढायला सांगतो.....
पुढचे सांगवत नाही.
अशा घाणेरड्या ऍड बॅन केल्या जाव्यात. निदान नर्स संघटनेने तरी या ऍड विरुद्ध आवाज उठवला पाहिजे.
हो हो अमि मी पण पाहीलीए ती जाहीरात. घाणेरडी आहे एकदम.
uchapatee
ami79 , dakshina ती जाहिरात व्हर्जिन मोबाईलची आहे 
हो का स्वप्ना? नावाप्रमाणेच जाहीराती पण आचरट.
आणि माहीताय का? त्या जाहीरातीत दोन मित्र, एकमेकांच्या शेजारच्या खोलीत ऍडमिट असतात, आणि प्लॅनफुली बरोब्बर नर्स आली की एकमेकाना फोन करायचा ठरलेला असतो, पहिल्याच्या रूममध्ये नर्स येते, दुसर्याच्या रूममध्ये नेमका वॉर्डबॉय तो ही गे... कैच्या कै च दाखवतात.....
अगदिच काहितरी.
सखी आज्जी पाहिलीत का?? जाहिराती उदबोधक आहेत पण सखी आज्जी अशी एकदम अवतिर्ण झाल्यासारखी येते आणि मराठीत तीचा आवाज सॉलीड भारदस्त आहे.
सखी आज्जीSSSSSSSSSSS
अरेरे..मला वाटायचं की फक्त सिनेमातचं "असे" विनोद येत आहेत. पण जाहिरातीही मागे नाहीत तर.
या भारतभेटीत अमेरिकाचं पुन्हा पहायला मिळणार असं वाटत आहे.
माझी नणंद तर म्हणाली कि, पुन्यात आजकाल जो तो ईंग्लिशचं बोलतो. खरंय का ?
cadbury chi "kya swad hai jindagi ka " add mala khoop awadate..... cricket ground war six marlynantar tyachi girlfriend dance karit yete........... tyacha video kunakade aahe ka,,,,
कॅडबरी च्या जाहिरातीचा video :
http://www.youtube.com/watch?v=cOjoiX9A7yg
Respect National Anthem
आजकाल ती आयडीबीआय बॅंकेची जाहिरात लागते त्यात ते छोटं हत्तीचं पिल्लू क्यूट आहे आणि जाहिरातीची कल्पना पण मस्त आहे!
मॅक्स न्यूयॉर्क लाईफची जाहिरात मात्र पाहून पाहून कंटाळा आला आता, ह्या जाहिराती किती वेळा दाखवायच्या ह्यावर काही मर्यादा हवी
तसंच ती दिल्ली मॅरेथॉनची ऍड पण मस्त आहे, इतकी सगळी मुलं धावताना पाहून बरं वाटतं.....
टाटा टीची "जागो रे' आवड्ली......
टाटा टी ची थेटरातली जाहीरात जबरदस्त....
स्वप्नाशी सहमत....
नविन एक क्लोरोमिट ची जहिरात लागते त्यात एक पानवाला आपले रक्त देउन एका मुलाचे प्राण वाचवतो आणि नन्तर त्याच्या वडिलान्ना पानवाला स्वताच्या आवडिची मिन्ट खायला लावतो .ती कसली बळच जहिरात आहे...
महागुरु, फार सुंदर जाहिरात.
एक ती जाहिरात लागते, त्यात जोडपे घरी आलेल्या पाहुण्याला या ना त्या कारणाने बाथरूम ला पाठवतात, आणि तो बाथरूम टाईल्स आणी नळ बघून थक्क होतो, जोडपे पण अती खुश होते.
मस्तय ती ऍड.
आणि एक जाहिरात आहे, याहूची आहे वाटतं, त्यात तो तोतरा माणूस पाच आकडे पटकन न म्हणता आल्यामुळे पॅराशुट न उघडताच जमिनीवर पडतो, थोडी पॉलिटिकली इनकरेक्ट वाटते ना ऍड?
अमूलची ती टॉईंग ऍड इतकी फालतू आहे ना....एकदम टेस्ट्लेस, अजून कोणी कसा आक्शेप घेतला नाही कोणास ठाऊक....
ऑर्बिटची ऍड पण मस्त आहे - तो माणूस पंगतीत सगळ्यांना ऑर्बिट वाटतो
मला अंबुजा सिमेंट्ची मुस्कान अनाथालयाची जाहिरात जाम आवडते. पण आजकाल ती पहिल्यापासून दाखवत नाहीत.

*~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~*
समाधानाच्या तेलात राहो सुखाची वात, आनंदाच्या ज्योती लावू .. करू दिपोत्सवाला सुरुवात!
मारूतीची नवी एड पण मस्त आहे, पेट्रोल खत्मही नही होन्दा चीच थीम आहे पण झकास आहे...
तसंच सेव्हन अप किंवा स्प्राईट ह्याची ऍड आहे, तो मुलगा हातात बाटली घेऊन त्या ग्रुपला चांगलं झुलवतो.....