मुकी अंगडी बालपणाची रंगीत वस्त्रे तारुण्याची
जीर्ण शाल मग उरे शेवटी लेणे वार्धक्याचे
असं म्हणतात वार्धक्य म्हणजे दुसरे बालपणच. अर्थात हे दुसरं बालपण सगळ्यांना नकोसंच असतं. बालपण आणि वार्ध्यक्य अशा दोन थीमवर आधारीत हे फोटो फिचर.
=================================================
=================================================
प्रचि १
बालपणी आयुष्याच्या चौकटीतुन, तारूण्याच्या उंबरठ्याआडुन दिसणारे जग किती सुंदर असते ना?
प्रचि २
त्याच आयुष्याच्या चौकटीतुन, तारूण्याचा उंबरठा ओलांडुन, वार्धक्य कधी आले ते समजलेच नाही. आता फक्त आठवणींचा भूतकाळ आणि दु:खाचा वर्तमानकाळच सोबतीला.
=================================================
=================================================
प्रचि ३
भविष्यात येणार्या सुखदु:खाना पेलण्यासाठी मी आणि माझी हि काठीच समर्थ आहे हेच तर याला सुचवायचे नाही ना?
प्रचि ४
बालपणीची ती काठी दूर फेकली गेली, हाती आलेल्या ह्या काठ्या आता उपजिविकेचे साधन बनल्या, पुढे यातलीच एखादी काठी माझा आधार होणार आहे आणि शेवटही तिच्यातच असणार.
=================================================
=================================================
प्रचि ५
उद्याची पर्वा मला आज कशाला?. आजचा दिवस माझा आहे तो मी निखळ हसण्यातच घालवणार.
प्रचि ६
आजचा दिवसतर कसाबसा गेला. उद्याच्या भाकरीचे काय? पण, आलेल्या परीस्थितीला खोटंच का होईना पण हसतच सामोरं गेल पाहिजे ना?
=================================================
=================================================
प्रचि ७
आम्हाला ऊन, वारा, पावसाची भीती नाही. या सर्वांपासुन आमचा बचाव करण्यासाठी आमच्या पालकांची मायेची छत्रीच पुरेशी आहे.
प्रचि ८
ऊन, वारा, पाऊस याची भीती मला आजही नाही. अशा कित्येक संकटांना आयुष्यात सामोरा गेलो आहे. एकच इच्छा - लोभरूपी ऊन, भाऊबंदकीचा वारा, मत्सराचा पाऊस या संकटापासुन माझ्या कुटुंबाला दूर ठेव. या संकटांचा सामना करण्यास माझी पालकत्वाची छत्री कदाचित कमकुवत ठरेल.
=================================================
=================================================
प्रचि ९
लहानपणी आईबाबांबरोबर देवळात जाण्याची एक वेगळीच मज्जा ना. खरंतर पूजेनंतर मिळणार्या प्रसादावरच माझं जास्त लक्ष. 

प्रचि १०
लहानपणी प्रसादाच्या लोभाने देवपूजेला जायचो खरा पण उतारवयात तेच उपजिविकेचे साधन होईल हे मात्र कधी वाटले नाही.
=================================================
=================================================
प्रचि ११
जे काही समोर येईल त्यातच सुख मानायचे, कुणाकडे हात पसरायचे नाही हेच परिस्थितीने लहानपणापासुनच शिकवले.
प्रचि १२
आजही परिस्थिती तशीच राहिली आहे. फरक एव्हढाच कि आता मात्र दुसर्यांपुढे हात पसरण्याशिवाय पर्याय राहिला नाही.
=================================================
=================================================
प्रचि १३
आज मी तुला खांद्यावर घेतलं आहे, कदाचित उद्या तुझ्या खांद्याची गरज मला लागेल.
=================================================
=================================================
खुप छान
खुप छान
नेहमीसारखे मस्तच
नेहमीसारखे मस्तच
व्वा. !
व्वा. !
स्पीचलेस थीम ! अप्रतिम प्रचि
स्पीचलेस थीम ! अप्रतिम प्रचि आणि सुंदर लिखाण.
प्रचि ३ सारखं अफलातून जमलाय. यासारखे आणखी काही 'People Photography' बघायला मिळुदेत.
जबरदस्त थीम.आणि त्याला
जबरदस्त थीम.आणि त्याला पूरेपुर न्याय देणारी चित्रे. अभिनंदन.
अफलातून थीम आणि कॅप्शन्स
अफलातून थीम आणि कॅप्शन्स
छान फोटो आणि लिखाण
छान फोटो आणि लिखाण
अप्रतिम... सर्व प्रकाशचित्रे
अप्रतिम... सर्व प्रकाशचित्रे मनाला भावली...
एक प्रश्न : हे फोटो ही थीम डोळ्यासमोर ठेवून काढलेत की वेगवेगळ्या वेळी काढून त्यांच्यातलं समान सूत्र लक्षात आलं?
मस्त रे!
मस्त रे!
मस्त थीम
मस्त थीम
थीम आणि फोटो... दोन्हीही
थीम आणि फोटो... दोन्हीही आवडलं... मस्तच
जिप्स्या, जबरदस्त!! थीम आणि
जिप्स्या, जबरदस्त!! थीम आणि त्याला अनुरुप प्रचि !!
नेहमीप्रमाणेच क्लासिक
अप्रतिम...
अप्रतिम...
जबरी कल्पना!! एकसे एक प्रचि
जबरी कल्पना!! एकसे एक प्रचि आहेत.
जिप्सी तु तुझ्या प्रकाशचित्रे
जिप्सी तु तुझ्या प्रकाशचित्रे ,थीम चि वाट बघायला लावतो पण ज्या ज्या वेळि प्रकाशचित्रे टाकतो त्या त्या वेळि मन तुप्त होत.
जिप्स्या तोडलस मित्रा ..
जिप्स्या तोडलस मित्रा ..
मस्त
मस्त
अती सुंदर. फोटो आणि
अती सुंदर. फोटो आणि त्याहीपलीकडे त्यावर केलेले लिखाण.
जबरदस्त
जबरदस्त
उत्तम प्रकाशचित्रे आणि थीम
उत्तम प्रकाशचित्रे आणि थीम सुध्दा
"एक धागा सुखाचा" हे गाण सुध्दा तितकच अप्रतिम
जियो मेरे लाल, काले , निले ,
जियो मेरे लाल, काले , निले , हरे, गुलाबी, .......... जिप्स्या खरंच रे ते प्रत्येक फोटोंचे लिखाण आणि मग ती परिस्थिती पाहुन मॉनेटर्ची स्क्रिन घुसर झाली.......
जियो मेरे लाल, काले , निले ,
जियो मेरे लाल, काले , निले , हरे, गुलाबी, .......... जिप्स्या खरंच रे ते प्रत्येक फोटोंचे लिखाण आणि मग ती परिस्थिती पाहुन मॉनेटर्ची स्क्रिन घुसर झाली.......
छानच !
छानच !
आवडलं !
आवडलं !
योगेश, नेहमीप्रमाणेच
योगेश, नेहमीप्रमाणेच अप्रतिइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइम.
थीम,फोटो आणि त्याच लिखाण भारीच .
खुपच छान
खुपच छान
जिप्सी, खूप छान प्रचि. आणि
जिप्सी, खूप छान प्रचि. आणि त्याहुनही सुंदर फोटोंबाबतचं लिखाण. हॅट्स ऑफ मित्रा!
प्रतिसादाबद्दल मनापासुन
प्रतिसादाबद्दल मनापासुन धन्यवाद
एक प्रश्न : हे फोटो ही थीम डोळ्यासमोर ठेवून काढलेत की वेगवेगळ्या वेळी काढून त्यांच्यातलं समान सूत्र लक्षात आलं?>>>>> झुझी :-).
प्रत्येक फोटो हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी काढला आहे. खरंतर वरील १३ + ७ अशी २० प्रचि घेऊन "चेहरे" या शिर्षकांतर्गत प्रदर्शित करणार होतो. पिकासावर फोटो अपलोडही केले. प्रचि रीअरेंज करताना दोन प्रचिंमधील समानता जाणवली आणि "यावर एक थीम होऊ शकते" असा विचार आला :-). परत सगळे फोटो डिलीट केले आणि त्यातील हे मोजकेच १३ प्रचि घेऊन तासाभरातच वरील थीम घेऊन आलो.
खरंतर व्यक्तीचित्र मी फारशी काढत नाही (लहान मुलांचे सोडुन), किंबहुना त्यात माझा हातखंडाही नाही :-). पण वरील चित्रे मनाला भावली आणि हि थीम तयार झाली.
पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासुन आभार!!!
फोटो बद्दल नव्याने काय
फोटो बद्दल नव्याने काय लिहायचे ? शब्द मात्र सुंदर लिहिले आहेस !
मस्त
मस्त
Pages