पनवेलच्या तारा गावात एका स्नेह्यांच्या पार्टीच्या निमित्ताने मागच्या महिन्यात जाण्याचा योग आला. तिथेच युसुफ मेहेरअली सेंटर व त्यांच्याच शाखेचे बोगनवेलीचे प्रदर्शन असल्याने आम्ही ते पाहण्यासाठी लवकरच निघालो. तिथे पाहण्यासारखे इतके होते की आम्हाला वेळ कमी पडला. सर्वप्रथम आम्ही युसुफ मेहेर अली सेंटरला भेट दिली.
युसुफ मेहेरअली ची सुरुवात १९६१ मध्ये झाली. सन १९६६ मध्ये भारताचे व्हाईस प्रेसीडेंट डॉ. झाकीर हुसेन यांच्या हस्ते योग्य रित्या स्थापना करण्यात आली. आपल्या राज्याची उन्नतीला हातभार लावण्यासाठी व गावकर्यांच्या समस्यांचे परिक्षण करण्यासाठी ह्या सेंटरची स्थापना करण्यात आली. अधिक माहीती गुगलवर सर्च करुन मिळेल. ह्या सेंटरमध्ये तेथिल आसपासचे गावकरी काम करतात. साबणाची फॅक्टरी, बेकरी, कुंभारकाम, सुतारकाम तेलाच्या घाणी हे मुख्य आकर्षण ठरते. येथे आयोजित व्यवसाय कला आत्मसात करण्यासाठी, पाहण्यासाठी येथे विविध संस्था, शाळा भेट देतात. शालेय कॅम्पही इथे चालु असतात.
१) युसुफ मेहेर अली सेंटरमध्ये प्रवेश केल्यावर ह्या कुट्या दिसतात. इथे बसुन नाश्तापाणी केले जाते.
४) तिथेच तिथे असणार्या सर्व विभागांची यादी आहे.
६) काही विदेशी कारागिर ह्या सेंटरमध्ये आले होते व हे असे प्लास्टीकच्या बाटल्या कापुन झाड बनवले त्यांनी. मला ते पाहुनच राग आला. त्याएवजी तिथे एखादे हिरवेगार झाड लावावे असे वाटले.
७) हे असे उपद्व्याप केले होते.
८) आता सुरुवात होते येथिल ग्रामोद्योग केंद्रांची.
९) ह्यामध्ये तिन-चार तेलाच्या घाणी/चक्की आहेत. ह्या घाणीं/चक्कींमध्ये शेंगदाणा, खोबरे, तिळ, राई, बदाम इत्यादी तेलांचे उत्पादन निघते.
१०) तेलाचे जिन्नस ह्यात भरडले जाते.
१४) ह्या मशिनमध्ये तेल गाळले जाते.
१८) तेल काढुन झाल्यावर निघालेल्या पेंडी. ह्या दुभत्या गुरांना खाण म्हणुन दिल्या जातात.
२०) ह्या कॅनमध्ये तेल साठवले आहे.
२१) ही आहेत तेलाची उत्यादने (शेंगदाणा, तिळ, मोहरी, बदाम, खोबरे..)
२३) विक्रिसाठी लेबल लावण्यासाठी ठेवलेल्या बाटल्या
पुढच्या भागात कुंभारकाम.
मी गेलो होतो तिकडे. त्यावेळी
मी गेलो होतो तिकडे. त्यावेळी एवढा पसारा नव्हता. आता छान झालेय.
जागू, मस्तच. माझे आजोबा होते
जागू, मस्तच.
माझे आजोबा होते तेंव्हापर्यंत आमचाही तेलाचा घाणा होता.
जागु मला माझ्या लेकीला तिकडे
जागु मला माझ्या लेकीला तिकडे न्यायच आहे ग.
बघू कधी जमतय ते.
मूलांसाठी छान अनुभव आहे हा.
त्यांना स्मॉलस्केल इंडस्ट्रिज जवळून बघता येतात ना इथे.
छान माहिती.
छान माहिती.
ग्रेट ! छान माहिती.... एकदा
ग्रेट ! छान माहिती....
एकदा भेट द्यायला पाहीजे !
हो उजु लहान मुलांना इथे
हो उजु लहान मुलांना इथे आवर्जुन न्यावे.
दिनेशदा अजुन भाजीचा मळाही आहे तिथे.
गजानन म्हणजे तुम्ही अगदी जवळुन पाहीला असेल.
विशाल नक्कीच जा तुम्ही.
मामी धन्स.
जागू, हो. (पण तो व्यवसाय
जागू, हो.
(पण तो व्यवसाय पिठाच्या गिरणीप्रमाणे चालायचा. एकच घाणा होता. तुम्ही तुमचा भुईमूग, करडई, सूर्यफुलाच्या बिया घेऊन या आणि तेल काढून न्या. खरेतर पिठाच्या गिरणीला जोडधंदा म्हणूनच भात कांडायची गिरणी आणि तो तेलाचा घाणा काढला होता.)
जागू, उपरोधिक दृष्टीने
जागू, उपरोधिक दृष्टीने प्लास्टिक बाटल्यांपासून बनवलेल्या झाडाकडे बघितलंस तर परदेशीयांचं कौतुक वाटेल.
अगणित वेळाम तिथून गेलो पण
अगणित वेळाम तिथून गेलो पण युसुफ मेहेरअलींबद्दल आदरभाव असूनही एकदाही आंत जाणं झालं नाही. माहिती व प्र.चि. छान . धन्यवाद.
मंजु मला नाही ग वाटणार कारण
मंजु मला नाही ग वाटणार कारण जिथे झाडं जगु शकत नाही अशा एरियात जर हा शोपिस उभारला तर ठिक आहे. पण ज्यामातीतुन सुंदर हिरवळ निर्माण होत असेल तिथे हे प्लास्टीकच झाड उभारण नाही ग आवडल मला. कदाचीत हे माझ झाडांवरच प्रेम असेल ज्यामुळे मला ही गोष्ट पटत नाही.
भाउ मग एकदा नक्की भेट द्या.
छान.. ऐकून होतो खूप.. बघायला
छान.. ऐकून होतो खूप.. बघायला मिळाले
जागू, अगं ते बाटल्यांचं झाड
जागू, अगं ते बाटल्यांचं झाड किती बोडकं आणि कुरूप दिसतंय.
'प्लास्टिकचा वापर टाळा, पर्यावरण टिकवा' असा संदेश त्यांना द्यायचा असेल असं नाही का वाटत ते झाड बघून?
हायला, बरेच सुधारले की हे
हायला, बरेच सुधारले की हे लोक.. मी दोन्-तिन्दा गेलेले. दर वेळेला वाटले की आता बस... पुढच्या वेळेस बंदच पडलेले असणार./....
सुधारले तर चांगलेच आहे. त्यांचे प्रकल्प मला तरी खुप आवडलेले. त्यांचे साबण मस्त आहेत. वाशी अपना बाजारात मिळतात त्यांचे सेंटर आहे तिथे मिळतात.
अरे वा! एकदा भेट दिली पाहिजे.
अरे वा! एकदा भेट दिली पाहिजे.
छान माहिती.
साधना हो ग मलाही आवडले ते
साधना हो ग मलाही आवडले ते साबण.
यो अजुन बरेच आहे. पुढच्या भागांमध्ये टाकते.
'प्लास्टिकचा वापर टाळा, पर्यावरण टिकवा' असा संदेश त्यांना द्यायचा असेल असं नाही का वाटत ते झाड बघून?
त्यासाठी त्यांनी प्लास्टिकचाच वापर केलाय ना पण. अग त्या फांद्यांच्या बाटल्यांमध्ये पण त्यांनी प्लॅस्टिकचे रॅपर टाकलेले. मला ते बघुनच कसतरी वाटल. असो प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते.
छान माहिती.
छान माहिती.
गेली पंधरा वर्षे जवळपास
गेली पंधरा वर्षे जवळपास महिन्यातून एकदा मुंबई गोवा हायवे वरून प्रवास करत आहे. मात्र एकदा आहे, युसुफ मेहेरअली सेंटरमध्ये गेले नाही. या शनिवारी मात्र ठरवून तिथे गेले. जागू ताईने वर नमूद केलेले प्लास्टिकचे झाड तसेच फार पूर्वी तिथे असलेली प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करून बनविलेली झोपडी या दोन्ही गोष्टी नाही. बऱ्याचशा व्यवसायांची तशी रया गेलेली आहे. तसेच शनिवारी तेथील लोकांचा रजेचा दिवस असल्याने माती काम, सुतार काम, साबण फॅक्टरी, कौशल्य विकास या गोष्टी बंद होत्या. तेलाच्या फॅक्टरीमध्ये मशीनचे रिअसेंब्लिग चालू असल्याने तेही बंद होते.
मात्र थोडे पुढे गेल्यानंतर तिथे एक पॉलिहाऊस दिसले. तेथील सेवकाशी चर्चा केली असता समजले की, ते संपूर्ण पॉलिहाऊस हे सुभाष पाळेकर यांच्या तत्वानुसार चालते. ते पॉलिहाऊस चालविणारा सेवक हा सुभाष पाळेकर यांचा शिष्य आहे.
तिथे यापूर्वी कधीही न पाहिलेले कसावाचे झाड म्हणजेच साबुदाण्याचे झाड पाहिले. तसेच हे ear pod tree नावाचा भलि मोठा वृक्ष बघितला. त्या वृक्षावर किमान दहा ते पंधरा मधमाशांची पोळी आहेत.
तसेच बाजूला एका भाजीपाल्यासाठी जागा राखीव आहे तेथे एका तरुण सेवकाने विविध प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या, वेल भाज्या लावल्या आहेत. ज्यांचा वापर तेथील कॅन्टीनला केला जातो.
एकंदरीत जरी स्मॉल स्केल इंडस्ट्रीज बंद असल्या तरी आमचे दोन ते तीन तास अगदी मजेत गेले.
तेथील कॅन्टीनला वरण भात भाजी लोणचं अशा स्वरूपाचं साधं पण चविष्ट जेवण मिळालं. निसर्गप्रेमींसाठी ग्रुपने जाऊन वेळ घालवण्यासाठी आणि नवीन माहिती मिळवण्यासाठी योग्य ठिकाणी आहे.