काही दिवसांपुर्वी एका कामानिमित्त अलिबागला जाण्याची संधी मिळाली. अलिबागला जाण्यासाठी उरणच्या करंजा ह्या गावातुन तर (बोट) असते. ही तर १५ मिनीटांत अलिबागच्या रेवस किनार्यावर पोहोचते. इतके जवळ की दोन्ही किनारे एकमेकांना हाय हॅलो करतात.
सकाळी ९ ची तर पकडायची होती. पण नेहमी प्रमाणेच उशीर होऊन ९ ची तर नुकतीच गेली होती. आता दुसरी तर १ तासानंतर होती. मग टाईमपास काय करायचा? सोबत श्रावणी, आहो, त्यांचे मित्र आणि त्याची बायको म्हणजे माझी मैत्रीण होती. आहो, त्यांचे मित्र आणि श्रावणी गेले खाउ शोधायला. माझी मैत्रीण आणि मी दोघी धक्क्यावर थांबलो. आता वेळ होता म्हणुन फोटो काढण्याचीही खुमखुमी आली.
करंजा बंदरावरुन ट्रॉलत, बोटी मच्छी पकडण्यासाठी समुद्रात जातात. त्या बोटी विश्रांतीसाठी किनार्यावर पहुडल्या होत्या.
समुद्रात मासेमारी करीता निघालेल्या बोटी
बोटिंचे आणि किनार्याचे निरिक्षण करता करता माझे लक्ष अचानक कुठे जाणार हे तुम्ही ओळखलच असणार.
आता ह्यांचे आणी माझे नक्कीच काहीतरी रुणानुबंध आहेत ह्याची मला खात्री पटली. मग माश्यांना पाहून पर्समधील कॅमेर्यानेही बाहेर येण्याची धडपड चालू केली आणि मच्छीवर फ्लॅश मारायला सुरुवात केली. आता मी शोधू लागले कुठले कुठले मासे आहेत ते, मासे अर्धवट सुकलेले होते. ते अशा प्रकारे टाकले होते की जणू काही कचरा म्हणून फेकुन दिलेत. कारण त्यावर प्लॅस्टिक वगैरे उडुन आल होत.
पण हा माझा भ्रम एका कोळणीने येउन मोडून काढला. ती त्या माश्यातली मांदेली निवडून टोपलीत घेत होती. आणि ती तिला अजुन खडखडीत सुकवणार होती.
मग शोध घेत असताना मैत्रीणिने इचर मासा बाजुला काढला. तिच्या माहीतीनुसार मोठ्या इचरांचे कालवण करतात. कोलंबीप्रमाणेच साधारण लागतात.
मग त्यात एक आकर्षक मासा आम्हाला दिसला त्याचे आम्ही फोटो सेशन केले. तिथे बाजुने चाललेया एका कोळी गृहस्थांना त्या माश्याची माहीती विचारली. त्यांच्या माहीती प्रमाणे त्यामाश्याचे नाव ठेम आहे. हा मासा विषारी आहे. मनात म्हटल तरीच कधी ह्याच दर्शन बाजारात झाल नाही.
कोळणी तेथे माश्यांच्या पाट्या घेउन येत होत्या व रिक्षात बसुन उरणच्या बाजारात विकायला नेत होत्या त्यामुळे त्यांना रिक्षात थांबवुन फोटो काढायला मागितले असते तर त्यांनी गोंगाट करुन पब्लिक गोळा केली असती म्हणुन त्या फंदात पडले नाही. पण एक्-दोन कोळणी तिथेच बसल्या. लगेच आम्ही उत्सुकतेने तेथे गोलो. आम्ही जायच्या आतच तिच्या भोवती घोळका जमा झाला. काही हॉटेल्सवाले खास मासे नेण्यासाठी रोज इथवर येतात ही माहीती नव्याने मिळाली. त्या कोळणिकडे कोलंबीची पाटी होती. कसाबसा तिची परमिशन मागुन फोटो घेतला पाटीचा पटापट.
आता तर येताना दिसली तसे आम्ही तरीच्या दिशेने जाउ लागलो. हा मार्ग समुद्रातील तरीवर जाण्याचा.
जाता जाता परत माझी आवडती दृश्ये दिसली. तेथिल दगडानवर कालव होती. अशी दगडाला कलवांच्या कवचा असतात.
हे कवच खरळाने फोडून कालवे बाहेर काढली जातात. हे खुप मेहनतीचे काम असते. एक बाई कालव काढतच होती.
कालवांवरुन आठवण झाली मारुती चित्तमपल्लि ह्यांच्या जंगलाच देणं ह्या पुस्तकात त्यांनी त्यांना मिळालेल्या माहीतीचे वर्णन करताना सांगितले आहे की ही कालवे जेंव्हा उघड मिट करतात कवचांचे तेंव्हा मच मच आवाज येतो.
आता तरीममध्ये जागा मिळवण्याची धांदल सुरु झाली त्यामुळे कॅमेरा गपचुप आपल्या जागेवर जाउन बसला. मग एकदम रेवसचा किनारा आल्यावरच तो बाहेर पडला. रेवसच्या किनार्यावर दुरवर खारफुटी पसरली आहे. पुर्वी ही खारफुटीची झाडे स्थानिक लोकं तोडून जाळण्यासाठी सुकवायचे. पण ह्या खारफुटींच्या झाडांमुळे वादळांपासुन काहीप्रमाणात गावांचे रक्षण होते. ह्यांची मुळे घट्ट जमिनीत रुतलेली असतात त्यामुळे तुफानाचे पाणि गावात शिरण्यात अडथळा निर्माण होतो म्हणुन सरकारने खारफुटी तोडण्यावर बंदी घातली आहे म्हणुन ह्या खारफुटीचे आता जंगल झाले आहे.
अलिबाग रेवसचे खारफुटीचे जंगल
धक्यालगतच्या खारफुटीला फुले आलेली होती.
अलिबाग मध्ये खाडीच्या दिशेने पाण्याची वाट
पुढे गेले की बायका रेवस स्पेशल खाउ घेउन बसलेल्या असतात.
रेवसची ही फेमस कसर. ही कसर उकडूनच वाटे करुन इथे विकायला ठेवलेली असतात. कसर ही तळ्यातील वेलीची मुळे असतात. त्यांना केस असतात. ह्या कसरांचे वरचे साल सुरीने किंवा दाताने काढावे लागते. त्याच्या अतील गरही कडक असतो पण तो खाताना तोंडाचा व्यायम होतो. पण चविष्ट असल्याने खुप जण आवडीने खातात.
दुसरा मेवा असतो तो म्हणजे मिठाच्या पाण्यात मुरवलेले मोरावळे. ह्या आवळ्यांवर पाणि प्यायले की पाणी गोड लागते.
इथे मिळणारी खोबर्याची चिक्कीही फेमस आहे. लहानमुलांचा अगदी आवडीचा खाउ.
हे सगळ गोळा करुन आम्ही रिक्षात बसलो परत कॅमेरा आत गेला कारण रिक्षा इतकी जोरात आणि दणादण आपटत होती की आम्हीच आम्हाला सावरत होतो. पण आजुबाजुला दिसणार्या निसर्गसौदर्यामुळे रिक्षा दगदगीची वाटली नाही.
आलिबाग उरकुन परत आम्ही रेवसवरुन करंज्याला आलो. आता तर मला आनंदाच्या उकळ्याच फुटल्या हे दृश्य पाहुन. धक्यावर बोंबिल आणि वाकट्यांच्या पताका लावलेल्या होत्या. एखादा सण असल्यासारखेच मला वाटत होते.
मी हावर्यासारखे जवळ जाउन फोटो काढले
अजुन जवळ जाउन फोटो काढला.
अशा प्रकारे निसर्ग आणि मासे ह्या दोन्हींची भेट झाल्याच्या आनंदपुर्तीत माझा प्रवास पुर्ण झाला.
हो, त्याने मासे खाल्ले तर मग
हो, त्याने मासे खाल्ले तर मग माणसे काय खाणार? त्याने 'जागुच्या घरी कसे जायचे?' असे विचारताच माणसांना कळले जागुच्या घरी ह्याला कसले आवतण आहे ते... केले मग जेरबंद. एवढे चांगले तळलेले मासे काय बिबट्याला खाऊ द्यायचे????
जागू मस्तच सफर आहे. आता लवकरच
जागू मस्तच सफर आहे. आता लवकरच बहुधा अलिबागच्या वारंवार भेटीचा योग येणार आहे. झालं तर तुला घेऊनच जाईन.
जागुच्या घरचा पत्ता आता
जागुच्या घरचा पत्ता आता माशांनाही माहित झालं असेल. उरणला कधी चुकला माकलात तर समुद्रातील माशांना विचारा...ते दाखवतील," हेच त्या बाईचं घर जी बया आमची संख्या कमी करतेय" !
खेकडे पण वाळवतात? पहिल्या
खेकडे पण वाळवतात? पहिल्या फोटोत तर भरपुर आहेत. पण माझ्या आवडीचा सुकवलेला मासा मात्र नाही
बांगडा....
सुकवलेला बांगडा, मोरी, पापलेट, हलवा. हे सगळे पणजीच्या आणि वाडीच्या मच्छीमार्केटात पाहिलेय. सुकवलेली मोठ्ठी मोरी पाहिलीय. शिवाय सुकवलेला इसवन, रावस, घोळ... किती मोठाले तुकडे होते. मोठे तुकडे कापुन त्यांना मिठ लावुन सुकवलेले. हे बहुतेक असे उघड्यावर सुकायला टाकत नसतील. कुत्रे पळवतील. (माझी आजी सुकवलेल्या मोरीचे असे काय फर्मास टिकले करायची. आणि बांगड्यांचे पण.. अबब.... मला दुर्दैवाने सुकवलेल्या मोरीची अॅलर्जी होती. आता परत खाऊन बघायला पाहिजे वयपरत्वे अॅलर्जी नाहिशीही झाली असेल)
साधना मला बांगडा आवडतो. पण
साधना मला बांगडा आवडतो. पण समहाऊ त्याचं आणि माझं गणित काही जमत नाही. तो खाल्ला की मी आजारीच पडते.
वेंगसरकर सिंड्रोम
वेंगसरकर सिंड्रोम
साधना, चला म्हणजे आता मी
साधना, चला म्हणजे आता मी सिक्सर मारायला मोकळी. विषयांतर केल्याबद्दल सॉरी गं जागू.
ठमे कधी येणार आहेस ? साधना अग
ठमे कधी येणार आहेस ?
साधना अग माश्यांच्या भेळीत खेकडे असतात. सुकवलेले खेकडे मी अजुन खाताना नाही पाहीले. त्यातले चांगले मासे काढून ते खेकडे टाकुन देत असणार. बाकी तु म्हणतेस ते खारवलेले मासे आठवुन तो.पासु.
मी आर्या - आणि माबोवर पब्लिसिटी पण करतेय
जागुतै..रेवस पासुन १० मिनिटे
जागुतै..रेवस पासुन १० मिनिटे रिक्शा ने कोप्रोलि माझं गाव......माझा जायचा मार्ग पण हाच..जवळ पडतो म्हणुन....एक्दम मला गावाला चाल्ल्यासारखच वाटलं...
मस्तच सफर घडवली.....
मस्तच सफर घडवली.....
जागूजी, <<आयुष्यवंत हो
जागूजी, <<आयुष्यवंत हो मत्स्यवंत हो |>>बागुलबुवांना १००% अनुमोदन देण्यापलिकडे म्यां पामर काय बोलणार ?
छान फोटो आहेत. गंमत म्हणजे
छान फोटो आहेत. गंमत म्हणजे काही दिवसांपूर्वी ( पेपरचे नाव लक्षात नाही, मी तर फारच भुलक्कड आहे.:फिदी:) मी एक पुरवणी जपुन ठेवली होती त्याची आठवण आली. ती शोधावी लागेल. उरणला काहीतरी फिरण्याजोगे पण स्पॉट आहेत याविषयी ती होती. नेमका मजकूर पुर्ण आठवत नाही.
जागु तुला माहीत असेलच की. ती खाडी आणी भव्य समुद्र पाहुन डोळे निवले. मला पाण्याचे फार आकर्षण आहे, पुढचा जन्म माशाचा मिळावा असे मला नेहेमीच वाटते.:फिदी:
हे जे मिक्स मासे दाखावले
हे जे मिक्स मासे दाखावले ना.....त्याला खेंगट् बोलतात ... दिसायला गबाळग्रंथी असल्यामुळे सहसा नवीन माणसं घेत नाहीत.....पण याचं कालवण ऑसम लागतं......
पावसाळा म्हणजे सुकि मासळि
पावसाळा म्हणजे सुकि मासळि खायचे दिवस
तो पा सु
मस्तच. मासे पाहुन तोंपासु.
मस्तच. मासे पाहुन तोंपासु.
जागु खुप छान आहे आपला
जागु खुप छान आहे आपला आलीबाग.मला ते मुरवलेली आवले खुप आवदतात.
मस्तच....
मस्तच....
बोंबला चे तोरण... मस्तच
बोंबला चे तोरण... मस्तच दिसतेय जागु
!!
खेंगट!!! आहाहा...... किती
खेंगट!!! आहाहा...... किती दिवसांन्नी ऐकला हा शब्द!
मस्त लागतं याचं कालवण
रच्याकने... जागु तु कुठे राहतेस उरणला? मी कालच जाऊन आले नि तुझी आठवण पण आलेलि.
Pages