मध्ययुगातले गावः किर्केल, जर्मनी (बेली डान्स व्हिडिओसहित)

Submitted by सानी on 6 May, 2011 - 11:05

प्रेरणा: आशुचॅंपचे १०० वर्षांपूर्वीचे गाव

जर्मनीत किर्केल या गावी दरवर्षी 'मिडलआल्टर मार्क्ट' म्हणजे मध्ययुगातला बाजार. हा उन्हाळ्यात वसवला जातो. त्यात जुन्या काळातल्या लोकांचा पेहराव, दाग दागिने, वाद्ये, संस्कृती यांचे प्रदर्शन घडवले जाते. २ वर्षांपूर्वी तिथे जाण्याचा एकदा योग आला होता. पण त्याचे जास्त फोटो नाहीत. जेवढे आहेत, तेवढे टाकते आहे. यावर्षी जाणे झाले, तर परत नवीन फोटो टाकेन.

शुल्लक शुल्क भरले की हातावर असा शिक्का मारतात, तेच प्रवेशाचे तिकिट.

त्या काळातले हे लोहारकाम असेल का?

हेच ते दाग-दागिने

हा त्या काळातला भिकारी असेल का?

त्या काळातले कपडे, दाग-दागिने घालून, त्याच काळातले नृत्य करणार्‍या ललना

हे फोटोज होते दोन वर्षापूर्वीचे, पण व्हिडिओ आहे मागच्या वर्षीचा. लक्षपूर्वक पाहिले तर समजेल, त्याच त्या ललना, फक्त कपडे थोडे वेगळे आहेत... त्यांचे सुंदर नृत्य पहात असतांना बाकीचा बाजार पहायची इच्छाच होत नाही...हे वेगळे सांगायला नकोच, नाही का? Proud

http://www.youtube.com/watch?v=1lCpY5Po_No

आहे की नाही मी रुबाबदार? असे तर नाही ना हा घुबड म्हणत?

हे पण आपल्या सारखेच सामान्य लोक.... याच मार्केटमधून आधीच्या वर्षी खरेदी केलेले ते कपडे घालून मार्केटमध्ये आलेले आहेत. जणू त्या काळचे जीवनच जगतायत....

भूक लागली? मग पूर्वीच्याच पद्धतीने बनवले जाणारे ग्रील्ड फ्लेश तयार होतेच आहे, तुमच्याचसाठी! Happy

From Mittelaltermarkt, Kirkel

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

.

व्वा व्वा!

मस्तच!

(अवांतर - यात सर्व चित्रांमध्ये एक आपलेही चित्र इन्सर्ट करायचेत की, दिसले तरी असते की मायबोलीवरील सर्वात प्लेझंट आय डी प्रत्यक्षात कसा दिसतो ते!)

घुबड आणि घार (?) की गरुड (?) हे फोटो फारच आवडले.

आणि त्या खालोखाल ग्रील्ड फ्लेश!

वा वा वा! मस्तच सफर सानी! धन्यवाद!

-'बेफिकीर'!

बहुतेक अल्बमचे सेटिंग 'पब्लिक' केल्याशिवाय फोटो दिसत नसावेत! मला माबोवर पिकासा अपलोडचा अनुभव नसल्याने, प्रयोग करते आहे. जाणकारांनी कृपया मार्गदर्शन करावे! मला तर सगळे फोटोज व्यवस्थित दिसत आहेत! Uhoh

दिनेशदा, आत्ता शोधल्यावर समजलं की ह्या वर्षी २१-२२ मे ह्या दोन दिवसांत हा बाजार भरणार आहे! नशीब मला हे प्रचि टाकण्याचे आत्ता सुचले... महिनाभर उशीर झाला असता तर ह्या वर्षीचा बाजार मी नक्कीच मिसला असता! आता या निमित्ताने मी ह्या वर्षीच्या बाजारात नक्की जाणार!

ट्यागो, ह्यावेळी जाईन आणि सगळं जास्त डोळसपणे पाहिन! नीट फोटो पण काढेन आणि माहितीही लिहिन. Happy

सर्वांचे अनेक आभार! Happy

सानी..मस्त फोटोज.. या वर्षीही जा नक्की..आणी ते ईस्पेशल कपडे घालून एक फोटो काढून घे तुझा..
आणी इथे टाक. Happy
घुबडाचे डोळे केव्हढे लाल आहेत..

अरे सही ना! किती प्रतिसाद आलेत! धन्स लोक्स! Happy

वर्षू, ट्राय करेन! Happy

ललिता, त्या बायका बेली डान्स इतक्या मस्त करतात ना!!!! मी जमले तर त्याचा व्हिडिओपण टाकेन Happy

मुकु, हो, २१-२२ मे ला आहे. Happy

सानी,
छान माहिती ! फोटो आवडले !
तुझ्याकडुन खुप दिवसातुन असा लेख वाचायला मिळाला, आता आणखी येऊ दे !
Happy

बाकी, या खालील अटी/शर्ती तु अगोदरच मान्य केल्या आहेत, त्यामुळे लक्षात ठेव .. Lol
ह्यावेळी जाईन आणि सगळं जास्त डोळसपणे पाहिन! नीट फोटो पण काढेन आणि माहितीही लिहिन

मस्त फोटो सानी. ह्यावर्षी सुद्धा जा आणि आणखी माहिती काढून आण. हो आणि त्यात स्वतःचे पण फोटो घालायला विसरु नकोस. तुझ्या नावाने तु ड्यु आयडी असल्याची वावडी आहे. ( माझी खात्री आहे कारण तुझ्या वडीलांनी मला फोन केला होता. ) हे मी कुणाकुणाला सांगु?

धन्स अनिल, नितीन, जे मला ओळखतात, त्यांना मी वरिजनल आहे हे माहितीच आहे... त्यामुळे ज्यांना मी डुआय वाटते, त्यांच्या शंकांची मला चिंता नाही!!! आणि मला ते प्रुव्ह पण करायची गरज नाही.... Happy क.लो.अ. Happy

त्या नाचणार्‍या स्त्रीयान्चे कपडे अन आपल्याकडल्या "लमाणी" स्त्रीयान्चे कपडे जवळपास सारखेच वाटतात, नै?
चान्गली माहिती Happy अजुन येऊद्यात यावर्षीची देखिल.

धन्यवाद स्वाती, लिंबुदा! खरंच कपड्यांमध्ये साम्य आहे. तुमचं निरिक्षण बरोबर आहे. मागच्या वर्षीचा बेली डान्सचा व्हिडिओपण टाकलाय आता. त्या डान्सच्या प्रचिंच्या खालीच.