स्पिक एशिया यात गुंतवणुक योग्य आहे का?

Submitted by दादाश्री on 3 May, 2011 - 08:20

स्पिक एशिया नावाने सर्वे कंपनी नेट वर कार्यरत आहे , अंदाजे ३ महीन्यात पैसे दुप्पट देउ करत आहेत . सर्वे घ्या अन त्याबदल्यात रुपये तेही आमेरिकन डोलर मध्ये Happy काय आहे हे मदत करा .आम्ही लाखो रुपये कर्ज काढुन सरळ साधे व्यवसाय कष्टान करतो अन नफा जेमतेम . पण आस काही आल की सचोटीन काम करणारे तनं मनं लोभान भरकटतं. मग काय आसेल हा फंडा ? मित्रांनो कळवा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे लोकांचे पैसे दुप्पट करणारे आणि भोंदूबाबा यांत काहीही फरक नाही. 'दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये|'

इथले वाचुन मी फुकटात सर्वे करुन घेणा-या आय.. वरुन नाव सुरू होणा-या कंपनीत रजिस्ट्रेशन केले, अर्थात फुकटच. तिथले सर्वे इतके डिटेल्ड आहेत की माझ्यासारख्या नोकरी-नी घर दोन्ही कसरती करणा-या माणसाला एवढा वेळ देणे शक्य नाही.... सर्वे कितीजणानी भरावा नी किती दिवसात भरावा याचे लिमिट आहे. तुम्ही तुमच्या सोयीने भरायला बसलात तर वेळ जाईल फक्त, पैसे मिळणार नाहीत. पण ही साईट निदान जेन्युइन वाटते. ज्यांना वेळ आहे त्यांनी करावे हे काम.

माझ्या हाफिसात काही जणांनी पैसे भरलेत स्पिकमध्ये. इतरजण वाट पाहताहेत यांचे पैसे कधी बुडताहेत ते... Happy

माझ्या शेजा-याने 'मी स्पिकसाठी ३०-४० लोकांची टिम तयार केलीय, आतापर्यंत १०० झाले असते पण स्टार माझामुळे निगेटिव पब्लिसिटी झाली' असे सांगुन मलाही खेचायचा प्रयत्न केला. मी मनात म्हटले, सर्वे भरुन कोणी श्रीमंत होईल का ते माहित नाही, पण या शेजा-यासारखे इतरांना नादी लावण्यात हुशार असलेले लोक मात्र कंपनी बुडेपर्यंत माणशी ३००० च्या रेटने काही लाख नक्कीच कमावतील. (आपण बकरा बनल्यावर अजुन एक बकरा पकडुन आण्ला की रु ३००० मिळतात असे शेजा-याने सांगितले. अर्थात बकरा हा शब्द मात्र माझा Happy ) कंपनी बुडली की आपण्ही हात वर करुन मोकळे व्हायचे.

Happy

Pages