टेंपल ऑफ हेवन

Submitted by वर्षू. on 13 April, 2011 - 04:40

१४२० मधे मिंग सम्राटांनी बांधलेल्या या देवळात मिंग आणी छिंग डायनेस्टीचे सम्राट , २१ सप्टेंबर ला चांगला पाऊस आणी उत्तम पीक दिल्याबद्दल देवाचे आभार मानण्याकरता तर २१ मार्चला पितरांची पूज करण्यासाठी इथं येत.ही देवळे चीन मधली सर्वात मोठी देवळे आहेत. दक्षिणोत्तर लांबी तीन किमी असून या देवळांनी २७३ हेक्टेअर जमीन व्यापलेली आहेत.
देवळाच्या भोवती दोन डबल तट आहेत. त्यापैकी उत्तरेकडचा गोल आकाराचा तट स्वर्गाचे प्रतीक तर तर दक्षिणेकडचा तट पृथ्वीचे प्रतीक म्हणून चौकोनी आहे. (त्या काळी पृथ्वी चौकोनी असल्याचा समज होता)

प्रवेशद्वारातून आत शिरल्या शिरल्या एका उंचच्याउंच झाडाच्या सर्वात टोकाच्या फांदीवर स्वस्थपणे विराजमान झालेला हा पक्षी, अढळ स्थान मिळवलेल्या ध्रुवाप्रमाणे भासला..

देवळाचं प्रवेशद्वार

देवळाचं विस्तीर्ण आवार आणी आजूबाजूला असलेल्या विविध इमारती.ताओ धर्माची देवळं.इ.

१२५ फूट उंच,९० फूट रुंद,पांढर्‍या ,तिहेरी चबुतर्‍यावर उभे असलेल्या देवळाचे प्रथम दर्शन. ,तिहेरी छपरावर ,कळसाशी मिळणारी ५०,००० निळी कौलं,पांढरा,लाल,सोनेरी,पिवळ्या रंगांचा मिलाफ, कडेने सोनेरी नक्षी आहे. ही वास्तू बांधण्याकरता एकही लोखंडी खिळा,सिमेंट वापरण्यात आलेला नाही. हे सबंध स्ट्रक्चर लाकडी सांध्यांवर उभे आहे.

देवळाच्या आत लाल रंगाचे,२८ नक्षत्रांचे प्रतीक म्हणून २८ खांब आहेत. त्यापैकी चार मुख्य खांबांवर चार ऋतुरूपी चार ड्रॅगन आहेत.

छप्पर तोलून धरणारे खांब

इथे पितरांच्या शिळा ठेवलेल्या आहेत. त्यांच्यासमोर बळी दिलेल्या जनावरांचे मांस ,नैवेद्य म्हणून दाखवण्यात येई.

शुद्ध सोन्याचा मुलामा दिलेला कळस

देवळाच्या आवारातलं हे पाचशे वर्ष जुनं सायप्रस चं झाड ,मात्र त्याला अजून पालवी फुटते. या झाडाला नऊ ड्रेगन्स चं झाड ही म्हणतात. त्याच्या खोडावरच्या असंख्य गाठींमुळे त्याच्यावर खरोखरच नऊ ड्रॅगन्स सळसळतायेतसं वाटतं. हा फोटो आंतरजालावरून घेतलाय कारण मी घेतलेला छान स्पष्ट आला नव्हता .

गुलमोहर: 

.

मस्त!
जपान आणि चीन यात फारच साधर्म्य आहे.
देवळांच्या बाबतीत तर फारच जाणवतं. कौतुक आहे जपान्यांचं. परफेक्ट उचललंय (पॉझिटीव्हली!)

सर्वच सुंदर आहेत.
सर्व प्राचीन वस्तू इतक्या काटेकोरपणे जपणे, त्यांची निगा राखणे, स्वच्छता ठेवणे याबद्दल दाद दिल्याशिवाय राहवत नाही.

वर्षु नील - एकदम झकास बाकी फोटो निवांतपणे बघून घेतोय.निळ्या आभाळात निमुळते होत गेलेले झाड त्यावरचा अनोळखी पक्षी
जीव वेडावून जातोय. सगळेच फोटो अप्रतिम अप्रतिम निव्वळ नितांत सुंदर ..!!

मस्त फोटोज वर्षू. मला चायनामधील सगळ्यात जास्त हेच आवडलं त्याला कारण तो ऐसपैस, शांत परिसर व झाडी.

@ रावी.. आताशी दिसतात कधीमधी पक्षी.. कबुतरं,चिमण्यामात्र मी खरच पाहिल्या नाहीत इथे.
इकडे अश्या स्थळांची उत्तम व्यवस्था ठेवली जाते. तिकिट अगदी नॉमिनल असून सुद्धा स्वच्छता, शिस्त अगदी कडकपणे पाळली जाते.

थँक्स निलतै, तुझ्या 'पायी' (इथे 'पाय' 'चरण' असाही अर्थ लावणे) आमचीही भटकंती होते.
सुंदर प्रचि, माहीती आणि वर्णनही छान केले आहेस. Happy

ऑसम!!!

फोटो २ आणी ३ पाहिल्यावर माझ्याकडे पुर्वी असलेल्या Prince of Quin गेमची आठवण झाली. मस्तच फोटो.

मस्त.
संपूर्ण देऊळ लाकडावर उभे केलय - सही. आर्कीटेक्चर/सिव्हील इंजिनिअरींग करणार्‍या सगळ्या लोकांची एक तरी चक्कर इकडे होतच असेल ना ह्या वास्तूचा अभ्यास करण्यासाठी.

सुंदर फोटो. भव्यता,स्वच्छता एकदम डोळ्यात भरते. देवळाचे रंगकाम अजुनही किती सुंदर आहे.कुठेही रंग उडलेले ,भग्न अवशेष नाहीत.वर्षु असेच फोटो पाठवत रहा.

छान! पुर्वी ही लोकं निसर्गपूजक होती वाटत (सर्वांसारखीच). आता कुठली देवळं असतात... का नसतात?

मस्त फोटोज वर्षू
बादवे - चीन मध्ये चिमण्या दिसत नाहीत हे खरय का ? >>> चिमण्या दिसतात , इतर प्रॉव्हिन्सच माहीत नाही पण गाँगडाँग मध्ये तरी दिसायच्या.

mast phoTo ! Happy

फोटो मस्तच आहेत. चीन फिरून आल्याबद्दल अभिनंदन ! चीनबद्दल आपले पूर्वग्रह बरेच आहेत ..पण इतकी सुंदर ठिकाणं आहेत हे या मालिकेवरून कळालं..

Pages