वृक्ष-वल्ली आम्हा सोयरी (भाग १)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 April, 2011 - 03:43

माबोवरील निसर्गाच्या गप्पांमुळे आजकाल रस्त्यावरुन जाताना नजर झाडांकडे लागतेच पण टिव्हिवर पण एखादे झाड कुठल्या कोपर्‍यात दिसले तरी ते कसले असेल ह्याचे कुतुहल लागते. ह्या अशाच कुतुहलातुन मागच्या आठवड्यातील रविवारी मी मुलीला आणि माझ्या भाच्यांना खेळण्यांच्या गार्डन मध्ये घेउन न जाता झाडे असलेल्या गार्डनमध्ये घेउन गेले. मी शाळेत असताना ह्या गार्डनमध्ये एक दोन वेळा गेले होते. पण बर्‍याच वर्षांच्या गॅपनंतर मी त्या रविवारी गेले आणि मला त्या बागेची दशा पाहुन खुप वाईट वाटल. सगळी जुनी बांधकाम तोडलेली दिसत होती. झाडांची निगा राखलेली दिसत नव्हती. फक्त त्या झाडांना जगण्यापुरते पाणि सोडण्याचे काम तिथे आता होत असेल. पुर्वी कुणीतरी भिवंडीवाला नावाचे इसम त्यांनी ही बाग फुलवली होती. ते मुंबईलाच राहायचे पण हौशीखातर त्यांनी ही बाग फुलवली होती. पुर्वी जवळजवळ ४ ते ५ एकरांची ही वाडी होती. आता अर्धी विकल्यासारखी वाटते. पुर्वी ह्या बागेत सुचिपर्णी वृक्षही होते पण आता ते नामशेष झाले आहेत. त्या झाडाच्या पानांना सुईसारखे टोक असायचे. आम्ही ती पाने घेउन दुसर्‍यांना टोचण्याचे उपदव्याप करायचो. जाऊदे. आता त्यातुन जे काही चांगल राहील आहे ते मी टिपल आहे.

सुरुवातीलाच मला हे झाड दिसले. हे कोकमाचे आहे का ?
vruksha1.JPG

ही त्याची फळे होती. कदाचित सुकलेली असतील ती झाडावरच.
vruksha2.JPG

हे सुवर्णपत्रीचेच झाड आहे का ? त्याला फळ लागल होत. (दिनेशदा, साधना, जिप्सी, विजय ह्यांना नक्की माहीत असणार)
vruksha6.JPGvruksha17.JPG

पर्जन्य वृक्षाचे भले मोठे झाड. हे बघुन मला हत्तीचाच भास झाला.
vruksha8.JPG

त्याच्याच वरच्या खोडाला ही बांडगुळ आपल अस्तित्व टिकवुन आहेत.
vruksha10.JPG

सुपारीसारख्या झाडाला ही फळे लागली होती.
vruksha3.JPG

कैलाशपतीचे फुल
vruksha14.JPG

कैलाशपतीच्या कळ्या
vruksha12.JPGvruksha13.JPG

कैलास पतीची फळे
vruksha15.JPG

ऑरेंज बिट्टी
vruksha4.JPG

बिट्टीचे फळ
vruksha5.JPG

फिशटेलचे झुंबर
vruksha7.JPG

ह्या बागेला टिकवुन ठेवण्यासाठी पाण्याची सोय करणारी बिच्चारी विहीर.
vruksha21.JPG

विहीरीला चिकटलेले सुंदर नेचे.
vruksha23.JPG

पाणी ओढणारा पंप
vruksha22.JPG

वनस्पतीतज्ञ दिनेशदा तसेच जाणकारांनी कृपया वरच्या झाडांची अजुन माहीती द्यावी.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

पहिलं झाड नीट दिसत नाही. कदाचित कुंभा असेल.
ते सुवर्णपत्राचेच फळ आहे. त्याला स्टार अ‍ॅपल पण म्हणतात. ते पिकले कि किरमिजी रंगाचे होईल, मग दोन हातात चोळून चोळून मऊ करायचे आणि उघडून खायचे. आत एक आमलक असतो, त्याची चव ताडगोळ्यासारखी असते. पण फक्त तोच भाग खायचा, वरचे साल खायचे नाही. (पोट बिघडते.)

ती बांडगुळे नाहीत. ती वाघरी नावाची ऑर्किड आहे. त्याला सुंदर पिवळी फूले येतील.
बाकी कैलाशपती, भोरली माड, बिट्टी, नेचे वगैरे.
जागू निसर्गाच्या गप्पावरच येऊ देत कि हे फोटो.

दिनेशदा धन्स. भोरली माड म्हणजे तो पाम ट्री की सुपारीसारख्या झाडाची लाल फळे असलेले झाड ?

पुरंदरे, महेश, बहिर्जी धन्यवाद.

अनिल बिट्टी आणि कण्हेर वेगवेगळी झाडे. बिट्टीची पाने कण्हेरीपेक्षा थोडी आकाराने कमी आणि फुलामध्ये तर बराच फरक असतो.