आम्ही कोण म्हणूनी काय पुसता...

Submitted by स्मितहास्य on 8 April, 2011 - 01:57

गेल्या आठवड्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानास भेट दिली होती. त्या भेटीचे फोटो आपण "जंगलाला जेव्हा जाग येते" या सदरात पाहिले. इथे सादर केलेले काही निवडक फोटो वगळता इतरही अनेक फोटो घेतले होते.

त्यापैकीच घेतलेला एक फोटो म्हणजे या मुलीचा. उद्यान फिरतांना माझ्याकडील पाणी संपलं होतं म्हणून तहान भागविण्यासाठी जवळच्याच एका आदिवासी पाड्यात गेलो. तिथे एका घराबाहेर ही आणि हीची एक बहीण अशा दोघीजणी फेर धरून नाचत होत्या. डोक्याला कसलं टेंशन नाही, कसली भीती नाही... कसला अभ्यास, कसली शाळा अन् कसलं काय. जॅक अँड जिल ची कविता यांच्या गावीही नसेल कदाचित.. उन लागणं आणि नंतर मग डॉक्टरकडे घातलेल्या खेपा पाहेल्याही नसतील यांनी. हो, पण निसर्ग पुरेपूर पाहिलाय. खेळ म्हणजे काय हे ही चिमुरडी आपल्या लेकरांना व्यवस्थित समजावू शकेल.

अंथरायला जमीन आणि पांघरायला आकाश. सोबत फुललेला निसर्ग. मस्त जगायचं, बागडायचं, हुंदडायचं.. कसली चिंता नाही....

बाहेरच्या जगाला पुर्णपणे अनभिन्ञ असलेल्या या दोघींना कॅमेराबद्ध करायला सरसावतोय तोच मोठी आत पळाली...
ही चिमुरडी मात्र हा काय करतोय या अविर्भावात एक सुंदर फोटो देऊन गेली..

स्थळ : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली.

================================================================================

गुलमोहर: 

मस्त.

सुंदर फोटो आहे पण एका गजबजलेल्या शहराच्या, कुशीत अशी सर्व विकासापासून दूर मुले बघून, त्यांच्या भवितव्याची काळजी वाटते.

मनापासून आभार मंडळी.. Happy
एखाद चॉकलेट वा बस्किटपुडा देत चल सत्कारणी लागेल>>> अगदी रे.. १०० % अनुमोदन मित्रा..
कख, खूप खूप आभार.. Happy
दिनेशदा, भवितव्याची काळजी वाटणे साहजिकंच आहे. पण तरी तिथे आठवड्यतून एकदा एक ग्रुप या मुलांना शिकविण्यास येतो... हे ही नसे थोडके... Happy धन्यवाद.