Submitted by ह.बा. on 1 April, 2011 - 02:04
इरादा चोर आहे वाजणार्या पैंजणाचा
फुटावा बांध अन व्हावा खुला कप्पा मनाचा
किती आनंदली ही लेखणी, चिठ्ठी गुलाबी
उतरला काल जेव्हा एक पल आलिंगनाचा
कधीचा काचपुरणी खेळतो आहे जिवाशी
मलाही सापडाव्या त्या सुखाच्या चार काचा
कधी ती हद्द मागे टाकुनी आलीच नाही
वसा ना सोडला मीही कधी उल्लंघनाचा
खरे जो बोलतो त्याला बरे नसतात कोणी
बरा असतो सदा तो दोस्त आहे का हबाचा?
-हबा
गुलमोहर:
शेअर करा
कधी ती हद्द मागे टाकुनी आलीच
कधी ती हद्द मागे टाकुनी आलीच नाही
वसा ना सोडला मी ही कधी ऊल्लंघनाचा
अप्रतिम शेर!!! तुस्सी छा गये हबा
कधी ती हद्द मागे टाकुनी आलीच
कधी ती हद्द मागे टाकुनी आलीच नाही
वसा ना सोडला मी ही कधी ऊल्लंघनाचा>>> चांगला शेर!
अवांतर - http://www.maayboli.com/node/23551?page=4#comment-1287546
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
हबा, नेहेमी प्रमाणे फारच छान.
हबा, नेहेमी प्रमाणे फारच छान. कस काय जमत बुवा तुम्हाला
>>उतरला काल जेव्हा एक पल आलिंगणाचा
"उतरला काल जेव्हा क्षण एक आलिंगनाचा" हे कसे वाटते ?
कारण "पल" जरा खटकला म्हणून सुचवले.
महेशजी, मी हा विचारच केला
महेशजी,
मी हा विचारच केला नव्हता. क्षण पण मस्त आहे.
क्ष या शब्दाच्या मात्रा १ की २ असतात?
मस्त गझल हबा. फार आवडली. हबा
मस्त गझल हबा. फार आवडली.
हबा जरा शुद्धलेखना कडे लक्ष दे मित्रा.
लेखनी,आलिंगण हे खटकतं.
क्षण =१+१ मात्रा.
क्षण =१+१ मात्रा.
<<कधी ती हद्द मागे टाकुनी
<<कधी ती हद्द मागे टाकुनी आलीच नाही
वसा ना सोडला मी ही कधी ऊल्लंघनाचा<<
हे मनाला भावलं!
सही आहे. आवडली. >>हबा जरा
सही आहे. आवडली.
>>हबा जरा शुद्धलेखना कडे लक्ष दे मित्रा.
लेखनी,आलिंगण हे खटकतं
डॉकना अनुमोदन.
सर्वांचा आभारी आहे. जे शब्द
सर्वांचा आभारी आहे. जे शब्द खटकतात त्याचे बरोबर शब्द पण द्या.
लेखणी,आलिंगन,ऊल्लंघन ऐवजी
लेखणी,आलिंगन,ऊल्लंघन ऐवजी ''उल्लंघन'' असं पाहिजे.
दोस्त च्या जागी ''मित्र'' चांगलं राहील हबा.
yes Doc. Sorry.
yes Doc. Sorry.
ऊल्लंघन ऐवजी ''उल्लंघन'' असं
ऊल्लंघन ऐवजी ''उल्लंघन'' असं पाहिजे. >>> पण त्याचे मात्रा बरोबर होतील का?
हो ना. मात्रा बरोबरच होतात.
हो ना. मात्रा बरोबरच होतात.
ओके. म्हणजे पुढच्या ल्लं चा
ओके. म्हणजे पुढच्या ल्लं चा बोजा उ च्या उरावर आल्यामुळे तो दुप्पट भाराने वाकेल... त्यामुळे त्याला जबरदस्ती शेपूट लावायची गरज नाही. गॉटीट. थ्यांकु!
(No subject)
हबा सुंदर उपमा अलंकार
हबा
सुंदर उपमा अलंकार वापरलास दोस्ता!!