नवी तरही : माणसे....

Submitted by विशाल कुलकर्णी on 29 March, 2011 - 06:12

परक्यास ना कधीही कळतात माणसे ही
अपुलीच आपल्याला छळतात माणसे ही...

आसू न ढाळतो जो असतोच का सुखी तो?
हसतो तयावरी का जळतात माणसे ही?

चंद्रास का मिळावे हो श्रेय चांदण्यांचे
पाहून चांदणीला चळतात माणसे ही...

लाचार मानवाला लालूच देत माया
मायेस भाळुनीया ढळतात माणसे ही

दु:खात का करावी पर्वा कुणी सुखाची?
आसू बघून मागे वळतात माणसे ही

त्या सर्वव्यापकाची आहे कलाकृती ना?
त्याला तरी ’विशाला’ कळतात माणसे ही?

विशाल...

गुलमोहर: 

मतला आवडला Happy

दुसरा शेर ही छान आहे फक्त पहिल्या मिसर्‍यातला 'हो' भरतीचा वाटतो. शक्यतो असे शब्द टाळावेत.

चु. भू. द्या घ्या

विशाल, मस्त जमलीय गजल. सर्वच शेर आवडले.
कणखर्जीनी हळूवारपणे भरतीच्या शब्दाची चर्चा केली आहे. मला वाटते हो ऐवजी "तो" घातला तर तो भरतीचा वाटणार नाही कारण मिस-याच्या पहिल्या भागात "जो" आला आहे. सहज सुचलं म्हणून. पुलेशु