Submitted by प्राजु on 28 March, 2011 - 22:34
वेठीस नेहमी का धरतात माणसे ही??
अपुलीच आपल्याला छळतात माणसे ही
शेंदूर फ़ासलेल्या दगडास ताट भरले
गरिबास घास देण्या, अडतात माणसे ही
भेटून नास्तिकाला, तक्रार सांगतो 'तो'
"हा जीव ही नकोसा.. करतात माणसे ही!"
तडकून काच जाते नात्यांमधील जेव्हा
तुकड्यात बिंब बघण्या, उरतात माणसे ही
करशील तू अपेक्षा त्यांच्याच पूर्ण जोवर
पूजा तुझीच येथे, करतात माणसे ही!
माझ्याच कातडीच्या घालूनिया वहाणा
'पायांस बोचती!' मज म्हणतात माणसे ही..
पाहू नकोस 'प्राजू', मागे अता जराही
मार्गावरी यशाच्या नडतात माणसे ही!!
- प्राजु
गुलमोहर:
शेअर करा
मस्त. खूप आवडली. प्रत्येक शेर
मस्त. खूप आवडली. प्रत्येक शेर भावला. पुलेशु
व्वा.... प्रत्येक शेर
व्वा.... प्रत्येक शेर खणखणीत.
माझ्याच कातडीच्या घालूनिया वहाणा
'पायांस बोचती!' मज म्हणतात माणसे ही...... फार छान शेर.
मस्तंच ग प्राजु! पुलेशु!!!
मस्तंच ग प्राजु!
पुलेशु!!!
मस्त .एकेक शेर खणखणीत .
मस्त .एकेक शेर खणखणीत .
भेटून नास्तिकाला, तक्रार
भेटून नास्तिकाला, तक्रार सांगतो 'तो'
"हा जीव ही नकोसा.. करतात माणसे ही!"
मस्त आहे हा!! एकदम सहज!!
गरिबास घास देण्या, अडतात माणसे ही असं म्हणायचंय का?
सर्वांचे मनापासून
सर्वांचे मनापासून आभार.
आनंदयात्री, हो.. देण्या च हवंय तिथे. करतेय बदल.धन्यवाद.
आपल्या ----- माझ्याच
आपल्या -----
माझ्याच कातडीच्या घालूनिया वहाणा
'पायांस बोचती!' मज म्हणतात माणसे ही..
या कडव्यानंतर मला सुचलेल्या दोन ओळी ......
थांबून जरी पुसशील काय दुखः आहे
प्रगती तुझी सलते बरळतात माणसे हि !!
जाऊ दे मुळ गझलच छान आहे....
खूपच सुरेख गझल आवडली !!!!!!!!!!!
खरच छान आवडली
खरच छान
आवडली
माझ्याच कातडीच्या घालूनिया
माझ्याच कातडीच्या घालूनिया वहाणा
'पायांस बोचती!' मज म्हणतात माणसे ही..
सुंदर
भेटून नास्तिकाला, तक्रार
भेटून नास्तिकाला, तक्रार सांगतो 'तो'
"हा जीव ही नकोसा.. करतात माणसे ही!"
वा! सही गझल!
माझ्याच कातडीच्या घालूनिया
माझ्याच कातडीच्या घालूनिया वहाणा
'पायांस बोचती!' मज म्हणतात माणसे ही..
अप्रतिम!!!
अप्रतिम !!!
अप्रतिम !!!
भेटून नास्तिकाला, तक्रार
भेटून नास्तिकाला, तक्रार सांगतो 'तो'
"हा जीव ही नकोसा.. करतात माणसे ही!"
मस्त.. लई भारी..
खूप खूप आभार! अगदी मनापासून.
खूप खूप आभार! अगदी मनापासून.
भेटून नास्तिकाला, तक्रार
भेटून नास्तिकाला, तक्रार सांगतो 'तो'
"हा जीव ही नकोसा.. करतात माणसे ही!"
व्वा! ultimate!
बाकी शेर पण छान