ब्रेकिंग न्युज — ४ मायबोलीकरांनी सर केला वसईचा किल्ला

Submitted by जिप्सी on 24 March, 2011 - 01:18

ब्रेकिंग न्युज...............ब्रेकिंग न्युज...............ब्रेकिंग न्युज

नमस्कार,

मायबोली दूर्गभ्रमण चॅनेलवरच्या "ब्रेकिंग न्युज"मध्ये मी योगेश२४ आपल्या सर्वांचे स्वागत करतो. नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार होळीच्या दिवशी ४ मायबोलीकर (जिप्सी, यो रॉक्स, रोहित एक मावळा आणि दिपक डि*) वसईचा किल्ला सर करून आले.
(*दिपक डि हा मायबोलीवर नविन आयडी असुन त्याचे प्रतिसाद फक्त जिप्सीच्या पोस्टवर असल्याने तो जिप्सीचा डुआय असावा असा दाट संशय आहे.)

सर्वप्रथम जाणुन घेऊया त्याबाबतच्या ठळक बातम्या जाणुन घेऊया आमच्या वसईच्या प्रतिनिधीकडुन.

१. शुक्रवारी रात्री वसईच्या किल्ला सर करण्याचा कट शिजला. जिप्सी आणि त्याचा मित्र असे दोघेच जाणार होते पण आदल्या दिवशी मायबोलीकर यो रॉक्स आणि रोहित-एक मावळा (रोमा) येण्यास तयार झाले आणि दोनाचे चार झाले.

२. सकाळी सकाळी ठिक ५:३५ वाजता कोपर स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर रोहित आणि प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर जिप्सी, दिपक आणि (पुन्हा) रोमा यांची जॉगिंग.

३. ठिक ६:३० वाजता तिघे वसई स्टेशनला पोहचले. तब्बल अर्धा तास उशिराने यो रॉक्स याचे आगमन.

४. मायबोलीकर एक पाकळी यांच्या खास आग्रहास्तव हॉटेल "ऋषिकेश" येथे अल्पोपहार आणि उशीरा आल्याबद्दल यो रॉक्सला अल्पोप्रहार.

५. सकाळी ७:३५च्या नवघर-किल्ला गाडीने किल्ल्याकडे प्रयाण

६. सकाळच्या मस्त वातावरणात विविध पक्ष्यांचे दर्शन आणि त्यांचे काढलेले फोटो

७. किल्याच्या मजबूत तटबंदीवरून किल्ल्यावर प्रभात फेरी.

८. किल्ल्याच्या मुख्य भागात अकस्मात अप्सरा, मुन्नी, शिला आणि चुलबुल पांडेचे आगमन आणि त्यांचा भन्नाट नृत्याविष्कार.

९. भरपूर फोटोसेशन (स्वतःचे आणि किल्याचे)

१०. बर्फाचा गोळा खात मुंबईकडे प्रयाण

बातम्या विस्ताराने:

वसई, १८ मार्च/विशेष प्रतिनिधी
पेबच्या ट्रेकने थकविल्यानंतर जवळपास दोन-तीन आठवडे जिप्सी कुठेच गेला नव्हता आणि या भर उन्हात कुठे जायला कुणी तयारच होत नव्हते. त्यामुळे एखादा छोटासा भुईकोट किल्ला करायचा असे मनात आले. यासाठी पहिल्यांदा जिप्सी आणि त्याचा मित्र दिपक असे दोघेच जायचे ठरले. पण आदल्यादिवशी अजुन दोन मायबोलीकर यो रॉक्स आणि रोहित-एक मावळा तयार झाले आणि दोनाचे चार (भटके) झाले. होळीचा दिवस असल्याने संध्याकाळी लवकर घरी पोहचावे म्हणुन सकाळी ५:४०ची डोंबिवली-बोईसर या गाडीने वसईला जायचे ठरले. जिप्सी (विक्रोळी), रोहित उर्फ रोमा (ठाणे) आणि दिपक (डोंबिवली) असे तीघांनी ५:३५ पर्यंत कोपर स्टेशनवर यायचे नक्की केले.

कोपर स्टेशनवर जिप्सी आणि दिपक वेळेत हजर, पण रोहितचा पत्ता नाही. फोन केला असता दिवा स्टेशन क्रॉस केले आहे असे समजले. इकडे कोपर स्टेशनवर बोईसर गाडीची अनाऊन्समेन्ट झाली तरी रोहितची ट्रेन काही येताना दिसली नाही. हि ट्रेन चुकली तर परत ठाणे किंवा दादरला जाऊन वसई गाठायचे ठरले. पण थोडयाच वेळात रोहित येत असलेली ट्रेन दिसली. ट्रेनमधुन उतरताच रोहितची जॉगिंग सुरु झाली. एकमेकांशी ओळखही न करून घेता ताबडतोब तीघेही प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर (कोपर स्टेशनवर वसईला जाण्यासाठी प्लॅटफॉर्म वरती आहे) जाण्यासाठी जॉगिंग करू लागले. एव्हाना गाडी प्लॅटफॉर्मला लागली आणि तिघांनीही धावत पळत जाऊन एकदाची गाडी पकडली. गाडीतच जिप्सीने रोहित आणि दिपकची ओळख करून दिली. त्यावर रोहित म्हणाला, जिप्सी अरे आपणही आजच पहिल्यांदा भेटतोय ना?" (खरंच मायबोली, प्रचि/लेख यावरचे प्रतिसाद, विपु यामुळे कधी वाटलंच नाही कि पहिल्यांदा भेटतोय. इतकी Virtual ओळख आधीच झाली होती.)

ठिक ६:३० वाजता तिघांचेही वसईला आगमन. यो रॉक्सला फोन केला असता तो बोरीवलीला होता (:प्रचंड चिडलेले तीन बाहुले:) त्याला येण्यास अवधी होता आणि बाकी तिघांना वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता. तेव्हढ्या वेळेत नाश्ता करून घेऊया असे सर्वानुमते ठरले आणि मायबोलीकर एक पाकळी यांचा जिप्सीला फोन आला. त्यांनी सांगितले कि स्टेशनजवळच "ॠषिकेश" हॉटेलमध्ये नाश्ता करा आणि "बिल दिल्यावरच" माझे नाव सांगा. (:दात काढुन हसणारा बाहुला:). त्यांच्या सांगण्याप्रमाणे हॉटेल नाश्ता करण्यासाठी तिघांनी प्रयाण केले. अल्पोपहार करत असतानाच यो रॉक्स याचे आगमन झाले आणि उशीरा आल्याबद्दल दोघांनी त्याला अल्पोपहार ऐवजी अल्पोप्रहार दिला.

एक पाकळी यांनी सांगितल्याप्रमाणेच वसई डेपोतुन नवघर-किल्ला गाडीतुन वसईचा किला सर करण्याकरीता चार मायबोलीकर निघाले. साधारण अर्धा-पाऊण तासातच किल्ल्याजवळ पोहचले. यो रॉक्स आधी जाऊन आला असल्याने यावेळी तोच इतरांचा गाईड होता. सकाळच्या प्रसन्न (होय, कडक उन्हाळा असला तरी) वातावरणात या मिनी ट्रेकला सुरुवात झाली. सुरुवातीलाच शाल्मलीच्या (काटेसावर) फुलांनी बहरलेले झाड आणि त्यावर भिरभिरणारी पाखरं दिसली. त्यांनाच टिपण्यासाठी लगेच तीन कॅमेरे सरसावले आणि पक्ष्यांचे फोटोसेशन सुरू झाले. पण काढलेले काही काही फोटो असे येत होते कि मायबोली आस्चिग यांच्या "हा पक्षी कोणता ?" या बाफवर हे सगळे फोटो देऊन त्यांची ओळख पटवून घेण्याचे ठरले.

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

फोटोसेशन झाल्यावर किल्ल्याच्या मजबूत तटबंदीवरून किल्ला भटकंतीला सुरुवात झाली. वाटेतच ताडाची (कि माडाची????) झाडे आणि त्याखाली ठेवलेली मडकी दिसली. त्यातल्याच एका झाडावरून थेंब थेंब पडणारी पहिल्या धारेची चाखण्याचा मोह रोहित आणि यो ला आणि त्यांचे फोटो काढण्याचा मोह जिप्सीला आवरला नाही. अर्थात पहिल्या धारेची चाखण्याआधी उडी मारून फोटो काढण्याचा "उडीबाबा" हा पारंपारीक कार्यक्रम यथासांग पडला होता. अशाच प्रकारे धम्माल मस्ती करत, विविध पक्षी, फुले, झाडे यांचे फोटो काढत, त्यांना पाहत किल्याची प्रदक्षिणा सुरु झाली.

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९
उडीबाबा!!!

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

(सर्व प्रकाशचित्रे रोहितच्या कॅमेर्‍यातुन आमच्या कॅमेरामन यो रॉक्सने काढले आहेत)

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

अशीच हि किल्ला भटकंती चालु असताना किल्ल्याच्या मध्यभागी यो रॉक्सने आपल्या मायबोलीप्रसिद्ध नृत्यअविष्कार दाखवण्यास सुरुवात केली. यावेळी त्याला सोबत होती ती रोहित उर्फ रोमाची. पहिल्यांदा यो च्या रुपाने अप्सरा आली आणि धम्माल उडवून दिली, त्या नंतर त्याला साथ लाभली ती रोमाची (यावेळी यो ने अप्सरा नृत्याविष्काराचे धडे रोहितला हि दिले, म्हणजे पुढच्या ट्रेक पर्यंत दोन अप्सरांची जुगलबंदी बघायला मिळणार तर). जिप्सी आणि पहिल्यांदाच असे भन्नाट नृत्य पाहणारा दिपक यांची हसुन हसुन पुरेवाट झाली. नंतर खास आग्रहास्तव मुन्नी आणि शिला यांनाही स्टेजवर बोलाविण्यात आले. शिला आणि मुन्नी नाचुन गेल्यावर परत आपले दोन चुलबुल पांडे चुळबुळ करत, "हुड हुड दबंग दबंग" करत स्टेजवर मनसोक्त हुंदडले.

प्रचि २०

या नृत्याबाबत यो आणि रो चे काय म्हणणे आहे ते आमच्या वसईच्या प्रतिनिधीकडुन जाणुन घेऊया.

Over to आमचा वसईचा प्रतिनिधी

आमचा वार्ताहर : रो, यो याबाबत आपले काय म्हणणे आहे?

(पलिकडे शांतता. )

आमचा वार्ताहर : यो, रो माझा आवाज ऐकु येतोय का?

(पुन्हा शांतता)

व्यत्यय

:लालचुटुक सफरचंदामधुन हिरवीगार किड बाहेर येतानाचा फोटो:

क्षमा असावी. काही कारणास्तव आमच्या वार्ताहराचा त्यांच्याशी सध्या संपर्क होऊ शकत नाही. तरी ते त्यांचे म्हणणे त्यांच्या प्रतिसादातुन येथे मांडतीलच.

अशा प्रकारे मनोरंजनाचा कार्यक्रम पार पाडल्यांनतर किल्ल्याचा उर्वरीत भाग पहावयास सगळे निघाले. स्वत:चे आणि किल्ल्याचे मनसोक्त फोटो काढुन घेतल्यावर परतीच्या मार्गावर निघालो. वाटेत बर्फाचा गोळावाला दिसला आणि मग काय २ काला खट्टा आणि दोन मिक्स असे गोळे/चम्मच गोळे घेऊन खाऊन या मिनी ट्रेकची सांगता झाली. साधासा, छोटासा असा हा ट्रेक असल्याने वृतांत कमी आणि क्षणचित्रे जास्त आहेत. :हळुच हसणारा बाहुला:

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५
c

प्रचि ३६

प्रचि ३७
एकही स्मायली (हास्यचित्रे) न टाकता दिलेल्या या होत्या आतापर्यंतच्या बातम्या पुन्हा भेटुया पुढच्या ट्रेक वृतांतामध्ये तो पर्यंत नमस्कार.

===============================================
===============================================
कुठलेहि पूर्वनियोजन न करता केलेला एखादा छोटासा ट्रेकही किती आनंद/समाधान देऊन जाते हे या वसई किल्ल्याच्या भटकंतीत समजले. :पुन्हा अशाच सुंदर ट्रेकच्या प्रतिक्षेत असलेला बाहुला:

प्रचि ३८

===============================================
===============================================

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा वा छान. पण तिथे फोटो काढण्यासारखे आणखी बरेच काही आहे. अमाप वाढलेली वाघरी, खजूराची झाडे, एक पुरातन मंदीर, एक वापरात असलेले चर्च, फुलपाखरे, गोरख चिंचेची मोठी झाडे, बदकाची फूले ... मी असायला हवे होते..

फोटोज छान!
चिमाजी आप्पा स्मारकाच्या समोर माळ आहे तिथून पलीकडच्या भिंतीवर गेला असता तर आणखी सुंदर फोटो मिळाले असते.
तिथून उजवीकडे वळल्यावर एक शिवमंदीर आहे, त्याच्याबाजूला सुंदर तळं आहे.
चक्रीजिन्याकडून पुढे गेल्यावर दाट आमराई आहे जिथे एव्हाना कैरया लागलेल्या असतील.
कस्ट्म्स कॉलनीमधून गेल्यावर किल्ल्य्याचा थोडासा वेगळा पडलेला भाग आहे तिथून किनारपट्टीच्या अलीकडचं जंगल अफलातून दिसतं. भारद्वाजांच्या दोन जोड्या आहेत तिथे आणि सकाळी ११ वाजेपर्यंत ती चौघजणं आउटींगवर असल्याने तुम्हाला दिसायला हरकत नव्हती.
थोडक्यात तुम्ही लोकांनी फार वरवरच किल्ला पाहिला. किल्ल्या ची उजवी बाजू कव्हरच नाही केलीत तुम्ही लोकांनी. तिथे एक चर्च आहे, आश्रम आहे, एका बोळकांड्यातून आत गेल्यावर लांबच लांब पसरलेली मच्छीमार वस्ती आहे. आता त्यांची बोटींची डागडुजी काम करायचं काम चाललंय ते बघता आलं असतं.

मस्तय रे. Happy

शनिवारी सकाळी नवराही होता तिथेच. गेले दोन शनिवार जातो आहे. (तुमचे प्रचि ७) ताडी पिणार्‍या मैनेचे आणि पोपटाचे फोटो मिळालेत आणि एक फ्लायकॅचरचाही चांगला मिळाला आहे. अगदी सुसकाळी पक्षी बरेच दिसतात. rosy starling, chestnut starling वगैरेही दिसले.
बहुतेक या शनिवारी सकाळी आम्हीही जाऊ पुन्हा. Happy

नवर्‍याचा अल्बम तयार झाला (तर) की लिंक देईन. Happy

धन्स लोक्स Happy

अमाप वाढलेली वाघरी, खजूराची झाडे, एक पुरातन मंदीर, एक वापरात असलेले चर्च, फुलपाखरे, गोरख चिंचेची मोठी झाडे, बदकाची फूले ... मी असायला हवे होते..>>>>दिनेशदा, तुमची आठवण काढली होती. Happy जंगली ऑर्किडसुद्धा भरपूर वाढले होते. पावसाळ्यात एकदा जायला हवे.

अधिक माहितीबद्दल धन्स मणिकर्णिका.

भारद्वाजांच्या दोन जोड्या आहेत तिथे आणि सकाळी ११ वाजेपर्यंत ती चौघजणं आउटींगवर असल्याने तुम्हाला दिसायला हरकत नव्हती.>>>येस्स, दिसली भारद्वाजाची जोडी. फोटो काढलाय पण तितकासा क्लियर नाही.

थोडक्यात तुम्ही लोकांनी फार वरवरच किल्ला पाहिला. किल्ल्या ची उजवी बाजू कव्हरच नाही केलीत तुम्ही लोकांनी. तिथे एक चर्च आहे, आश्रम आहे, एका बोळकांड्यातून आत गेल्यावर लांबच लांब पसरलेली मच्छीमार वस्ती आहे. आता त्यांची बोटींची डागडुजी काम करायचं काम चाललंय ते बघता आलं असतं>>>>>>>भरपूर फिरलो किल्ला. बहुतेक भाग कव्हर केला. फोटो भरपूर असल्याने ते सगळेच इथे टाकले नाहीत. Happy

ताडी पिणार्‍या मैनेचे आणि पोपटाचे फोटो मिळालेत आणि एक फ्लायकॅचरचाही चांगला मिळाला आहे. अगदी सुसकाळी पक्षी बरेच दिसतात. rosy starling, chestnut starling वगैरेही दिसले.
>>>>>येस्स्स्स्स, मैना, भारद्वाज, कोकिळ, सनबर्ड, किंगफिशर, पोपट आणि बरेचे पक्षी, फुलपाखरं दिसली. काहि फोटो आले आहेत "बर्‍यापैकी" Happy

शनिवारी सकाळी नवराही होता तिथेच.>>>>>>किल्ल्यात जवळपास कुणीच नव्हते आमच्या व्यतिरीक्त, फक्त एकजण ट्रायपॉड आणि प्रोफेशनल कॅमेरा घेऊन पक्ष्यांचे फोटो काढत होता. तेच तर तुमचे "श्री" नव्हेत??? (हे आठवायचे कारण कि मी लेन्स बदलताना सारखी दिपकची मदत घेत होतो. तेंव्हा यो म्हणाला तो बघ एकटाच सगळे कसे अ‍ॅडजस्ट करतोय आणि तुला सारखी मदत पाहिजे Happy )

हो तोच असेल जिप्सी.
गोरा (म्हणजे असं मला वाटतं) आणि बारिक.
ट्रायपॉड घेऊन होता यावेळेस. Proud
कॅनन ५०० ड

हो हाच Happy
कॅनन ५०० ड>>>>>येस्स्स, मग तोच Happy माझे लक्ष कॅमेरा आणि ट्रायपॉडवरच होते Wink

उशीरा आल्याबद्दल यो रॉक्सला अल्पोप्रहार. >>> Lol
पुढ्च्यावेळी माझ्याकडून २-४ अजून ठेवून द्या त्याला... Proud

फोटू लय भारी!!! Happy

यो रॉक्सचं फोटोसेशन लय भारी!! (हेच फोटो 'दाखवा', चटकन जमेल)

बाकी योग्याने अमितला ओळखलं नाही का? लालू गटगला आला होता ना योग्या?

(हेच फोटो 'दाखवा', चटकन जमेल)>>>>>:फिदी:

बाकी योग्याने अमितला ओळखलं नाही का? लालू गटगला आला होता ना योग्या?>>>>नव्हतो ना. Happy

ववि २०११ चं खास आकर्षण:- मुन्नी आणि शीला.. चुकवु नका, चुकवु नका, चुकवु नका >>>>>>:फिदी:

अप्रतिम वृत्तांत
आणि फोटो तर काय .....शब्द संपले

ववि २०११ चं खास आकर्षण:- मुन्नी आणि शीला.. चुकवु नका, चुकवु नका, चुकवु नका >>>>>>हा!!हा!!हा!!

अरे ये जिप्स्या...
चांगल लिव्हलयस..
फोटो पण लय भारी Happy

:पुन्हा अशाच सुंदर ट्रेकच्या प्रतिक्षेत असलेला बाहुला: Happy >> सही आपण खुप धमाल केली.
परत भेटु लवकरच.............

जिप्सी महाराज, दोन्ही वाक्यात मी यो.रॉक्सबद्दलच बोलतेय हो... >>>>अस्सं होय Happy मला पहिलं वाक्य यो रॉक्ससाठी आणि दुसरं माझ्यासाठी वाटंल Proud

आमचा वार्ताहर : रो, यो याबाबत आपले काय म्हणणे आहे?

(पलिकडे शांतता. )

आमचा वार्ताहर : यो, रो माझा आवाज ऐकु येतोय का?

(पुन्हा शांतता) >>

"हा योगेश२४.. इथे खूप मस्त वातावरण आहे.. सध्या आम्ही एका वास्तूच्या मध्यभागी येउन ठाकलो आहोत.. जिथे लावणी आयटम ड्यान्सचा धमाल कार्यक्रम पार पडलाय.. तोदेखिल शांततेच्या तालावर.. मोबाईलचा वापर न करता !! अजिब आहे ना.. पण जेव्हा आनंद द्विगुणीत होतो तेव्हा असे काही करण्यास प्रयास पडत नाही.. नि एव्हाना आतापर्यंतच्या ट्रेकला थोडा शांत राहणार्‍या रोमाला खुललेले पाहून मला जास्त आनंद झाला.... संगतीने ट्रेक करण्याचा परिणाम बहुतेक.. कुणास ठाउक.. आतापर्यंत फक्त कॅमेराला घेउन नाचणारा जिप्सी उद्या कॅमेर्‍याशिवायपण नाचू शकतो... .

बाकी होळीच्या दिवशीची सकाळ बर्‍यापैंकी आल्हाददायक.. त्यातच आमचे स्वागत श्याम्लली झाडावरील पक्ष्यांनी केल्याने मस्त वाटले.. चिमाजीअप्पांना नमस्कार करून आम्ही त्यांच्या मागच्या बाजूस मोकळ्या माळात उतरलो नि तिथूनच पुढे गोरखचिंच झाडाच्या बाजूने तटबंदीवर चढून गेलो... ही आडवाटेची वाट काट्याकुट्यातून जात असल्याने जिप्सी नि दिपक थोडे गोंधळले.. पण मी त्यांना वेळीच लक्षात आलून दिले की हा ट्रेक नसला तरी ट्रेकचा फिल मात्र मिळेल याची आमच्याकडून गारंटी !

इथूनच मग आम्ही तटबंदीवरून मुक्त विहार सुरु केला..तुम्ही जिप्सीने दिलेल्या फोटोंमध्ये पाहत असाल तर सभोवताली ताडी - खजूरची झाडे होती.. पक्ष्यांचे म्हणाल तर भारद्वाज, रॉबिन, बुलबूल, बार्बेट सारखे पक्षी नजरेस पडले.. सापांचा मात्र काही थांगपत्ता लागला नाहीये.. नि तुम्हाला ताडीच्या झाडावरच्या पहिल्या धारेबद्दल काय सांगू.. इथे येउन झाडाखाली मान वर करुन उभे राहून बघा.. मस्तच गोड !!!

बाकी तटबंदीवरून फिरताना किल्ल्याचा विस्तार लक्षात येतो.. आम्ही एक बाजू पुर्ण करून डांबरी रस्त्यावर आलो नि तो ओलांडून महत्त्वाच्या भागात शिरलो.. इथे अनेक वास्तू नजरेस पडतात... इथे जवळस एक मोठे प्रवेशद्वार आहे.. जिथे हनुमानाचे मंदीर आहे.. पण तुमच घोळ होईल म्हणून सांगतो इथे प्रसिद्ध असणारे हनुमान मंदीर हे नसून ते खाडीच्या टोकाला आहे.. आम्ही इथेच प्रत्येक वास्तूचा मांग घेत हिंडतोय.. शक्य तितके जंगलात जातोय.. एकीकडे पक्ष्यांची किलबिल तर एकीकडे उद्ध्वस्त अवस्थेत असणार्‍या मुक भिंती बघतोय.. राहून राहून वाटते यांची जोपासना का गेली नाहीये.. अजुनही काही भिंती वा त्या भिंतीत वापरण्यात येणारा दगड तसाच्या तसा आहे.. कोरीव काम देखील आहे... पण हा दुर्लक्षित किल्ला आता नको त्या कारणांने प्रसिद्ध आहे.. संध्याकाळी ७ नंतर इथे घुटमळत फिरणे म्हणजे धोक्याचे म्हणे.. शिवाय किल्ल्याचे पुर्नबांधणीचे काम लज्जास्पद आहे.. यावरुनदेखील मागे वाद उफाळला होता..

असो.. आम्ही यथेच्छ आनंद घेत आहोत. बर्‍याचजणांचे म्हणणे असते हा किल्ला छोटा आहे.. बघण्यासारखे काही नाही.. पण मलातरी वाटते इकडे तुम्ही वेळ देउनच आलेले बरे.. किल्ल्याच्या मध्यभागी असणारी मंदीरे.. शिवमंदीर नि दत्तमंदीर.. बाजुलाच असणारे तळे.. चहूबाजुंनी असणारे जंगल नि जंगलात दिसणारे पक्षी, पडीक अवस्थेत दिसणारे चर्च नि त्यांच्या उंचपुरी भिंती... लांबच्या लांब नि चालण्यायोग्य असणारी दोन मजली तटबंदी.. इथेच एका बाजूस जंगल नि तर एका बाजूस खाडीस बिलगून असणारी मच्छीमार वस्ती नि त्यांची टुमदार बैठी घरे... याच किल्ल्याच्या आवारत असणारे हनुमानाचे प्राचीन मंदीर.. नि पुढे खाडीच्या दिशेने बाहेर पडले असता दिसणारी जेट्टी.. नि पाण्यात डुलणार्‍या छोट्या मोठ्या नौका.. .. याव्यतिरिक्त आज शनिवारची सुट्टी असल्याने इथे वसई विकास आर्टस कॉलेजची मुले आपले कलासाहीत्य घेउन बसलेली दिसत आहेत.. कुंचल्यातून किल्ल्याचे नामशेष चित्रीत करताना दिसत आहेत.. इथे मला आपल्या मायबोलीवरील अजय पाटील यांची आठवण झाली... बाकी मला एवढा वेळ फुटेज दिल्याबद्दल आभारी.. आता नाचून फिरुन दमलोय.. ऊन थोडे वाढत चाललेय.. तेव्हा कुठे काही थंड गिळायला मिळते का बघतो.. बाकी माझ्या कॅमेर्‍यातील क्षणचित्रे उशीराने येतीलच.. चला मी चलतो.. एक उडीबाबाचा कार्यक्रम पार पाडायचाय.. रोमा, दिपक आलो रे.. जिप्सी फोटो नीट आला पाहीजे !

योगेश२४.. अशाप्रकारे माझी बडबड थांबवून माईक तुमच्या वार्ताहराकडे सोपवत आहे धन्यवाद.. " Happy

(हेच फोटो 'दाखवा', चटकन जमेल) >> मंजुडीदी.. Lol Proud

लालू गटगला आला होता ना योग्या? >> मी पण नव्हतो तेव्हा.. मिस्टर रैनाशी बातचीत करण्याचा विचार होता.. पण त्या जंगलात आमची चौकट बघून कदाचित घाबरून त्याने तेथून पळ काढला.. Wink Proud

अरे यो सही...
अगदी माझ्यासुद्धा मनातल बोललास ... त्यामुळे मला बोलायची गरज नाही. Happy
आता पुन्हा एकदा होऊन जाऊ दे ती शांतता...

धन्यवाद यो आपला अमूल्य वेळ देऊन आणि सुंदर माहिती देत आमच्याशी बातचित केल्याबद्दल Happy

ओव्हर टु जिप्सी Happy

सह्ही रे यो, मस्तच लिहिलंय Happy

एव्हाना आतापर्यंतच्या ट्रेकला थोडा शांत राहणार्‍या रोमाला खुललेले पाहून मला जास्त आनंद झाला.... संगतीने ट्रेक करण्याचा परिणाम बहुतेक>>>>>अगदी अगदी Happy

आतापर्यंत फक्त कॅमेराला घेउन नाचणारा जिप्सी उद्या कॅमेर्‍याशिवायपण नाचू शकतो... .>>>>>:फिदी:

पण मी त्यांना वेळीच लक्षात आलून दिले की हा ट्रेक नसला तरी ट्रेकचा फिल मात्र मिळेल याची आमच्याकडून गारंटी !>>>>>खरंच रे Happy

रोमा, दिपक आलो रे.. जिप्सी फोटो नीट आला पाहीजे ! >>>>>>आला रे Wink

यो रॉक्स, मस्त लिहिले आहेस.
साप नाही दिसले का ? हरणटोळ दिसतात, बर्‍याच वेळा तिथे.

लई झ्याक फोटो आणि लई झ्याक वर्णन...
च्यायला, नुसते फोटोंतून आणि वर्णनातून भेटताय...प्रत्यक्ष भेटा की राव आता...

Pages