नवा गडी नवं राज्य -- एक खुसखुशीत नाट्क

Submitted by कविमंदार on 7 March, 2011 - 01:07

नवा गडी नवं राज्य -- एक खुसखुशीत नाट्क

काल "नवा गडी नवं राज्य" हे नाटक बघितलं. त्याच हे परी़क्षण......

कलाकारः- उमेश कामत, प्रिया बापट, हेमन्त ढोमे आणी गिरिजा दातार.

पडदा वर जातो आणी नउवारी वर rain coat नेसलेली अम्रुता (प्रिया बापट) रंगमंचावर येते. तिच्याकडे पाहता पाहता आपलं लक्ष जातं ते SET कडे. अतिशय सुरेख असणारा सेट आणी त्याहुन सुरेख दिसणारी अमु.

अमु: लहानपणीचं बालपण हरवल्यामुळे लग्नानंतर पण अगदी बालीश वागणारी, लहान लहान गोष्टींनी आनंदुन जाणारी एक तुफान मुलगी.

हॄषी :- अम्रुता पेक्षा ८ वर्ष मोठा असलेला आणी या जगात एक मावशी सोडली तर सोबत कुणीच नसलेला हुशार व यशस्वी तरुण.

हिम्मतरावः अम्रुताचा BEST मित्र. एक खुप हुशार आणी दिलखुलास व्यक्तिमत्त्व.

केतकी: हॄषीची ex. नातं तुटल्यावर हॄषीपासुन खुप दुर गेलेली पण नंतर परत त्याच्याच कंपनीत कामाला लागलेली एक mature वाटणारी मुलगी.

कथानकः- या नाटकाचं कथानक अगदी साधं आणी सरळ आहे. दोन भिन्न वातावरणातुन आलेले दोन जीव...... त्यांच लग्न....नवी नवलाई.....मुलाची मैत्रीण...... मुलीचा मित्र.....गैरसमज्....नात्यातला ताण...... तुटेपर्यंत ताणल्या गेलेली नाती......एकमेकांचा समजलेला भुतकाळ्........या प्रवासात एकमेकाना उलगडलेले ते दोघे......बालीशपणातुन प्रगल्भतेकडे प्रवास्........त्या दोघाना जवळ आणणारी एक घटना...... आणी सुखांत.

अतिशय साधं वाटत असलं तरी खुप प्रभावी मांडणी , अप्रतीम संवाद आणी सर्व कलाकारांचा जोरदार अभिनय या नाटकाच्या जमेच्या बाजु.

पोटभरुन हसवणारं, थोडसं रडवणार आणी खुपसं शिकवणारं हे नाटक...... कमीत कमी एकदा तरी बघायलाचं हवं.

नाटकातलं मला सर्वात जास्त आवडलेलं वाक्यः

" समोरच्याचे दोष त्याला न दाखवता त्या मागची कारणं शोधुन ते दोष सुधारणं यालाच तर समजुतदारपणा म्हणतात "

मुल्यांकनः ३.५ / ५

झी गौरव मधे ४ पुरस्कार विजेतं आणी मटा सन्मान मधे सर्वाधिक ८ नामांकन मिळवलेलं आणी ५० प्रयोग पुर्ण केलेलं एक व्यावसायिक नाटक...............नवा गडी नवं राज्य.

गुलमोहर: 
शब्दखुणा: