करू मनात नोंदणी समान एकदा तरी.........

Submitted by भुंगा on 25 February, 2011 - 01:05

घडेल का असे कधी किमान एकदा तरी
ठरेन या जगात मी महान एकदा तरी

लहान तो, महान तो अशीच का विभागणी
करू मनात नोंदणी समान एकदा तरी

तुझ्याविना जगायचे जमेल का सखे मला
करून यत्न पाहतो किमान एकदा तरी

कशा उरात स्पंदती जुन्या खुणा, तुझ्याच ना??
मला तुझ्या कुशीत घे गुमान एकदा तरी

घनास सांगतो कधीच कोसळू नको इथे
जळास लागु दे तुझी तहान एकदा तरी

जिथे तुलाच भेटलो, तुझ्या मिठीत पेटलो
तिथे कुटीत थाटतो मकान एकदा तरी

गुलमोहर: 

मस्त...
तुझ्याविना जगायचे जमेल का सखे मला
करून यत्न पाहतो किमान एकदा तरी....
ही ओळ जास्त आवडली.............

घनास सांगतो कधीच कोसळू नको इथे

घनास सांगतो कोसळू नको तोवर इथे
जळास लागू दे तुझी तहान एकदा तरी

असे बरे वाटेल का?

मला अजुन मात्रा किंवा ईतर माहीत नाही फ्क्त सुचना

लहान तो, महान तो अशीच का विभागणी
करू मनात नोंदणी समान एकदा तरी

हा शेर चांगला आहे भुंग्या Happy

बाकी खालील गोष्टी पुढ्च्या वेळी लक्षात ठेवशील

दोन ओळींचा संबंध स्ट्राँगली प्रस्थापित व्हायला हवा...दुसर्‍या ओळीत प्रभावी समारोप ही महत्वाची अट आहे.

पाचव्या शेरात ओळींचा संबंध आहे परंतु काय सांगायचे आहे ते कळत नाही.

पुढील लेखनास शुभेच्छा!!

कशा उरात स्पंदती जुन्या खुणा, तुझ्याच ना??
मला तुझ्या कुशीत घे गुमान एकदा तरी >> वा ....तू प्रेमळ विनंती सम्जुन लिहिले आहेस ... तीला वाचुन दाखवताना मी धमकीच्या सुरात वाचुन दाखवेन Wink Proud

>>> आवडली !!

पाचव्या शेरात ओळींचा संबंध आहे परंतु काय सांगायचे आहे ते कळत नाही.

>>>>

कणखर,

आपल्याला पाण्याची तहान लागते. म्हणजे काय?? तर पाणी हे जीवनावश्यक आहे आणि अस्तित्व टिकविण्यासाठी ते लागतेच....... जेंव्हा त्याची कमतरता भासते तेंव्हा आपण "तहान लागली" असे म्हणतो. त्या पाण्यालाच जेंव्हा आपले अस्तित्व टिकवायची वेळ येईल, घन बरसत नाहीत आणि पाण्याचा साठा संपत आलाय. थोडक्यात पाण्यालाही आता अस्तित्व टिकवायचं आहे, (भूमीवरचं) मग अश्या वेळी त्याला सुध्दा आभाळातून घन बरसण्याची गरज (म्हणजेच तहान) लागत नसेल काय????
असा काहीतरी अतरंगी विचार डोक्यात घेऊन हे लिहिलेय........ चु.भू.द्या.घ्या. Happy

धन्यवाद.

वा ....तू प्रेमळ विनंती सम्जुन लिहिले आहेस ... तीला वाचुन दाखवताना मी धमकीच्या सुरात वाचुन दाखवेन

>>>

पंत, मी सुध्दा प्रेमळ विनंती करत नाही...... हे "आवाहन" नाही मित्रा दिलेलं "आव्हान" आहे Wink

विचार खूपच सुंदर आहे भुंग्या!! पण एवढा सखोल विचार प्रतित होत नाहीये शेरातून... असो, नक्कीच हाच शेर तुला कालांतराने आधिक सुलभ सुचेल Happy

पुन्हा एकदा शेर वाचला... लागु असे कर वृत्तासाठी Happy

भुंग्या तुझी गझल वाचली.
"लहान तो, महान तो अशीच का विभागणी
करू मनात नोंदणी समान एकदा तरी"
हा शेर आवडला

गझलेमधलं फारसं काही कळत नसल्याने मी गझल विभागात कधीच प्रतिसाद देत नाही.

'भुंगा' ची गझल वाचून त्याला वैयक्तिक प्रतिसाद द्यायचा होता.
नजरचुकीने इथे येऊन दिला.
क्षमस्व !

अप्रतिम भुंगेश... एकदम गोटीबंद गझल.

घडेल का असे कधी किमान एकदा तरी
ठरेन या जगात मी महान एकदा तरी

लहान तो, महान तो अशीच का विभागणी
करू मनात नोंदणी समान एकदा तरी

तुझ्याविना जगायचे जमेल का सखे मला
करून यत्न पाहतो किमान एकदा तरी

हे शेर सॉल्लीड जमून आलेत.

भुंगा खूपच मस्त प्रयत्न आहे तुमचा... बर्‍याच ओळी अगदी सफाईदार आल्या आहेत...

तहान बाबत तुमचे विश्लेषण पण आवडले...

.

कोणत्याही गोष्टीची सुरुवात हिच चांगली गोष्ट आहे.........
गझल ठिक वाटली.........

कशा उरात स्पंदती जुन्या खुणा, तुझ्याच ना??
मला तुझ्या कुशीत घे गुमान एकदा तरी..........

हा शेर जरा जास्त रोख ठोक (अगदी मनातून) आल्या सारखा वाटला. Happy

लहान तो, महान तो अशीच का विभागणी
करू मनात नोंदणी समान एकदा तरी

हा खरेच आवडला. Happy
पु. ले. शु.

प्रयत्न आवडला.... Happy
शेवटचे तिन्ही शेर छान आहेत, त्यातल्या त्यात

>>कशा उरात स्पंदती जुन्या खुणा, तुझ्याच ना??
मला तुझ्या कुशीत घे गुमान एकदा तरी

आणि

जिथे तुलाच भेटलो, तुझ्या मिठीत पेटलो
तिथे कुटीत थाटतो मकान एकदा तरी >> हे विशेष आवडले. Happy

त्याआधीचे सो सो वाटले...

पुढिल लेखनासाठी शुभेच्छा!

भुंगा, छान लिहिलेय.
लहान तो, महान तो अशीच का विभागणी
करू मनात नोंदणी समान एकदा तरी>>> मस्तच.
तुझ्याविना जगायचे जमेल का सखे मला
करून यत्न पाहतो किमान एकदा तरी>>>व्वा! व्वा!

कविता असलेली गझल!
३,४,५ आवडले. 'तहान' तर खूप आवडला.
शेवटच्या शेरात तुला'च' आणि 'मकान' (अमराठी) शब्द यामुळे गंमत गेल्यासारखे वाटले.

भुंग्या, सुंदरच आहे तुझी गझल...

लहान तो, महान तो अशीच का विभागणी
करू मनात नोंदणी समान एकदा तरी>>> हा शेर मस्त एकदम!!! Happy

कशा उरात स्पंदती जुन्या खुणा, तुझ्याच ना??
मला तुझ्या कुशीत घे गुमान एकदा तरी>>> तू काय रांगडा गडी आहेस का? Lol

घनास सांगतो कधीच कोसळू नको इथे
जळास लागु दे तुझी तहान एकदा तरी>>> अर्थ स्पष्ट केल्यावर सगळ्यात जास्त आवडलेला शेर Happy

क्लासच...

मला मात्र..
घनास सांगतो कधीच कोसळू नको इथे
जळास लागु दे तुझी तहान एकदा तरी>>> हा शेर सगळ्यात जास्त आवडला Happy

छान

Pages