कोणी नसून ठरुया विशाल अगदी खुशाल अगदी खुशाल
करतात लोक हे आजकाल अगदी खुशाल अगदी खुशाल
क्रान्ती घडेल किंवा फसेल याचा विचार सोडून देत
रस्त्यावरून फिरवू मशाल अगदी खुशाल अगदी खुशाल
वैताग जिंकण्याचा म्हणून माघार घेत मी हारतोय
माना तुम्ही स्वतःची कमाल अगदी खुशाल अगदी खुशाल
सारे असेच होते लहान सारे असेच झाले महान
घोडा खरीद मिळताच नाल अगदी खुशाल अगदी खुशाल
माझ्या मनात आहेस होय... त्याच्यात काय लाजायचेय
पिंजून काढ वस्ती बकाल अगदी खुशाल अगदी खुशाल
झोपून खर्च होते बरेच आयुष्य अल्प जागून भोग
डोळे दिसोत हे लाललाल अगदी खुशाल अगदी खुशाल
जे हासतात त्यांना नसेल हे प्रेम लाभलेले कधीच
हातात हात घालून चाल अगदी खुशाल अगदी खुशाल
आनंद ज्यास झाला अशास आनंद देत आनंद माग
उधळून खुद्द हिरवा गुलाल अगदी खुशाल अगदी खुशाल
पर्याय काय आहे समोर येऊन ठाकला जर मधेच
मृत्यूस जिंदगी कर बहाल अगदी खुशाल अगदी खुशाल
संपायचेच आहे अशास जगवायचे कशाला उगाच
करुदे चितेवरी हालचाल अगदी खुशाल अगदी खुशाल
"वागू नका असे" ते म्हणत, "असा वागणार" माझे विधान
"बदनाम व्हाल, बदनाम व्हाल".. "अगदी खुशाल अगदी खुशाल"
काहीतरी स्वत:चे म्हणून सांगू शकाल का एकदाच
करताय रोज नुसती धमाल अगदी खुशाल अगदी खुशाल
मी 'बेफिकिर' न होवो म्हणून हल्ला कराल मागे हटाल
तुमचेच खड्ग तुमचीच ढाल अगदी खुशाल अगदी खुशाल
________________/\___________
________________/\______________________
साष्टांग
(No subject)
"वागू नका असे" ते म्हणत, "असा
"वागू नका असे" ते म्हणत, "असा वागणार" माझे विधान
"बदनाम व्हाल, बदनाम व्हाल".. "अगदी खुशाल अगदी खुशाल"
>>>> वाह वाह !! जियो !!
.............................
..................................................................................................................................................................................
नाहियेत काहीही शब्द!!
साष्टांग दंडवत!!!
साष्टांग दंडवत!!! ---^---
अशाच रचनेला खरी गझल म्हणत असावेत
तुम्ही आम्हाला आपले मित्र म्हणता हे आमचं पूर्वजन्मीचे पुण्य म्हणायचे.
व्वा... पहिले दोन शेर वाचुन
व्वा...
पण असं काही नव्हतं..

पहिले दोन शेर वाचुन वाटलं इथल्या सगळ्या गझलकारांची नावं गुंफली की काय
लई भारी आहे..
"वागू नका असे" ते म्हणत, "असा वागणार" माझे विधान
"बदनाम व्हाल, बदनाम व्हाल".. "अगदी खुशाल अगदी खुशाल"
१ नं. आहे हा...
मला न आवडलेली तुमची पहिलीच
मला न आवडलेली तुमची पहिलीच गझल.
मशाल .. नाल फार सुरेख आवडले
मशाल .. नाल फार सुरेख आवडले च.. बकाल कमाल पण आवडले..
बाकी वृत्त अवघड आणि अपरिचित असल्याने वाचताना लय साधली जात नाहीये... मला तरी..
अर्थात ह्या मीटर मध्ये लिहायचे तुमचे कसब कमालच आहे
हा मीटर आहे? हा तर मोठठा
हा मीटर आहे? हा तर मोठठा चौडा ब्रॉडगेट आहे.
सर्वांचा आभारी आहे. - '
सर्वांचा आभारी आहे.
- ' बेफिकीर ' !
मिलिंद, हे अक्षरगणवृत्तच आहे.
मिलिंद,
हे अक्षरगणवृत्तच आहे.
गागालगाल गागालगाल गागालगाल गागालगाल
प्रतिसादाबद्दल मनापासून आभारी सगळ्यांचा!
जवळपास एक वर्षाने पुन्हा वर
जवळपास एक वर्षाने पुन्हा वर आणावीशी वाटली (डोमा)
जवळपास एक वर्षाने पुन्हा वर
जवळपास एक वर्षाने पुन्हा वर आणावीशी वाटली >>>>>>>>> धन्यवाद. त्यामुळे वाचायला मिळाली.
अप्रतिम.
"बदनाम व्हाल, बदनाम व्हाल".. "अगदी खुशाल अगदी खुशाल">>>> खासच.
झकास
झकास
मजेशीर .....मस्त..गझल
मजेशीर .....मस्त..गझल
अप्रतिम !!!! ही गझल
अप्रतिम !!!!
ही गझल मिसल्याबद्दल स्वतःचाच निषेध ! खरंच कमाल !!
असल्या गझला येऊद्यात वर
अप्रतिम... खरंच सुरेख...
अप्रतिम...
खरंच सुरेख...
गागालगाल गागालगाल गागालगाल
गागालगाल गागालगाल गागालगाल गागालगाल>>>>>>>>>>
एक गोर्या गालांवर गाणं होईल
गागालगाल गागालगाल गागालगाल गागालगाल
ये गोरे गोरे गागालगाल गाल
ये काले काले बाबालबाल बाल
ये हीरनी जैसी चाचालचाल चाल
(No subject)
धन्यवाद लोक्सांनो
धन्यवाद लोक्सांनो
"वागू नका असे" ते म्हणत, "असा
"वागू नका असे" ते म्हणत, "असा वागणार" माझे विधान
"बदनाम व्हाल, बदनाम व्हाल".. "अगदी खुशाल अगदी खुशाल"
बाप्रे!!!!!! खरच साष्टांग! ____/\_____ !!!!!!!!!!
नि:शब्द...........!!!
पर्याय काय आहे समोर येऊन
पर्याय काय आहे समोर येऊन ठाकला जर मधेच
मृत्यूस जिंदगी कर बहाल अगदी खुशाल अगदी खुशाल
व्व्व्व्व्वा!
अगदी धमाल अगदी धमाल ... गझल
अगदी धमाल अगदी धमाल ...
गझल कमाल..
या गझलेत यतीस्थान व ओळीचा
या गझलेत यतीस्थान व ओळीचा शेवट लघू अक्षरावर होतो हे वैशिष्ठ्य जाणवते
"वागू नका असे" ते म्हणत, "असा वागणार" माझे विधान>>>>>>>>
इथे अ मुळे एक मात्रा वाढलीय का....."मी वागणार!!" माझे विधान....असे करता येते का ?की 'म्हणत' मधल्या 'त' चा पाय तरी मोडावा लागेल ? (केवळ एक जिज्ञासा)
बाकी या गझलेकरता बेफीजीना १२०० सूर्यनमस्कार माझ्यातर्फे !!
वागू नका असे ते म्हणत असा
वागू नका असे ते म्हणत असा वागणार माझे विधान = ३२
ही गझल ३२ मात्रांच्या ओळींची आहे.
' गा गा ल गा ल' ४ वेळा
वर आणल्यानंतर प्रतिसाद देणार्यांचे आभार
वस्ती बकाल.. आवडला. मीटर पण
वस्ती बकाल.. आवडला.
मीटर पण वेगळाच (म्हणजे मी आधी ऐकला नव्हता.) आणि मस्त..
बेफिकीरजी! आपली दीर्घ रदीफाची
बेफिकीरजी! आपली दीर्घ रदीफाची व दीर्घ वृत्तातली(अक्षरगण/मात्रावृत्त) ही गझल वाचली. फारशी रुचली नाही (कृपया स्पष्ट विधानाचा राग नसावा).
खालील गोष्टी विचाराव्याशा वाटल्या...............
१)ठरुया..........ठरूया... हवे वाटले.
२)हारतोय.......... “य” भरतीचा वाटला.
३)खरीद.........की, खरेदी कर/करा असे हवे?
४)लाजायचेय......... “य” भरतीचा वाटला.
५)करु दे.........करू दे असे हवे वाटले.
६)करताय................?
खुशाल....मूळ फारसी शब्द आहे.........खुश्+हाल.....हे एक विशेषण आहे.
अर्थ.............
सुस्थितीत असलेला, सुखी, आनंदी, सुखरूप, निरोगी.
क्रि. वि. या अर्थाने..........सुखाने, बेलाशक.
खुशालचंद/खुशालटेकडा..........चैनी, निष्काळजी, रंगेल, रिकामटेकडा.
वरील अर्थ अशाकरता दिले की, “अगदी खुशाल, अगदी खुशाल” ही शब्दांची द्विरुक्ती इथे रदीफ म्हणून घेतली आहे, जी तोलली जाणे अपेक्षित आहे.
असा लांबलचक रदीफ घेवून व काफिया वजा जाता, सानी मिस-यात व्यक्त व्हायला फारच थोडी जागा उरते.
अशा परिस्थितीत कामयाब शेराचे सर्व ताल सांभाळणे अवघड जाते.
(वैयक्तिक मत)
वरील आपल्या गझलेत रदीफाची फारच फरपट व दमछाक झालेली मला वाटली.
मतल्यात......कोणी नसून......अर्थ जरा अस्पष्ट वाटला.
टीप..........हेच काफिये घेवून, दुस-या एखाद्या वृत्तात जास्त चांगले व्यक्त होता आले असते असे वाटून गेले!
...........प्रा.सतीश देवपूरकर
होय प्रोफेसर साहेब, तो काळ
होय प्रोफेसर साहेब, तो काळ असा होता की चित्रविचित्र गझला करायला आवडायच्या आणि माझी गझल म्हंटली की लवून नमस्कार करण्याची रसिकांनाही सवय लागलेली होती
आज मला ही गझल आवडत नाहीच
देवसर .........धन्य आहात
देवसर .........धन्य आहात तुम्ही

(No subject)
Pages