Submitted by विशाल कुलकर्णी on 24 February, 2011 - 06:08
हरून या रणात देहभान एकदा तरी
ठरेन या जगात मी,महान एकदा तरी
अजूनही मनात ती जुनीच प्रीत जागते
हवीस तू मिठीत या निदान एकदा तरी ...
असेन मी, नसेन मी, मनातही तुझ्या सखे
हळूच आज हाक दे किमान एकदा तरी ...
हव्या कशास वल्गना उगाच रे जिवा अता ?
पहायचे तुला गड्या स्मशान एकदा तरी ...
सुखेच ती, सुखांस रे कळे न दु:ख काय ते,
हवीच वेदना विराजमान एकदा तरी ...
********************************
थोडी गंमत...
कलिंदनंदिनीसवे बराच खेळ खेळलो
विशाल मी, म्हणा मला, महान एकदा तरी...!
विशाल....
गुलमोहर:
शेअर करा
चांगली आहे गझल विशाल....गंमत
चांगली आहे गझल विशाल....गंमत आवडली
घरी काय खंबा आणून ठेवलायेस
घरी काय खंबा आणून ठेवलायेस काय रे? गझलेवर गझल पाडतोय्स म्हणून विचारलं. सगळ्याच गझल मस्त आहेत. ईमेल मधे आलेली ती मधुमास गझल मस्त होती.
सुक्या, आजकाल "डॉक्टर"
सुक्या, आजकाल "डॉक्टर" ब्रँडीच्या प्रभावाखाली असतो रे
त्यामुळे सारखे डोक्यात "क्रांति-क्रांति" असे शब्द निनादत असतात.......!
मग खरडतो झालं काहीबाही.....
कलिंदनंदिनीसवे बराच खेळ
कलिंदनंदिनीसवे बराच खेळ खेळलो
विशाल मी, म्हणा मला, महान एकदा तरी...!
एकदा तरी कशाला रे? रोज एकदा तरी तुला नक्कीच महान म्हणेन मी! काय भन्नाट गझल लिहिलीस!
कस्चं..कस्चं तायडे
कस्चं..कस्चं तायडे
असेन मी, नसेन मी, मनातही
असेन मी, नसेन मी, मनातही तुझ्या सखे
हळूच आज हाक दे किमान एकदा तरी .........
क्या बात है... एकद म तरल अनुभूतीचा शेर. जियो....
सुखेच ती, सुखांस रे कळे न दु:ख काय ते,
हवीच वेदना विराजमान एकदा तरी .
हा सुद्धा भन्नाट शेर आहे मित्रा.
गंमतसुद्धा फार छान आहे. बाकी ''विशाल'' हा मक्ता लिहीण्यास काहीच हरकत नसावी,कारण या शब्दास एक चांगला अर्थ आहे.
व्वा... कलिंदनंदिनीसवे बराच
व्वा...
महान आहात...
कलिंदनंदिनीसवे बराच खेळ खेळलो
विशाल मी, म्हणा मला, महान एकदा तरी...! >>>
कलिंदनंदिनीसवे बराच खेळ
कलिंदनंदिनीसवे बराच खेळ खेळलो
सुपर्ब गझल!!!
विशाल मी, म्हणा मला, महान एकदा तरी...! >>> ही गंमत फारच सही होती
सुरेख!!! खूप छान गझल.
सुरेख!!! खूप छान गझल.
सगळ्यांचे मनःपूर्वक धन्यवाद
सगळ्यांचे मनःपूर्वक धन्यवाद
स्मशान आवडलं. शेवटची गंमत पण
स्मशान आवडलं.
शेवटची गंमत पण छान आहे.
हव्या कशास वल्गना उगाच रे
हव्या कशास वल्गना उगाच रे जिवा अता ?
पहायचे तुला गड्या स्मशान एकदा तरी >>>> आअह्हा!
साती, गिरीराज मनापासुन आभार
साती, गिरीराज मनापासुन आभार
चांगली आहे गझल विशाल....गंमत
चांगली आहे गझल विशाल....गंमत आवडली
रामकुमार