Submitted by छाया देसाई on 24 February, 2011 - 02:48
हरेन आज भूक अन तहान एकदा तरी
ठरेन या जगात मी महान एकदा तरी
उगाच सोस लागतो इथे तिथे फिरायचा
सजेल का तसेच घर जहान एकदा तरी
मनास जिंकणे मला जमेल का जमेल का
जमेल का मला पिणे चहा न एकदा तरी
बघून ह्रदय उघडणे ,तयास त्यात कोंडणे
अता मुळी न बिघडते पहा न एकदा तरी
मनास ध्यास प्यास ती ,तिथेच जायचे मला
कशास काळजी फुले वहा न एकदा तरी
गुलमोहर:
शेअर करा
मनास जिंकणे मला जमेल का जमेल
मनास जिंकणे मला जमेल का जमेल का
जमेल का मला पिणे चहा न एकदा तरी..:खोखो:
हजलिश अंगाने असलेली रचना. तहान्,महान्,लहान सम पक्के काफिये नसल्याने आशयात व शब्दांत ओढाताण होते.... पण तरीही फार चांगली रचना.
छान.. पुलेशु...
जहान म्हणजे काय?
जहान म्हणजे काय?
<<मनास जिंकणे मला जमेल का
<<मनास जिंकणे मला जमेल का जमेल का
जमेल का मला पिणे चहा न एकदा तरी>>चहाबाज!छान.
जहाँ= जहान
जहाँ= जहान
मनास जिंकणे मला जमेल का जमेल
मनास जिंकणे मला जमेल का जमेल का
जमेल का मला पिणे चहा न एकदा तरी
वा! झक्कास!
क्रान्तिशी सहमत! त्याच
क्रान्तिशी सहमत! त्याच शेरातील पहिली ओळ मस्त!
आपण तंत्रावर पकड घेत आहातच! आता शेरही धारदार यायला लागतील असे वाटत आहे.
चुभुद्याघ्या
-'बेफिकीर'!
मनास जिंकणे मला जमेल का जमेल
मनास जिंकणे मला जमेल का जमेल का
एकदम भारी शेर आहे हा!!!! खुप्प्प आवडला 
जमेल का मला पिणे चहा न एकदा तरी>>>
चहा..!! मस्तच!! मला तरी चहा न
चहा..!! मस्तच!!
मला तरी चहा न घेणे.. जमणार नाही छाया ताई.
ठीक वाटली.......
ठीक वाटली.......
सुंदर गझल. शेवटचे दोन विशेष
सुंदर गझल.
शेवटचे दोन विशेष आवडले.