ठरेन या जगात मी महान एकदा तरी..(तरही)

Submitted by प्राजु on 23 February, 2011 - 13:42

मुठीत घेउ दे मला तुफ़ान एकदा तरी
ठरेन या जगात मी महान एकदा तरी

नकोस मैफ़िलीमधून बोलवू मला अता
भरून तृप्त होउ देत कान एकदातरी

प्रवाह सोडुनी, 'अशी-तशीच' वागले जरा
अतातरी म्हणाल धैर्यवान एकदातरी???

उगाच प्रश्न या मना, सतावितो पुन्हा पुन्हा
मिळेल वागणूक का समान एकदातरी??

धरेस घाल साकडे, 'फ़ुलून डोलु दे पिके'
सुखेच क्लांत होउदे किसान एकदातरी

कितिक सुंदर्‍या अशाच मिरविती इथे तिथे
दिसेन का तशीच मीहि छान एकदातरी?? Happy

हजारदा रचून 'काव्य', पत्र धाडले तुला
लिहून 'शब्द' धाड तू किमान एकदातरी !!!

'हवेच' जे कमावले, अता न आस कोणती
मिळेल का तुझ्या मनांत स्थान एकदातरी?

- प्राजु

गुलमोहर: 

नकोस मैफ़िलीमधून बोलवू मला अता
भरून तृप्त होउ देत कान एकदातरी

हजारदा रचून 'काव्य', पत्र धाडले तुला
लिहून 'शब्द' धाड तू किमान एकदातरी !!!

हे दोन शेर आवडले Happy

कितिक सुंदर्‍या अशाच मिरविती इथे तिथे
दिसेन का तशीच मीहि छान एकदातरी??

मिळेल का तुझ्या मनांत स्थान एकदातरी?>>>

वा वा! मस्तच!

आपले शेर आकारात येऊ लागले आहेत असे वाटले.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

कितिक सुंदर्‍या अशाच मिरविती इथे तिथे
दिसेन का तशीच मीहि छान एकदातरी??>>> ए किती सुंदर लिहिलेयस हे!!! फार्फार आवडले Happy

उगाच प्रश्न या मना, सतावितो पुन्हा पुन्हा
मिळेल वागणूक का समान एकदातरी??

धरेस घाल साकडे, 'फ़ुलून डोलु दे पिके'
सुखेच क्लांत होउदे किसान एकदातरी

waah wa bahot khub...

कान मस्त...

मिळेल का तुझ्या मनांत स्थान एकदातरी? >>> मस्त मिसरा आहे.. वरचा मिसरा अजून चांगला करता आला तर मस्त होईल

सुंदर गझल.
सर्वच शेर चांगले.

................

मुठीत घेउ दे मला तुफ़ान एकदा तरी

ही ओळ फारच सुंदर आहे.

ही ओळ घेऊन एक नवीन वीर रसातली कविता/गझल लिहावी. Happy