ठरेन या जगात मी महान एकदा तरी? [तरही]

Submitted by क्रांति on 23 February, 2011 - 05:11

पडेल का हवे तसेच दान एकदा तरी?
ठरेन या जगात मी महान एकदा तरी?

पुराणकाळचे नकोत दाखले, मनास दे
नवीन जाणिवा, समर्थ भान एकदा तरी!

तुझे अबोध हट्ट, खोडसाळ खेळ सांगती,
"वयात काय? हो पुन्हा लहान एकदा तरी!"

किती दुरून येत मी तुझाच तीर गाठला,
सुखे मरेन, भागली तहान एकदा, तरी!

भिजून चिंब पावसात, ऊन बोलले मला,
"पहाच रंगबावरी कमान एकदा तरी!"

जपेल हीच संस्कृती अनेकतेत एकता,
घुमेल आरतीसवे अजान एकदा तरी!

गुलमोहर: 

मस्तच!!

पुराणकाळचे नकोत दाखले, मनास दे
नवीन जाणिवा, समर्थ भान एकदा तरी!

तुझे अबोध हट्ट, खोडसाळ खेळ सांगती,
"वयात काय? हो पुन्हा लहान एकदा तरी!"

किती दुरून येत मी तुझाच तीर गाठला,
सुखे मरेन, भागली तहान एकदा, तरी!

हे तीन शेर क्लास!!

77.gif77.gif77.gif77.gif77.gif77.gif77.gif77.gif77.gif77.gif77.gif77.gif77.gif

किती दुरून येत मी तुझाच तीर गाठला,
सुखे मरेन, भागली तहान एकदा, तरी!

भिजून चिंब पावसात, ऊन बोलले मला,
"पहाच रंगबावरी कमान एकदा तरी!"

सुंदर!!! Happy

भिजून चिंब पावसात, ऊन बोलले मला,
"पहाच रंगबावरी कमान एकदा तरी!"

...सुंदर.. गझल अगदी जमून गेलीये..

"वयात काय? हो पुन्हा लहान एकदा तरी!"

वाहवा..काय चीर तरूण शेर आहे....

अगं,तू इतकं छान लिहितेस्,तुझ्या प्रत्येक लिखाणासाठी आता "छान"चा शिक्का करून ठेवला पाहिजे.
अजान ,कमान मस्तच !

"वयात काय? हो पुन्हा लहान एकदा तरी!" >> मस्त
तहान , कमान पण मस्तच...

गझल आवडलीच.. 'अजान' ह्या वेगळ्या काफियाचा उपयोगही मस्त

किती दुरून येत मी तुझाच तीर गाठला,
सुखे मरेन, भागली तहान एकदा, तरी!

भिजून चिंब पावसात, ऊन बोलले मला,
"पहाच रंगबावरी कमान एकदा तरी!"

अजानसुद्धा आवडले!

फारच छान!

रामकुमार