हातात आज धोंडा या सापडू नये... (हझल)

Submitted by विशाल कुलकर्णी on 17 February, 2011 - 23:13

दादागिरी कुणाला का आवडू नये?
वादात या कुणीही सहसा पडू नये

लपला टवाळ कोठे ? तू शोधशी मला...
हातात आज धोंडा या सापडू नये...

गाईन मीच गाणी, गर्दभ नका म्हणू
आधीच सांगतो मी, कोणी नडू नये

राजाच मी मनाचा, हासू नका कुणी
ऐकविन काव्य माझे, तेव्हा रडू नये..,

तूही जरा चरावे, मीही चरेन ना,
बेकार भांडणांनी दोघे सडू नये

नाहीस तू तरीही आहे निवांत मी,
माझ्याविना तुझेही काही अडू नये,

वागा हवे तसे रे, जखमा नका करू
वाढेल वाद, वाढो, नाते झडू नये ...

प्रथमच हझलेच्या वाटेला गेलोय. समजुन घ्या Proud

विशाल

गुलमोहर: 

वागा हवे तसे रे, जखमा नका करू
वाढेल वाद, वाढो, नाते झडू नये ... >> एकदम गंभीरच झाला शेवट.. Happy मस्त होता हा...

बाकी ग्रेट.. Lol

नाहीस तू तरीही आहे निवांत मी,
माझ्याविना तुझेही काही अडू नये,

वागा हवे तसे रे, जखमा नका करू
वाढेल वाद, वाढो, नाते झडू नये

विशाल्,हे दोन्ही शेर हजलेचे किंवा हजलिश नाहीत...... आणि हेच दोन्हि फार आवडले... Biggrin

मस्त रचना....:)

धन्यवाद मुक्ता, कैलासदादा Happy
दादा, 'नाहीस....' मध्येही थोडा खोडकरपणा आहेच, म्हणजे नीट वाचाल तर लक्षात येइल...तू नही तो और सही.. Proud

Biggrin

मस्तच रे! अगदी पक्की हझल, जाता जाता हळवं करून जाणारी.
[मेंटल म्हणता म्हणता सेंटिमेंटल!] Happy

[मेंटल म्हणता म्हणता सेंटिमेंटल!] Happy सही क्रांति Happy
विशल्या....जमल्येय रे Happy