वादात या कुणीही सहसा पडू नये !

Submitted by माझिया गीतातुनी on 17 February, 2011 - 07:48

माझ्याच आरशाला "मी" आवडू नये ?
वादात या कुणीही सहसा पडू नये !

हासून हुंदक्यांना मी टाळले जरी
काहूर आसवांचे दडता दडू नये ?

जेव्हा फुला प्रमाणे - स्पर्शेन मी तुला !
काटा बनून कोणी तेव्हा नडू नये !

येऊ नकाच कोणी - मागायला मते !
दारात दु:खीतांच्या कोणी रडू नये !

आश्वासुनी "उद्याला" जे श्वास घोटती !
(त्यांचे कुठे कधीही काही अडू नये ?)

मयुरेश साने..दि..१७-फेब-११

गुलमोहर: 

माझ्याच आरशाला "मी" आवडू नये ?
वादात या कुणीही सहसा पडू नये !........... व्वा !!

हासून टाळले मी हुंदके कितीदा !............... वृत्तभंग झालाय. गागाल गालगागा गागाल गालगा असं हवंय.
दडवून आसवांना - त्यांनी दडू नये ?

आश्वासनात ज्यांनी बुडवीले उद्याला !..........इथेही वृत्त चुकलंय. मात्र शेराचा आशय उत्तम.:)
(त्यांचे कुठे कधीही काही अडू नये ?)

जेव्हा फुला प्रमाणे - स्पर्शेन साजणीला !........... इथेही वृत्त चुकतंय. ''स्पर्षेन साजणी'' असं जमेल
काटा बनून कोणी तेव्हा नडू नये !

मागू नका मते - ही -येऊ नकाच कोणी !
दारात दु:खी तांच्या कोणी रडू नये !... वा,चांगला शेर.

मी परत दुरुस्त करुन टाकलिये.. माझी रचना..
व्रुत्तात खुप चुका झालेल्या.... सुधारणा सुचवणार्‍या सार्‍यांचे आभार

कैलास सर आपला ही आभारी आहे....

खरच खुप शिकायला मिळतय इथे...

जेव्हा फुला प्रमाणे - स्पर्शेन मी तुला !
काटा बनून कोणी तेव्हा नडू नये !

अप्र्तिम

मयुरेश साने होय. नैतर अश्या फटाफट एकाच आयडीच्या गझला पाहिल्या की धस्स होतं.
अवांतराबद्दल क्षमस्व.