Submitted by निशिकांत on 17 February, 2011 - 02:20
पुतळ्यास काढण्याची चर्चा घडू नये
वादात या कुणीही सहसा पडू नये
गांधी, सुभाष, बाबा मोठीच थोरवी
तुलना करावयाची आदत जडू नये
देईन मान दिसता बाबा कुठे गुरू
पाल्हाळ तेच त्यांनी पण बड्बडू नये
वृध्दास त्यागताना नवखी पिढी म्हणे
कोणाविना कुणाचे जगती अडू नये
खलनायकात दिसतो सदगुण कधीकधी
राखावया फुलांना काटा झडू नये
हुंडाबळीस आम्ही निर्ढावलो किती ?
हे रोजचेच झाले कोणी रडू नये
माता जरी कुमारी तिज मान्यता हवी
कच-यात बाळ टाकुन तिमिरी दडू नये
का लिंगभेद जगती? कळले न मज कधी
बलवान पंख स्त्रीचे का फडफडू नये ?
"निशिकांत" कर तयारी जाऊ नव्या जगी
दलदल अमाप येथे वाटे सडू नये
निशिकांत देशपांडे मो.नं. :- ९८९०७ ९९०२३
E Mail :- nishides1944@yahoo.com
प्रतिसादाची अपेक्षा
गुलमोहर:
शेअर करा
हुंडाबळी,
हुंडाबळी, लिंगनिदान्,स्त्रीभ्रूण हत्त्या,बुवाबाजी,राजकारण..........अश्या बर्याच क्षेत्रात हात घालून केलेली चांगली सामाजिक गझल.
अभिनंदन निशिकांतजी.
आशय चांगला.
आशय चांगला.
ग्रेट.. आपल्या गझल कायमच खूप
ग्रेट.. आपल्या गझल कायमच खूप आशयघन असतात.. लिहित रहा..
मुक्ताला अनुमोदन!!!
मुक्ताला अनुमोदन!!!
उत्तम!! जळजळीत गझल.
उत्तम!! जळजळीत गझल.
नेहमीप्रमाणे छान.
नेहमीप्रमाणे छान.